पोन्नियिन सेल्वन 2 ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Ponniyin Selvan 2 Trailer:  दिग्दर्शक  मणिरत्नम (Mani Ratnam)   यांचा पोन्नियिन सेल्वन (Ponniyin Selvan) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. पोन्नियिन सेल्वन चित्रपटाच्या यशानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग लकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  पोन्नियिन सेल्वन -2 (Ponniyin Selvan 2)  ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट 28 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याआधी चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर आणि ऑडिओ लाँच कार्यक्रम होणार आहे. या चित्रपटामध्ये काय बघायला मिळणार आहे? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे. 

पोन्नियिन सेल्वन-2 च्या ट्रेलरची रिलीज डेट 

एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, पोन्नियिन सेल्वन-2 चे निर्मात्यांनी चेन्नईमधील एका कार्यक्रमामध्ये या चित्रपटाचा ट्रेलर आणि ऑडिओ लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच चित्रपटाचे निर्माते या कार्यक्रमाची घोषणा करणार आहेत. 28 एप्रिल रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. 

पोन्नियिन सेल्वनचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ 

गेल्या वर्षी पोन्नियिन सेल्वन हा चित्रपट रिलीज झाला.  या चित्रपटात विक्रम, ऐश्वर्या राय (Aishwarya Rai), जयम रवी, कार्थी, तृषा कृष्णन आणि ऐश्वर्या लक्ष्मी यांनी प्रमुख भूमिका साकरली आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.  लाइका प्रोडक्शन आणि मद्रास टॉकीजच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाचा साउंडट्रॅक ए आर रहमानने संगीतबद्ध केला आहे.

हेही वाचा :  आयटम साँगसाठी उर्वशीनं घेतले 'एवढे' मानधन; ‘बॉस पार्टी’ गाण्याला प्रेक्षकांची पसंती

पोन्नियिन सेल्वन हा सिनेमा कल्कि यांच्या तमिळ कादंबरीवर आधारित असणार आहे. ही कादंबरी 1995 साली काल्कि यांनी लिहिली आहे. ऐश्वर्या राय बच्चन पोन्नियिन सेल्वनमध्ये राणी नंदिनीची भूमिका साकारली आहे. तर अभिनेता चियान विक्रम शोभिता धूलिपाला आणि जयम रवी या कलाकारांनी देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे. गेल्या वर्षी 30 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली होती. 30 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटानं  17 ऑक्टोबर 2022 पर्यंत जगभरातील बॉक्स ऑफिसवर जवळपास 455 कोटींची कमाई केली आहे. ब्रह्मास्त्र आणि विक्रम  या चित्रपटांसोबत पोन्नियिन सेल्वन या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Ponniyin Selvan 1 OTT Release : ‘पोन्नियिन सेल्वन 1’ OTT वर रिलीज होण्यापूर्वीच ऑनलाईन पाहू शकता; फक्त करा ‘हे’ काम

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …