हार्ट अटॅकनंतर सुष्मिताच्या नसांमध्ये घातले स्टेंट,आजच खायला घ्या जीव वाचवणारा हा पदार्थ

Amla For Heart Attack :- आजचा दिवस सुश्मिता सेनच्या चाहत्यांसाठी धक्का देणारा ठरला कारण बातमीच तशी होती. मिस युनिव्हर्स म्हणून नाव कमावणारी आणि बॉलिवूडमधून आजही सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री सुष्मिता सेनने नुकतीच एक अशी पोस्ट टाकली जी वाचल्यावर अनेकांना त्यावर विश्वासच नसेना. वडिलांसोबतचा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “काही दिवसांपूर्वी मला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर डॉक्टरांनी अँजिओप्लास्टी केली आणि नसांमध्ये स्टेंट टाकले.” तिने ही गोष्ट उलगडताच तिच्या तब्येतीविषयी सगळीकडूनच विचारपूस होऊ लागली. अशावेळी अनेकांच्या मनात एक प्रश्न आला की स्टेंटची गरज नक्की कधी भासते?

जेव्हा एक किंवा अधिक नसांमध्ये Cholesterol किंवा त्यासारखे इतर अनेक घाणेरडे चिकट पदार्थ तयार होतात तेव्हा नसा ब्लॉक होतात. त्यामुळे हृदयापर्यंत रक्त पोहोचण्याचे प्रमाण कमी होते आणि हृदयविकाराचा झटका अर्थात Heart Attack येतो. रूग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर नंतर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करतात आणि धमनीमध्ये एक स्टेंट घालतात, ज्यामुळे ब्लॉकेज उघडते आणि रक्ताला वाहण्यासाठी वाट तयार होते. (फोटो सौजन्य :- Instagram/sushmitasen47, iStock)

हेही वाचा :  बायकोने पण आयुष्यात ऐवढे किस घेतले नाही तेवढे... अजित पवारांची हटके प्रतिक्रिया

अभिनेत्री सुष्मिता सेनला आला हार्ट अटॅक

हृदयविकार व हार्ट अटॅकपासून वाचवतो आवळा

हृदयविकार व हार्ट अटॅकपासून वाचवतो आवळा

आवळ्याच्या सेवनाने खराब कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडची पातळी कमी होते, असे अनेक अभ्यासांमध्ये आढळून आले आहे. आवळ्याच्या सेवनाने नसांमध्ये होणारे ब्लॉकेजेस रोखता येतात आणि हार्ट अटॅक टाळता येतो असे जाणकारांचे देखील मत आहे. यासोबतच आवळा हा हाय ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासही मदत करतो. त्यामुळे एकंदर आवळ्याचे फायदे पाहता तुम्ही आहारात त्याचा वापर नक्की केला पाहिजे.
(वाचा :- सायंटिस्टचा दावा – दारू सोडवणारं औषध अखेर सापडलं, दारूकडे ढुंकूनही बघत नाही व्यसनी, हे 5 अवयव करते कॅन्सरमुक्त)​

हृदयासाठी करा आवळ्याचे सेवन

हृदयासाठी करा आवळ्याचे सेवन

कच्च्या आवळ्याऐवजी त्याचा रस पिणे अधिक फायदेशीर ठरते. आवळ्याचा रस हृदयाला खूप जलद फायदे पोहोचवतो, असे अनेक अभ्यासांमध्ये दिसून आले आहे. कच्च्या आवळ्याऐवजी आवळ्याचा रस प्यायळ्याने त्यातील पोषक तत्वे पुरेपूर प्रमाणात शरीराला मिळतात. त्यामुळेच तुम्ही आवळ्याचा रस आठवड्यातून एकदा तरी प्यायलाच हवा पण योग्य प्रमाणातच. तुम्ही जर आवळ्याला पाहून नाकं मुरडत असाल तर ही तुमची एक मोठी चूक ठरू शकते.
(वाचा :- Holi 2023 : बापरे, समोशात ठासून भरलेली ही एक भाजी देते कॅन्सरच्या पेशींना जन्म, या लोकांनी टेस्ट करणंही विषारी)​

आवळ्याचा ज्यूस कसा बनवावा?

आवळ्याचा ज्यूस कसा बनवावा?

आवळ्याचा ज्यूस बनवण्याची प्रक्रिया अगदी सोप्पी आहे.

  1. सर्वात आधी 2-3 आवळे चिरून घ्या
  2. पुढे 1 ते 2 कप पाण्यासोबत आवळ्याचे तुकडे ब्लेंडरमध्ये ब्लेंड करून घ्या
  3. आवळा ज्यूस थोडा चवदार बनवण्यासाठी त्यात थोडेसे आले, मिरपूड, मध आणि मीठ देखील तुम्ही घालू शकता
  4. सर्व गोष्टी घातल्यावर हे मिश्रण नीट मिक्स करा आणि शेवटी अस्सल व ताजा ताजा ज्यूस मिळवण्यासाठी हे सर्व मिश्रण गाळून घ्या
  5. तुम्ही रोज थोड्या थोड्या ज्यूसचे सेवन करू शकता.
हेही वाचा :  ... म्हणून त्याने माझ्यावर कोयत्याने वार केला; पुण्याच्या तरुणीनेच सांगितलं नेमकं काय घडलं?

(वाचा :- Milk in Weight Loss : दूध पिणा-यांचे वजन व चरबी कधीच होत नाही कमी? हेल्थ कोचने केला यामागील सायंटिफिक खुलासा)​

आवळ्यापासून काय काय मिळते?

आवळ्यापासून काय काय मिळते?

आवळ्याला इंग्रजीत Indian Gooseberry असेही म्हणतात. फक्त 100 ग्रॅम आवळा खाल्ल्याने तुम्हाला 20 संत्र्यांएवढे व्हिटॅमिन सी मिळू शकते. या पोषक तत्वांव्यतिरिक्त आवळ्याचे सेवन केल्याने हृदयासाठी आवश्यक असलेले व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए, लोह, कॅल्शियम, प्रोटिन, कार्ब्स, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मिळू शकतात. म्हणूनच सध्या आवळ्याला मोठी मागणी असून जगभरात मोठ्या प्रमामावर आवळा ज्यूसची प्रसिद्धी वाढते आहे.
(वाचा :- छातीत जडपणा, धाप लागणं, ऑक्सिजनची कमतरता जाणवते? फुफ्फुसातील घाण काढून श्वास स्वच्छ करतात हे 5 आयुर्वेदिक उपाय)​

आवळा ज्युसचे इतर फायदे

आवळा ज्युसचे इतर फायदे

नियमितपणे एक ग्लास आवळा ज्यूस प्यायल्याने तुमच्या त्वचेची जवळपास प्रत्येक समस्या दूर होईल, अर्ली एजिंगचे अर्थात म्हातारपणाची सर्व लक्षणं दूर करण्याची शक्ती या आवळ्याच्या ज्यूसमध्ये आहेत. जसे की मुरूम, ऐक्ने, सुरकुत्या, रॅशेज, डलनेस, त्वचेच्या आतील सूज इत्यादी! म्हणून रोज एक ग्लास आवळ्याचा ज्यूस प्या आणि त्वचा निरोगी राखण्यासोबत काळे, लांबसडक आणि घनदाट केस सुद्धा मिळवा. तुमचे सौंदर्य वाढवण्याचा असा आहे हा सर्वात साधा सोप्पा आवळ्याच्या ज्यूसचा उपाय!
(वाचा :- Papaya Water : कॅन्सरच्या पेशी मुळापासून सुकवून टाकतं पपईचं पाणी, पोटातून खेचून घेतं सर्व घाण, या पद्धतीने खा)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

हेही वाचा :  Ashadhi Ekadashi : माऊलींच्या पादुकांचं आज निरा स्नान, संत सोपानकाका यांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगणSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

रवींद्र वायकर यांच्या खासदारकीच्या वादात मोठा ट्विस्ट! उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाविरोधात हायकोर्टात याचिका

Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात, मुंबई उच्च न्यायालयात याचिका …

कल्याण लोकसभेची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी; रस्त्यावर सापडले शेकडो मतदार ओळखपत्र

Kalyan Lok Sabha : ठाकरे गटाने कल्याण लोकसभेमधील संपूर्ण निवडणूक ही संशयास्पद असून पुन्हा एकदा …