नव्या आयुष्याची पुन्हा सुरूवात करतेय दलजीत, हळदीमध्ये न्हाऊन निघाली

प्रत्येकाला वाईट आयुष्यातून पुन्हा प्रेमात पडण्याचा आणि आपलं आयुष्य नव्याने सुरूवात करण्याचा हक्क आहे. अभिनेत्री दलजित कौरदेखील नव्या वाटचालीसाठी सज्ज झाली आहे. उद्योजक निखिल पटेल यासह लग्नगाठ बांधण्यास दलजित तयार असून हळदीचा लुक समोर आला आहे.

नुकताच मेहंदीचा फोटो दलजीने शेअर केला होता. यामध्ये मिनी ड्रेस घालून दलजीत अत्यंत सुंदर आणि आनंदी वाटत होती. तर आता सोशल मीडियावर तिच्या हळदीचे फोटोही व्हायरल होऊ लागलेत. निखिल पटेलसह दलजीत अत्यंत आनंदी दिसत असून पाहा तिचा लुक (फोटो सौजन्य – @kaurdalljiet Instagram)

एकमेकांसह नव्या वाटचालीची सुरूवात

एकमेकांसह नव्या वाटचालीची सुरूवात

दलजीत आणि निखिल दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. दोघांनीही मॅचिंग पिवळ्या रंगाचे कपडे घातले आहे. तर रोमँटिक पोझ देत दोघेही खूप आनंदी असल्याचे दिसून येत आहे. दलजितने पिवळ्या रंगाची साडी आणि निखिलने पिवळ्या रंगाचा कुरता घातला आहे.

मॅचिंग दागिने

मॅचिंग दागिने

दलजितने आपल्या हळदीच्या कार्यक्रमाला पिवळ्या साडीसह निळा ब्लाऊज मॅच केला आहे. या लुकसाठी तिने अत्यंत सुंदर हेअरस्टाईल, मॅचिंग दागिन्यांचा वापर केला आहे.

हेही वाचा :  राडारोडा वाहतूक करताना वायू प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन; मुंबईत लाखोंची दंड वसुली

(वाचा – ‘ये रेशमी झुल्फे ये शबनमी आँखे’, मराठमोळ्या मृणालच्या नैसर्गिक सौंदर्याचा कहर)

ग्लॉसी लुक

ग्लॉसी लुक

नववधूच्या चेहऱ्यावरील आनंद लपता लपत नाहीये. तर तिने हा लुक पूर्ण करण्यासाठी ग्लॉसी मेकअपचा आधार घेतलाय. नैसर्गिक तरीही ग्लॉसी असा मेकअप करून लुक अधिक आकर्षक केलाय.

(वाचा – Exclusive: ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलच्या कुरत्यांची वेगळीच कमाल, नृत्यच नाही तर फॅशनही अनोखी)

हळदीच्या रंगात न्हाऊन निघाले

हळदीच्या रंगात न्हाऊन निघाले

मोत्यांचे दागिने आणि त्यासह अत्यंत साधा मात्र एलिगंट लुक दलजितने केला आहे. तर फुलांचे दागिनेही यासह घातले आहेत.

(वाचा – ‘मी भिजून पुरी आता झाले ओली’…अश्विनी कासारचा वेड लावणारा लुक, हिरव्यागार साडीतील फोटो तुफान व्हायरल)

मुलासह केले मॅच

मुलासह केले मॅच

निखिल आणि दलजितचा मुलगा जेडेननेदेखील मॅचिंग कपडे घातले आहेत आणि निखिलच्या मुलीचीही या लग्नाला उपस्थिती दिसून आली. साधा तरीही आकर्षक असा लुक सर्वांनी केल्याचे दिसून आले.

पुन्हा एकदा दलजीतच्या आयुष्यात आलेला आनंद पाहून तिचे मित्रमैत्रिणी सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव करताना दिसून येत आहेत.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …