‘ही गुलाबी हवा’ प्राजक्ताकडे पाहून कलेजा खलास झाला, सौंदर्यवतीच्या अदांनी चाहते घायाळ

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये सुरूवातीपासून प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारी प्राजक्ता ही महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आहे. तिच्या फॅशन स्टाईलदेखील फॉलो केल्या जातात. तर तिची फॅशन अनेकांना आवडते. प्राजक्ता नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने गुलाबी साडीतील फोटो शेअर केले असून या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसून येत आहे. कशी आहे प्राजक्ताच्या या साडीची स्टाईल पाहूया. (फोटो सौजन्य – @prajakta_official Instagram)

​जरीच्या साडीत सजून धजून​

​जरीच्या साडीत सजून धजून​

प्राजक्ताने नेसलेली ही साडी सिल्कची असून ती कॅरी करणं अधिक सोपं आहे. हलकी असल्याने आणि सिल्क असल्याने यामध्ये तुमची फिगरही व्यवस्थित दिसते. मुळात ही साडी शरीरयष्टीवर चापूनचोपून बसते. त्यामुळे ती अधिक सुंदर दिसते. गडद गुलाबी रंगाच्या या साडीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

​मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाऊज आणि झाडाची नक्षी​

​मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाऊज आणि झाडाची नक्षी​

या साडीसह प्राजक्तने त्याच रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज घातला असून याची पाठ अधिक डीप ठेवण्यात आली आहे. त्यामुळे साडी आणि ब्लाऊजचे कॉम्बिनेशन हे अधिक खुलून आले आहे. तर साडीवरील झाडाचे नक्षीकाम हे डोळ्यांना आकर्षिक करत आहे.

हेही वाचा :  प्राजक्ता माळीच्या भाळी चंद्रकोर, नाकात नथ नऊवारीत मराठमोळा साज

(वाचा -मराठमोळ्या तेजस्वीचे साडीतील तेजस्वी रूप, डोळ्यांचे पारणे फिटेल असा लुक)

​लाईट पिंक सिल्व्हर कानातले​

​लाईट पिंक सिल्व्हर कानातले​

या साडीसह प्राजक्ताने लाईट पिंक सिल्व्हर कानातले घातले असून हे मोठे कानातले आहेत. त्यामुळे तिने साडी नेसल्यावर अधिक कोणत्याही दागिन्यांचा वापर केलेला नाही. केवळ कानातले घालून तिने लुक पूर्ण केला आहे.

(वाचा – अभिनेत्री मानवी गागरूचे ‘शुभमंगल सावधान’, कॉमेडियन कुमार वरूणशी बांधली लग्नगाठ)

​पफ बन हेअरस्टाईल​

​पफ बन हेअरस्टाईल​

साडीचा लुक अधिक उठून दिसावा यासाठी प्राजक्ताने पफ बन हेअरस्टाईल केली असून बाजूला एक केसांची बटही काढली आहे. ज्यामुळे तिच्या सौंदर्यात अधिक भर पडत आहे. अशा साडीवर तुम्ही बन स्टाईल करून त्यात गजराही माळू शकता.

(वाचा -घटस्फोटाच्या चर्चेनंतर साडीच्या अनारकलीत मानसी नाईकचा खास अंदाज, हातभर चुड्याने वेधले लक्ष)

​मॅट मेकअप लुक​

​मॅट मेकअप लुक​

प्राजक्ताने मिनिमल मेकअप करत आपला लुक मॅट ठेवला आहे. यामध्ये तिने हायलाटर, लायनर आणि लिपस्टिकचा वापर केला आहे. साडी गडद गुलाबी रंगाची असल्यामुळे माईल्ड गुलाबी रंगाची लिपस्टिक प्राजक्ताने लावली असून लुक पूर्ण केला आहे.

तुम्हीही एखाद्या फंक्शनसाठी प्राजक्ताच्या गुलाबी साडीवरून प्रेरणा घेऊन असा लुक करू शकता. ही स्टाईल फॉलो करणं अत्यंत सोपं आहे.

हेही वाचा :  चेन्नई सुपर किंग्जच्या शिवम दुबेची फिल्मी लव्ह स्टोरी, समाजाची बंधने झुगारून केले होते अंजुम खानशी लग्न

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …