चेन्नई सुपर किंग्जच्या शिवम दुबेची फिल्मी लव्ह स्टोरी, समाजाची बंधने झुगारून केले होते अंजुम खानशी लग्न

चेन्नई सुपर किंग्जसाठी IPL 2022 मध्ये शिवम दुबेने अत्यंत चांगली कामगिरी केली होती. पण त्याला प्रत्येक मॅच खेळण्याची संधी मिळाली नाही. पण शिवमने चांगली कामगिरी करत अनेक चाहत्यांवर आपली छाप सोडली आहे. यावर्षी लवकरच IPL सुरू होईल आणि यावर्षीदेखील शिवम चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू म्हणून खेळणार आहे. २०२१ मध्ये शिवमने आपल्या गर्लफ्रेंडसोबत लग्न केलं पण हे लग्न इतकं सोपं नव्हतं कारण त्यात होते धर्माचे बंधन. अनेक वर्ष डेट करत असलेल्या अंजुम खानसह शिवमने अखेर लग्नगाठ बांधली. कशी आहे शिवम-अंजुमची लव्ह स्टोरी घ्या जाणून. (फोटो सौजन्य – @dubeshivam Instagram)

​सोपे नव्हते लग्न करणे धर्माची होती बंधने​

​सोपे नव्हते लग्न करणे धर्माची होती बंधने​

शिवमने १६ जुलै, २०२१ मध्ये आपली गर्लफ्रेंड अंजुम खान हिच्यासह लग्नगाठ बांधली. मात्र लग्न करणे दोघांसाठीही सोपे नव्हते. अनेक वर्ष वाट पाहिल्यानंतर दोघांनी लग्न केले. हिंदू – मुस्लीम लग्न असल्यामुळे दोघांनाही अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता. मात्र अखेर प्रेम जिंकले आणि दोघांनी लग्न केले. ‘हमने प्यार से प्यार किया जो मोहब्बत से ज्यादा था’ असं सोशल मीडिया फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हणत आता आमच्या आयुष्याला सुरूवात झाली आहे असं शिवमने आपलं प्रेम व्यक्त केलं होतं.

हेही वाचा :  WhatsApp वर तीन ब्लू टिक म्हणजे सरकार तुमचे मेसेज पाहातंय? व्हायरल होणाऱ्या 'त्या' मेसेजमागील सत्य काय?

​हिंदू – मुस्लीम दोन्ही परंपरेनुसार झालं लग्न​

​हिंदू - मुस्लीम दोन्ही परंपरेनुसार झालं लग्न​

सोशल मीडियावर दोघांच्याही लग्नाची खूपच चर्चा झाली होती. तर मुंबईमध्ये हिंदू आणि मुस्लीम दोन्ही धर्माच्या पद्धतीनुसार हे लग्न करण्यात आले होते. दोघांच्या कुटुंबासह अनेक खेळाडूदेखील या लग्नाला हजर राहिले होते. उत्तर प्रदेशातील अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीमधून फाईन आर्टचे शिक्षण अंजुमने पूर्ण केले असून दोघेही अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते.

(वाचा – धर्माच्या भिंती ओलांडून अखेर अभिनेत्री स्वरा भास्करने बांधली फहाद झिरार अहमदशी लग्नगाठ)

​अनेक वर्ष डेट केल्यानंतर केले लग्न​

​अनेक वर्ष डेट केल्यानंतर केले लग्न​

शिवम दुबे आणि अंजुम खान एकमेकांना अनेक वर्ष ओळखत होते. अनेक वर्ष डेट केल्यानंतरच लग्नाच्या बंधनात अडकण्याचा निर्णय दोघांनाही घेतला. वेगवेगळे धर्म असूनही दोघांना आपल्या प्रेमावर आणि एकमेकांवर विश्वास होता आणि म्हणूनच इतक्या वर्षानंतरही ठाम राहात दोघांनी लग्न केले. दोन्ही कुटुंबांचे आशिर्वाद घेत हे लग्न पार पडले होते.

(वाचा – पहिल्याच भेटीत झाले लिपलॉक, लग्नासाठी करिअरही सोडलं पण झाला घटस्फोट, अमृता-सैफची अधुरी कहाणी)

​केली होती सिक्रेट डेटिंग ​

​केली होती सिक्रेट डेटिंग ​

शिवम आणि अंजुमच्या प्रेमाबद्दल कोणालाही अजिबात माहीत नव्हते. दोघांनीही सिक्रेट डेटिंग केली होती. धर्म वेगवेगळे असल्यामुळे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत दोघांनीही याबाबत कोणाकडे वाच्यता केली नव्हती. अनेक जणांना शिवम सिंगल वाटत होता. पण अचानक लग्न करून सर्वांनाच त्याने आश्चर्याचा धक्का दिला होता.

हेही वाचा :  रशियाने फिरण्यासाठी आलेल्या 7 भारतीयांना जबरदस्ती युद्धात उतरवलं; शेअर केला 105 सेकंदाचा व्हिडीओ

(वाचा – धर्माची भिंत तोडून सलमानच्या आई-वडिलांनी केले लग्न, सुशीलाच्या प्रेमासाठी सलीम खान झाले शंकर)

​लग्नानंतर एका वर्षातच दिला मुलाला जन्म​

​लग्नानंतर एका वर्षातच दिला मुलाला जन्म​

अंजुम आणि शिवमला एक गोंडस मुलगा असून लग्नानंतर एका वर्षातच मुलाला जन्म दिला. शिवम ऑलराऊंडर म्हणून खेळत असून चेन्नई सुपर किंग्जचा एक अविभाज्य भाग बनला आहे. मागच्या वर्षी शिवमने चांगली कामगिरी करत यावर्षीदेखील आपली टीममधील जागा भक्कम केली असल्याचे दिसून येत आहे.

प्रेमापुढे जात, धर्म हे नेहमीच दुय्यम ठरते हे अनेक जोडप्यांनी सिद्ध केले आहे. अनेक क्रिकेटर्स असो वा सेलिब्रिटी त्यांनी नेहमीच प्रेमाला महत्त्व दिले आहे.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …