‘राज्यपालांनी मूर्खपणा…;’ कोश्यारींच्या शिवाजी महाराजांबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यावर बच्चू कडू संतापले


त्यांचं वाचन विचित्र पुस्तकांकडे गेले असेल, असा टोलाही बच्चू कडू यांनी राज्यपालांना लगावला.

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्षेप घेत निषेध नोंदवला. तसेच राज्यपालांनी माफी मागावी, अशी मागणी उचलून धरली. राज्यापालांच्या या वक्तव्यावर राज्यमंत्री बच्चू कडूंनी संताप व्यक्त केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावर आठवले म्हणतात, “माफी मागण्याची…”

“राज्यपाल हे खूप मोठं पद आहे. त्यांनी पदाचा गरीमा राखणं गरजेचं आहे. त्यांच्या बोलण्याच्या शब्दांवर ओळी, पुस्तक तयार होतात. राज्यपालांनी महापुरुषांबद्दल तुलनात्मक बोलणं हे अतिशय निंदनीय आहे. असा मूर्खपणा कोणी केला नसेल, असा त्यांनी केला आहे. त्यांनी दिलगिरी व्यक्त केलीय. त्यांचं वाचन विचित्र पुस्तकांकडे गेले असेल कदाचित. आपण काय वाचतो आणि काय बोलतो, याबद्दलचं त्यांनी भान ठेवायला पाहिजे,” असा सल्ला बच्चू कडू यांनी दिला.

हा सगळा श्रेयवादाचा प्रकार

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुटकेबद्दल बोलतना कडू म्हणाले की, “केंद्रीय यंत्रणा सर्व करत आहेत. हे करणं सरकारचं कर्तव्य आहे. श्रेय घ्यायचं काय कारण आहे. एखादा तहानलेला माणूस आला आणि पाणी पाजलं. तेव्हा बोंबलत असेल की मी पाणी पाजलं हे योग्य नाही. श्रेय कुठं घेतलं पाहिजे आणि कुठं नाही, याचं भान असणं गरजेचं आहे,” असंही बच्चू कडू म्हणाले.

हेही वाचा :  Chamma Chamma गाण्यात उर्मिलाने मातोंडकरने घातले होते, १५ किलो दागिने अन् ५ किलोचा…



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’, उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका

Shinde vs Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने राजकीय वातावरण तापू लागलं आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू …

वसईतील बिबट्या पकडला, मात्र आता भाईंदरमध्ये मोकाट फिरतोय बिबट्या, CCTV Video समोर

Trending News Today: वसई किल्ला परिसरात गेल्या 25 दिवसांपासून धुमाकुळ घालणाऱ्या बिबट्याला मंगळवारी जेरबंद करण्यात …