पोटाची लटकणारी चरबी जाळून मिळवायचंय सपाट पोट व आकर्षक फिगर? मीठ खाताना करा हे काम व बघा कमाल

पोटाची चरबी अर्थात वाढलेलं Belly Fat ही एक अशी गोष्ट आहे जी कोणालाच नको असते. पण तरीही ती आपल्याला दानात मिळतेच आणि त्याला कारणीभूत देखील आपण स्वत:च असतो. पोटाची चरबी वाढण्यामागे काही कारणं असतात. या कारणांवर उपाय करूनच ही चरबीची समस्या कमी करता येते आणि पोट पुन्हा सामान्य आकारात किंवा सपाट करता येऊ शकते. आता प्रश्न उरतो की मोठे पोट कमी कसे करावे?

तर मंडळी, पोटाची चरबी खूप वाढली की पोट लटकायला लागते. या मोठ्या पोटापासून सुटका करण्यासाठी साधंसं मीठ तुमची मदत करू शकतं. आता तुम्ही म्हणाल मिठाने पोट कसे कमी होऊ शकते? तर मंडळी हे खरंच शक्य आहे. फक्त या मिठाचा वापर करण्याची एक खास ट्रिक आहे जी तुम्हाला जमली पाहिजे. आज या लेखातून आपण हेच जाणून घेऊया की मिठाचा वापर करून तुम्ही कशाप्रकारे पोट कमी करू शकता किंवा पोट कमी करण्यासाठी मिठाचा कोणत्या पद्धतीने वापर करायचा आहे. (फोटो सौजन्य :- iStock)

हेही वाचा :  मुख्यमंत्री नाराज आहेत का? अजित पवार म्हणतात, 'जबाबदारीने बोलायला हवं'

पोटाची चरबी देते समस्यांना आमंत्रण

पोटाची चरबी देते समस्यांना आमंत्रण

पोटाची वाढलेली चरबी ही एक सामान्य समस्या आहे असा कधीच विचार करू नका. कारण वाढलेली चरबी अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते. यामुळे खूप अडचणी निर्माण होतात. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या मते, पोटावरील चरबीमुळे मेटाबॉलिज्म किंवा चयापचय क्रियेमध्ये अडथळा येऊ शकतो. ज्यामुळे हृदयरोग आणि टाइप 2 डायबिटीज देखील होऊ शकतो.

(वाचा :- Mental Health : स्ट्रेस व डिप्रेशन पहिल्या स्टेजचे मानसिक आजार, त्याहीपेक्षा या 8 गोष्टी करतात आयुष्य उद्धवस्त)​

मीठ मित्र आहे की शत्रू?

मीठ मित्र आहे की शत्रू?

आपण ज्याला मीठ म्हणतो, त्याला शास्त्रज्ञ मेडिकल भाषेत सोडियम म्हणतात. सोडियम हे शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानले जाते. शिवाय सोडियममुळे अन्नपदार्थांची चव देखील वाढते. पण याचा अर्थ असा नाही की त्याचा कसाही वापर करावा. कारण कोणत्याची गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. कारण PubMed Central वर प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात म्हटले आहे की, जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने शरीरातील पाणी वाढते, ज्यामुळे शरीर फुगते.
(वाचा :- Weight Loss Food : हे 8 पदार्थ मनसोक्त खाल्ले तरी वाढणार नाही टिचभरही वजन, 40 पेक्षाही कमी कॅलरीने भरलेत ठासून)​

मिठाने वाढते कॅलरी

मिठाने वाढते कॅलरी

पोटावरील चरबीपासून मुक्त होण्यासाठी कमी कॅलरीयुक्त अन्नपदार्थ खाणे आवश्यक आहे. परंतु मिठाचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांमध्येही कॅलरीज जास्त असतात. त्यामुळे दोन्ही मिळून तुमचे पोट कमी होऊ देत नाही आणि लठ्ठपणा वाढत जातो.

हेही वाचा :  शरद पवारांची 'लेडी जेम्स बॉन्ड'; संकटाच्या काळात खंबीर साथ देणारी 'ती' आहे तरी कोण?

(वाचा :- Cancer Fever Symptoms : ज्याला तुम्ही साधारण ताप समजत आहात तो असू शकतो कॅन्सरचा ताप, या 5 लक्षणांवरून ओळखा..!)​

वेटलॉससाठी मीठ खाताना काय करावे?

वेटलॉससाठी मीठ खाताना काय करावे?

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला मीठ खाताना एक मस्त ट्रीक वापरावी लागेल. या टिपमध्ये, तुम्हाला मिठाचा वापर मर्यादित करावा लागेल, ज्यामुळे शरीराला फुगवणारे पाणी कमी होते. त्यामुळे मीठ किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात असलेले पदार्थ खाणे कमी करा.
(वाचा :- पोट सतत टम्मं फुगतं व साफ होत नाही, भूक लागत नाही, मग खा Gas-Acidity एका झटक्यात मुळापासून उपटणारे हे 8 पदार्थ)​

हे फुड्स कमी करा

हे फुड्स कमी करा
  1. पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज सारखे जास्त प्रक्रिया केलेले आणि खारट पदार्थ
  2. चिप्ससारखे पाकिटबंद असलेले खारट पदार्थ
  3. प्रक्रिया केलेले मांस
  4. खूप खारट भाजी

असे पदार्थ तुम्ही आहारात जास्त वापरू नका. कारण यामुळे तुमचा आहार संतुलित राहणार नाही.
(वाचा :- How to Lower Ammonia : डायबिटीजपेक्षाही भयंकर अमोनिया रक्तात घुसून सडवतो किडनी व लिव्हर, ताबडतोब करा हे 5 उपाय)​

मिठाला पर्याय असणारे पदार्थ

मिठाला पर्याय असणारे पदार्थ

मीठ कमी करून जेवणाची चव कमी होईल याची काळजी करू नका. कारण, या ऐवजी, लिंबाचा रस, फ्रेश हर्ब्स, लसूण आणि इतर मसाले यांसारख्या इतर काही गोष्टी तुम्ही स्वयंपाकात वापरू शकता.
(वाचा :- Blood Cleansing Foods : ही 5 लक्षणं सांगतात रक्त झालंय दुषित, विषारी घटकांचा कणन् कण बाहेर फेकतात हे 8 पदार्थ)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

हेही वाचा :  स्वस्तात मिळणारा हिरवा मटार या पद्धतीने करा स्टोअर, वर्षभर टिकेल होणार नाही खराब

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

रवींद्र वायकर यांच्या खासदारकीच्या वादात मोठा ट्विस्ट! उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाविरोधात हायकोर्टात याचिका

Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात, मुंबई उच्च न्यायालयात याचिका …

कल्याण लोकसभेची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी; रस्त्यावर सापडले शेकडो मतदार ओळखपत्र

Kalyan Lok Sabha : ठाकरे गटाने कल्याण लोकसभेमधील संपूर्ण निवडणूक ही संशयास्पद असून पुन्हा एकदा …