‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद ओकचे घर आहे आशियाना, इंटिरिअरने डोळे दिपतील

‘धर्मवीर’ आणि ‘चंद्रमुखी’ असे दोन्ही चित्रपट मागच्या वर्षी गाजले आणि इंडस्ट्री दणाणली ती प्रसाद ओकच्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने. प्रसाद ओक हे नाव अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ प्रसादशिवाय सुनीसुनी वाटते. प्रसादने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपटांमधून अभिनय केला आहे. तर चित्रपट दिग्दर्शितही केले आहेत. पण २०२२ हे खऱ्या अर्थातने प्रसादने सगळ्या बाजूने गाजवलं. प्रसादचे चित्रपट जसे क्लासिक असतात तसंच त्याचे घरही क्लासिक आहे. त्याच्या चाहत्यांना नक्कीच त्याचे घर कसे आहे जाणून घ्यायची उत्सुकता आहेच. पाहुया प्रसादच्या घराची झलक, ज्यावरून तुम्हीही घेऊ शकता इंटिरिअरची प्रेरणा. (फोटो सौजन्य -@manjiri_oak आणि @oakprasad Instagram)

​प्रवेश केल्यानंतर कुटुंबातील व्यक्तीच्या नावाच्या पाट्या​

​प्रवेश केल्यानंतर कुटुंबातील व्यक्तीच्या नावाच्या पाट्या​

संपूर्ण जग फिरून आलो तरीही आपलं कुटुंब हेच सर्वस्व असतं. प्रसादच्या घरात प्रवेश केल्यानंतर स्वामींची फ्रेम आणि त्याचे, बायकोचे आणि दोन्ही मुलांची नावं असलेल्या पाट्या दिसून येतात. ही अत्यंत सुंदर कल्पना आहे. तर घराचे इंटिरिअर करताना स्टोन वॉलचा वापर करून त्यावर या पाट्यांचा वापर केल्यास अधिक उठावदार दिसतात.

हेही वाचा :  मुळव्याध आणि बद्धकोष्ठतेला इंग्लिश टॉयलेटच जबाबदार, नेमकं काय चुकतं? काय कराल

​कॉरिडोअरमध्ये ऑफव्हाईट भिंतीवर फ्रेम्स​

​कॉरिडोअरमध्ये ऑफव्हाईट भिंतीवर फ्रेम्स​

कॉरिडोअरमध्ये जागा मोकळी असली तरीही तिथल्या भिंती सुन्यासुन्या न ठेवता आपल्या आवडत्या चित्रांच्या अथवा आर्ट्सच्या अथवा आपल्या घरातील जवळच्या माणसांच्या फ्रेम्स तुम्ही डेकोरेट करू शकता. तसंच प्रसाद आणि मंजिरीने रंगबेरंगी लाकडी फ्रेम्सच्या डोअरचादेखील वापर केला असून यामुळे घराला अधिक सुंदरता प्राप्त झाली आहे.

(वाचा – Living Room सजवण्याच्या सोप्या ७ पद्धती, लहान जागाही भासेल मोठी)

​लिव्हिंग रूमच्या एका कोपऱ्यात टेबल आणि बैठक स्वरूपातील मांडणी​

​लिव्हिंग रूमच्या एका कोपऱ्यात टेबल आणि बैठक स्वरूपातील मांडणी​

​लिव्हिंग रूममध्ये खिडकी असेल आणि पुढे जागा असेल तर त्याजवळ लाकडी टेबल ठेऊन त्यावर बैठक स्वरूपातील मांडणी अत्यंत सुंदर दिसते. घरात अचानक पाहुणे आल्यानंतर खुर्ची सोफा कमी पडत असेल तर अशी बैठक नेहमीच शाबासकी घेऊन जाते. यासह बाजूला इनडोअर प्लांटदेखील शोभा वाढवते.

(वाचा – ‘स्ट्रगलर साला’ ते स्वतःच्या घराचा प्रवास, कुशल बद्रिकेच्या घराची मराठमोळी सुबक मांडणी)

​सोफा आणि कुशन कव्हर्ससाठी वायब्रंट कलर्स​

​सोफा आणि कुशन कव्हर्ससाठी वायब्रंट कलर्स​

तुमच्या घराच्या भिंती ऑफव्हाईट असतील तर त्यावर जास्त कोणतेही प्रयोग न करता तुम्ही सोफ्याचे कव्हर्स आणि कुशन कव्हर्स रंग नेहमी वायब्रंट निवडावे. यामुळे घरात सकारात्मकता राहाते. मंजिरी आणि प्रसादने घर अत्यंत विचारपूर्वक सजवल्याचे दिसून येते.

हेही वाचा :  Siddharth Jadhav : अन् 'आपला सिद्धू' भाव खाऊन गेला...

(वाचा – आलिशान घर आणि क्लासिक फर्निचर, अशी आहे श्रेया बुगडेच्या घराची सुबक मांडणी)

​जेवणाची भारतीय बैठक​

​जेवणाची भारतीय बैठक​

बऱ्याच घरांमध्ये डायनिंग टेबल असते. पण आरोग्य उत्तम राखायचे असेल तर भारतीय बैठक हा उत्तम पर्याय आहे. जमिनीवर बसून जेवण्याचे अनेक फायदेआहेत. मात्र नुसतीच जमीन असण्यापेक्षा त्यावर हल्ली ट्रेंडमध्ये असणारे कारपेट फ्लोअर अधिक सुंदर दिसते. यामुळे घराला वेगळाच लुक मिळतो आणि एकत्र बसून जेवण्याच आनंदही घेता येतो. प्रसाद आणि मंजिरीची ही कल्पना नक्कीच प्रेरणादायक आहे.

​ब्राऊन दरवाजे​

​ब्राऊन दरवाजे​

पांढरा अथवा ऑफ-व्हाईट रंग दरवाजांना दिल्यास, तो लवकर खराब होतो. पण तुमच्या फ्लोअर कारपेट आणि स्टोन वॉलचा रंग ब्राऊन असेल तर दरवाजालाही तशाच रंगाला प्राधान्य दिल्यास घराला रॉयल लुक मिळतो. प्रसादच्या घराचे दरवाजेदेखील इंटिरिअरला मॅच होणारेच आहेत.

साधे, पारंपरिक आणि आधुनिकतेचा मेळ घातलेले इंटिरिअर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही प्रसाद आणि मंजिरी ओकच्या घरावरून नक्कीच प्रेरणा घेऊ शकता.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

हेही वाचा :  'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे'चा दुसरा भाग 2024 मध्ये येणार

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …