बापरे, मेंदू ते हाडे सर्वांचा भुगा करते सेरोटोनिनची कमी, पोट साफ होण्यासाठी खा हे 5 पदार्थ

Serotonin Rich Foods :– तुमची मनःस्थिती अनेकदा विनाकारण खराब असेल, उदास वाटत असेल किंवा चिडचिड होत असेल तर ते तुमच्या शरीरातील सेरोटोनिनच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट आणि डाएटिशियन लवनीत बत्रा यांच्या मते, ट्रिप्टोफेनयुक्त (Tryptophan) पदार्थ खाल्ल्याने शरीरातील सेरोटोनिनचे उत्पादन वाढण्यास मदत होते. ट्रिप्टोफेन हे एक अमीनो अ‍ॅसिड आहे जे सेरोटोनिनचे उत्पादन वाढवते. यामुळे तुमचा मूड चांगला व रिफ्रेश होता आणि आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो.

सेरोटोनिन हे एक रसायन आहे. मूड, झोप, पचन, मळमळ, जखमा ब-या करण्यासाठी, हाडांच्या आरोग्यासाठी, रक्त गोठणे आणि लैंगिक इच्छा यासारख्या शरीराच्या कार्यांमध्ये ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. आज आपण सेरेटोनिन वाढवणाऱ्या पदार्थांबद्दल खास माहिती जाणून घेऊया, ज्यांचा तुम्ही तुमच्या आहारात समावेश केला पाहिजे. (फोटो सौजन्य :- iStock)

सेरोटोनिनची लेव्हल नैसर्गिकरित्या वाढवणारे पदार्थ

केळी

केळी

केळ्यामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो अॅसिड असते. शरीर 5-HTP तयार करण्यासाठी ट्रिप्टोफॅन वापरते. हे एक संयुग आहे जे मूड वाढवणारे आणि झोपेला प्रोत्साहन देणारे सेरोटोनिन आणि मेलाटोनिन तयार करते.
(वाचा :- Satish Kaushik यांनी काल केला होळीचा आनंद साजरा व आज हार्ट अटॅकने मृत्यू, वाढलेलं वजन ठरलं हार्ट अटॅकचं कारण?)​

हेही वाचा :  Pune Bypoll Election : पुण्यात पोटनिडणुकीत धाकधूक वाढली, भाजपला का ठोकावा लागला तळ?

बदाम

बदाम

फोलेट आणि मॅग्नेशियमसह अनेक पोषक घटक बदामामध्ये आढळतात. सेरोटोनिन वाढवण्यासाठी मॅग्नेशियम आवश्यक आहे. हे मेंदूतील आनंदाच्या भावना वाढवण्याचे काम करते. बदामामध्ये व्हिटॅमिन बी 2 आणि ई देखील असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.

(वाचा :- किडनी 90% पेक्षा जास्त सडल्यास दिसतात ही घातक लक्षणं, रक्तातील घाण बाहेर फेकण्यासाठी करावीच लागते ही प्रक्रिया)​

गाईचे दूध

गाईचे दूध

गाईच्या दुधात ट्रिप्टोफॅन असते जे सेरोटोनिन तयार करणारे अमिनो अ‍ॅसिड असते. हे तुमच्या झोपण्याच्या पद्धती आणि मूड नियंत्रित करण्यास मदत करते. यामुळेच रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध पिण्याचा सल्ला दिला जातो.

(वाचा :- World Kidney Day: किडनी खराब झाल्यास दिसतात ही 8 लक्षणं, लघवीत जळजळ, फेसाळपणा, फिकट रंग दिसल्यास करा हे 4 उपाय)​

अननस

अननस

अननस केवळ व्हिटॅमिन सी चे भांडारच नाही तर त्यात ट्रिप्टोफॅन देखील असते जे मेंदूमध्ये सेरोटोनिनला प्रोत्साहन देते. याव्यतिरिक्त, अननसमध्ये ब्रोमेलेन प्रोटीन असते, जे शक्तिशाली एंटी-इंफ्लेमेटरी गुणांनी समृद्ध आहे.

(वाचा :- H3N2 Virus Cough Fever Home Remedies : नव्या व्हायरसचं जगावर सावट, ताप व खोकला सुरू होताच करा हे 8 घरगुती उपाय)​

हेही वाचा :  मुंबईलगतच्या शहरातील एका बस स्थानकाला दिले 'बांगलादेश'चे नाव, कारण...

सोया

सोया

डॉ. लवनीत यांच्या म्हणण्यानुसार, सोया उत्पादनांमध्ये ट्रिप्टोफॅन चांगल्या प्रमाणात आढळते. यासाठी तुम्ही तुमच्या जेवणात सोया दूध, सोया पनीर (टोफू) किंवा सोया दही इत्यादींचा समावेश करू शकता.
(वाचा :- International Women’s Day वयाच्या 30 आधीच खायला घ्या हे Vitamins व Mineral, नाहीतर येईल अंथरूणात खिळण्याची वेळ)​

सेरोटोनिनच्या कमतरतेमुळे होणारे नुकसान

सेरोटोनिनच्या कमतरतेमुळे होणारे नुकसान

सेरोटोनिनच्या कमी पातळीमुळे तुम्हाला चिंता, झोपेची समस्या, बद्धकोष्ठता, पॅनीक डिसऑर्डर, फोबिया आणि मानसिक आजार स्किझोफ्रेनियाचा धोका होऊ शकतो. सेरोटोनिन हार्मोन वाढवण्यासाठी तुम्ही वरील गोष्टींचे नियमित सेवन करायाला हवे.

(वाचा :- सुष्मिता सेनच्या नसांमध्ये 95% ब्लॉकेज, Artery Blockage दाखवते ही 8 भयंकर लक्षणं, बंद नसा उघडण्यासाठी 10 उपाय)​
डिस्क्लेमर: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मराठी माणूस यांची चड्डीपण..’, ‘बिनशर्ट’वरुन मनसेचा ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, ‘हिरव्या..’

Uddhav Thackeray Vs Raj Thackeray: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त दिलेल्या …

घरातील नोकरचाकरांना 654 रुपये पगार, पण कुत्र्यांवर खर्च केले 8,09,384; हे’ भारतीय अब्जाधीश कुटुंब अडकलं वादात

Hinduja Family Accused Of Exploiting Staff : जगभरातील अनेक धनाढ्य कुटुंबांविषयी, त्यांच्या जीवनशैलीविषयी सामान्यांना कायमच …