Weather Update : बुरा न मानो होली है…! होळीच्या दिवशी ‘या’ भागात पाऊस, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Weather Update of 4 march 2023: मार्च किंवा मे महिन्या म्हटलं की कडाक्याच्या उन्हाची अपेक्षा असते. त्यातच आता तीन दिवसावर होळी (Holi 2023) सण असतात हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.त्यामुळे बुरा न मानो होली है… (Bura Na Mano Holi Hain ) असं म्हणायला काही हरकत नाही. हवामान विभागाने ( Meteorological Department) राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. मागील काही वर्षात तापमानात होत असलेली वाढ चिंतेचा विषय ठरते. त्यामुळे यंदा उष्णतेची लाट येईल, असा अंदाज वर्तवला होता. पण उन्हाळा सुरू होण्याआधीच पाऊस (monsoon update) हजेरी लावण्याची शक्यता आहे.

5 मार्चला ‘या’ राज्यात पाऊस

5 मार्चला नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडू शकतो. तर विदर्भात 6 मार्चला सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.(Maharashtra Weather) उत्तर कोकणात सुद्धा पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात सुद्धा कमाल तापमानात सरासरीपेक्षा 2-3 अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हेही वाचा :  Mumbai-Pune प्रवास आणखी सुसाट! अवघ्या 90 मिनिटांत गाठता येणार पुणे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

वाचा: अरे देवा! पुन्हा पाऊस, होळीपूर्वी ‘या’ राज्यात 4 ते 6 मार्चदरम्यान पावसाची शक्यता

तर दुसरीकडे पावसाचा अंदाज महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून देशातील काही भागात ही पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासांत जम्मू-काश्मीरमधील 5 जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम हिमस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे.लोकांना पुढील सूचना मिळेपर्यंत उंच भागात जाण्यापासून दूर राहण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले. 

या 5 जिल्ह्यांमध्ये हिमस्खलनाचा इशारा

जम्मू आणि काश्मीर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (JKDMA) राज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये हिमस्खलनाचा इशारा जारी केला आहे. शुक्रवारी प्राधिकरणाने जारी केलेल्या इशाऱ्यानुसार, येत्या 24 तासांत राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये निम्न पातळीचे हिमस्खलन होऊ शकते. प्राधिकरणाने समुद्रसपाटीपासून 3500 मीटर उंचीवर राहणाऱ्या डोडा आणि किश्तवाड जिल्ह्यातील लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.तसेच येत्या २४ तासांत उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा, कुपवाडा आणि गांदरबल भागात हिमस्खलन होण्याचा धोका आहे. हे हिमस्खलन मध्यम पातळीचे असू शकते. 2500 मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या या भागात राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहावे आणि पुढील सूचना मिळेपर्यंत त्या उंचीवर जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

या भागात आज पावसाची शक्यता

स्कायमेटच्या खासगी हवामान संस्थेनुसार, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, लडाख, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये पुढील 24 तासांत हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टी होऊ शकते. उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात एक किंवा दोन ठिकाणी हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :  कपाळ फोडून घेऊ का? सकाळपासून मरमर काम करतो अन्... अजित पवार शिक्षकांवर वैतागले

होळीच्या दिवशी हवामान कसे असेल?

राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि विदर्भाच्या अनेक भागांमध्ये पावसाच्या गडगडाटाची सुरुवात होऊ शकते. गुजरातच्या काही भागात हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. होळीच्या दिवशी हवामान कोरडे राहू शकते. मात्र, डोंगराळ भागात काही ठिकाणी मेघगर्जनेसह शिडकावा होण्याची शक्यता आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …