ऑनलाइन UAN Activate करणे आहे खूपच सोपे, फॉलो करा या स्टेप्स

नवी दिल्ली: Online UAN: भारतातील प्रत्येक पगारदार कर्मचारी, ज्याची कंपनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) शी लिंक आहे त्यांनी युनिव्हर्सल अकाउंट नंबर किंवा UAN सक्रिय करणे आवश्यक आहे. याद्वारे, कर्मचारी कोणत्याही अडचणीशिवाय त्याच्या पीएफ खात्यातील सेवा जसे की शिल्लक तपासणे, पैसे काढणे आणि इतर सेवांमध्ये प्रवेश करू शकतील. कर्मचारी त्यांचे UAN ऑनलाइन देखील सक्रिय करू शकतात. UAN ऍक्टिव्हेशन, आवश्यक कागदपत्रे आणि UAN क्रमांक याबद्दल जाणून घेऊया.

वाचा: WhatsApp चे गिफ्ट, युजर्सना आता इंटरनेटशिवाय करता येणार चॅटिंग , पाहा डिटेल्स

UAN ऑनलाइन कसे सक्रिय करावे?

यासाठी प्रथम UAN नोंदणी किंवा सक्रिय करणे आवश्यक आहे. EPFO पोर्टलद्वारे UAN कसे सक्रिय करावे याबद्दल जाणून घेऊया. ही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी, तुमच्याकडे तुमचा UAN क्रमांक आणि PF सदस्य आयडी असणे आवश्यक आहे.

वाचा: Smartphone Tips: स्मार्टफोन चार्ज करताना या चुका टाळाच, बॅटरी चालेल वर्षानुवर्षे

तुमच्या डिव्हाइसवर वेब ब्राउझर उघडा आणि EPFO सदस्य पोर्टल उघडा. वेबसाइटच्या डॅशबोर्डवरील . Services पर्यायावर जा आणि ड्रॉप-डाउन मेनूमधून For Employees निवडा. UAN सदस्य पोर्टलमध्ये प्रवेश करण्यासाठी, सेवा विभागात ‘Member UAN/Online Service (OCS/OTCP)’ वर क्लिक करा. नवीन पेजच्या उजव्या बाजूला अनेक महत्त्वाच्या लिंक्स असतील, ज्यामध्ये तुम्हाला ‘Activate UAN’ पर्यायावर टॅप करावे लागेल. UAN, PF सदस्य आयडी, आधार कार्ड क्रमांक, नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड यासह आवश्यक माहिती एंटर करा. त्यानंतर नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP प्राप्त करण्यासाठी ‘गेट ऑथोरायझेशन पिन’ बटणावर क्लिक करा.

हेही वाचा :  महत्त्वाची बातमी! 1 एप्रिलपासून बदलणार हे नियम, दुर्लक्ष कराल तर होऊ शकतं नुकसान

पुढील पेजवर, तुम्हाला I Agree बॉक्सवर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला आधारवरून नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP मिळेल, तो भरा आणि ‘Validate OTP आणि Activate UAN’ वर क्लिक करा.

अशाप्रकारे तुमची UAN सक्रिय करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल . तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक पासवर्ड मिळेल, ज्याच्या मदतीने तुम्ही UAN सदस्य पोर्टलवर लॉग इन करू शकाल. लॉगिन करून, तुम्ही तुमच्या EPF खात्याचे तपशील जाणून घेऊ शकाल.

UAN सक्रिय करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

नोंदणीकृत कंपनीत तुमची ही पहिली नोकरी असेल तर तुम्हाला UAN नंबरसाठी तुमच्या कंपनीकडे काही कागदपत्रे जमा करावी लागतील. UAN क्रमांक एकदाच जनरेट केला जातो. यानंतर तुम्ही कंपनी बदलल्यास तुमचा UAN नंबर तसाच राहील.

UAN क्रमांकासाठी आवश्यक कागदपत्र:

बँक खाते तपशील: बँक खाते क्रमांक, IFSC कोड आणि बँकेच्या शाखेचे नाव.
आयडी प्रूफ : ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड किंवा SSLC बुक.
ऍड्रेस प्रूफ : तुमच्या नावावरील वीज, गॅस किंवा फोनचे बिल, रेशन कार्ड किंवा इतर कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र ज्यामध्ये तुमचा सध्याचा पत्ता आहे.

UAN क्रमांक जाणून घेण्याचे दोन मार्ग आहेत. तुम्ही तुमच्या कंपनीच्या किंवा ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटवरून जाणून घेऊ शकता.

हेही वाचा :  EPFO ची नवीन सर्विस ग्राहकांसाठी फायद्याची, कुठे आणि कधी मिळणार याचा फायदा? जाणून घ्या

EPFO सदस्य पोर्टलवरून UAN क्रमांक जाणून घेण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स:

सर्वप्रथम तुम्हाला EPFO सदस्य पोर्टलवर जावे लागेल. येथे तुम्हाला Services > For Employees वर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला सदस्य UAN/ऑनलाइन सेवा (OCS/OTCP) वर क्लिक करावे लागेल. असे केल्याने तुम्ही थेट UAN पोर्टलवर पोहोचाल. येथे तुम्हाला महत्त्वाच्या लिंक विभागात ‘Know Your UAN’ वर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड भरावा लागेल. आता तुम्हाला ‘Request OTP’ बटणावर क्लिक करावे लागेल.

मोबाईलवर प्राप्त झालेला OTP टाईप करावा लागेल आणि कॅप्चा कोड टाकताना ‘Validate OTP’ वर टॅप करावे लागेल. आता एक नवीन पेज उघडेल, येथे तुम्हाला तुमचे नाव, जन्मतारीख, आधार, पॅन, सदस्य आयडी आणि कॅप्चा कोड भरावा लागेल. यानंतर तुम्हाला Show My UAN बटणावर क्लिक करावे लागेल आणि तुम्हाला पुढील पेजवर UAN नंबर दिसेल.

वाचा: थंडीमुळे घराचं कुल्लू-मनाली झालय ? लगेच खरेदी करा हे Room Heaters, पाहा फीचर्स

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …