सोने-चांदी खरेदीचा विचार करताय?, जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today: सोने-चांदी खरेदी करत असाल तर थोडं थांबा! कारण सध्याचे सोन्याचे दर बघता तुम्हाला खिसा जास्त रिकामा करावा लागू शकतो. वायदे बाजारात गुरुवारी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, फेब्रुवारी 2024 फ्यूचर डिलीव्हरी सोने 1156 रुपयांच्या म्हणजेच 1.89 टक्क्यांच्या वाढले आहे. यानुसार सोन्याची किंमत 62 हजार 382.00 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 

मागील सत्रात फेब्रुवारी 2024 च्या करारासाठी सोन्याचा दर 61 हजार 199 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. एप्रिल 2024 मालिकेतील डिलिव्हरीसाठीचे सोने 1136 रुपयांच्या म्हणजेच 1.84 टक्क्यांनी वाढले. यानंतर सोन्याचा दर 62 हजार 740.00 रुपये प्रति 10 ग्रॅम राहिला. मागील सत्रात एप्रिल करारासाठी सोन्याचा दर 61 हजार 604.00 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

चांदीची किंमत वाढली 

फ्युचर्स मार्केटमध्ये चांदीची किंमतीनुसार, मार्च 2024 मध्ये डिलिव्हरीसाठी चांदी 2634 रुपये किंवा 3.68 टक्क्यांच्या वाढीसह 74166.00 रुपये प्रति किलोवर व्यापार करत होती. मागील सत्रात, मार्च 2024 च्या करारासह चांदीची किंमत 71 हजार 532.00 रुपये प्रति किलो होती.

हेही वाचा :  आत्ताच गुंतवणुक करा! पोस्टाच्या 'या' योजनेत मिळेल बँकेच्या FD पेक्षाही जास्त दराने व्याज

त्याचप्रमाणे मे 2024 मालिकेतील डिलिव्हरीत चांदी 2605 रुपयांनी म्हणजेच 3.58 टक्क्यांनी वाढली. यानंतर चांदीचा दर 75 हजार 282 रुपये प्रति किलोवर राहिला. मागील सत्रात मे कॉन्ट्रॅक्ट चांदीचा भाव 72 हजार 677 रुपये प्रति किलो होता.

तुम्ही तुमच्या घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुमचा मेसेज येईल.

सरकार या महिन्यात सॉवरेन गोल्ड बॉन्डचा एक हप्ता जारी करेल आणि दुसरा हप्ता फेब्रुवारीमध्ये जारी केला जाईल.सॉवरेन गोल्ड बॉन्ड 2023-24 सिरिज-3 या महिन्यात 18-22 डिसेंबर रोजी खुली होईल. 28 डिसेंबर 2023 रोजी सॉवरेन गोल्ड बॉन्ड जाहीर होणार आहे. सीरिज-4 साठी 21 फेब्रुवारीऐवजी 12-16 फेब्रुवारीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. ही सिरिज-1 19 ते 23 जून दरम्यान खुली होती आणि सिरिज-2 11 ते 15 सप्टेंबर दरम्यान खुली होती.

सॉवरेन गोल्ड बॉन्ड शेड्युल्ड कमर्शियल बँका (स्मॉल फायनान्स बँका, पेमेंट बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका वगळता), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), क्लियरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIL), नियुक्त पोस्ट ऑफिसेसद्वारे जारी केले जातात. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड (BSE) सारख्या  आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजद्वारे विकले जातात.

हेही वाचा :  Govt Jobs: राज्यात सरकारी नोकरी मिळवणं आणखी अवघड; मुख्यमंत्र्यांची घोषणाSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Anti Paper Leak Law: मोठी बातमी! पेपरफुटीला बसणार आळा; सरकारने मध्यरात्री नवा कायदा केला लागू

What is Anti Paper Leak Law: युसीजी नेटचा पेपर लीक झाल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात …

धावत्या स्कूल व्हॅनचा मागचा दरवाजा उघडला आणि… काळजचा थरकाप उडवणारा Video

School Van Incident CCTV : शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि स्कूल व्हॅनसाठी (School …