ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना प्रकृती खालावल्याने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. अमोल पालेकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यात हळूहळू सुधारणा होत असल्याचे त्यांच्या पत्नीने मीडियाला सांगितले आहे. अमोल पालेकर यांच्या पत्नी संध्या गोखले यांनी मीडियाशी बोलताना म्हटले की, अमोल पालेकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. एका दीर्घ आजारामुळे त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. जास्त स्मोकिंगमुळे त्यांना मागे दहा वर्षांपूर्वी असाच त्रास जाणवू लागते होता.

परंतु आता देखील या आजाराने पुन्हा डोके वर काढलेले जाणवले. मात्र ताबडतोब त्यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात आणले गेले. आता यावर उपचार सुरू आहेत आणि अमोल पालेकर डॉक्टरांच्या प्रयत्नाला प्रतिसाद देत आहेत.आता अमोल पालेकर यांची प्रकृतीत सुधारणा जाणवत आहे. आणि चिंता करण्याचे काही कारण नाही असे डॉक्टरांनी देखील सांगितले आहे.’ अमोल पालेकर हे अभिनेते तसेच दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक हिंदी चित्रपट तसेच मराठी चित्रपटातून अभिनय साकारला आहे. गोलमाल, श्रीमान श्रीमती, नरम गरम, घरोंदा, रंगबिरंगी, छोटी सी बात, चितचोर, भूमिका, पहेली अशा चित्रपटासाठी त्यांनी काम केले आहे. शांतता कोर्ट चालू आहे या चित्रपटातून अमोल पालेकर यांनी मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले होते. गोलमाल हा त्यांनी अभिनित केलेला चित्रपट खूपच लोकप्रिय ठरला होता. जिथे ऍक्शन थ्रिलर चित्रपट बॉलिवूड सृष्टीत लोकप्रिय होत होते त्या गर्दीत अमोल पालेकर यांचा साधेपणा प्रेक्षकांना आपलेसे करून गेला होता.

त्यांच्या सध्या सरळ भूमिकांना प्रेक्षकांची दाद मिळू लागली होती. नुकताच त्यांनी दिगदर्शीत केलेला २०० हल्ला हो हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने मुख्य भूमिका बजावली होती. या चित्रपटाचे लेखन अमोल पालेकर यांच्या पत्नी संध्या गोखले यांनी केले होते. संध्या गोखले या स्क्रीनप्ले रायटर आहेत. समांतर या चित्रपटाचे लेखनही संध्या गोखले यांनी केले होते. अमोल पालेकर यांच्या बहुतेक चित्रपटाला त्यांनी नेहमीच साथ दिली आहे. अमोल पालेकर यांची प्रकृती आता हळूहळू सुधारू लागली असल्याचे संध्या गोखले यांनी कळवले आहे. त्यामुळे आता काळजीचे कारण नसल्याचे त्या मीडियाशी बोलताना म्हणाल्या आहेत.