आहारात ही हेल्दी भाजी खात असाल तर व्हा सावध, Uric Acid दुप्पट वाढून होईल त्रास वेळीच करा आहारातून बाद

अळकुडी ही भाजी सर्वांनाच माहीत आहे. खरं तर अळकुडीमध्ये विटामिन ए, बी, सी, तांबे, मँगनीज, जिंक, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह, सेलेनियम, पोटॅशियम, बिटा-कॅरेटीन अशी अनेक खनिजे आढळतात जी शरीराला निरोगी राखण्यास मदत करतात. पण ही भाजी तुम्ही जर जास्त प्रमाणात खात असाल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. अळकुडीच्या भाजीमुळे तुमच्या शरीरातील युरीक अ‍ॅसिडचे प्रमाण दुप्पट वाढते. ज्या व्यक्तीच्या शरीरात युरिक अ‍ॅसिड अधिक प्रमाणात आहे त्यांनी ही भाजी खाणे टाळावे. (फोटो सौजन्य – iStock)

​अळकुडीने कसे वाढते युरिक अ‍ॅसिड?​

​अळकुडीने कसे वाढते युरिक अ‍ॅसिड?​

अळकुडी ही अशी भाजी आहे ज्याचे सेवन केल्याने युरिक अ‍ॅसिड शरीरात दुप्पट होते. युरिक अ‍ॅसिड शरीरात वाढण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अन्नपचन न होणे. काही पदार्थ हे लवकर पचत नाहीत आणि रक्तामध्ये अशुद्धता निर्माण करतात. अळकुडी ही त्यातील एक भाजी आहे. ही भाजी लवकर न पचल्यामुळे शरीरात युरिक अ‍ॅसिड दुप्पट प्रमाणात निर्माण करते. तसंच अळकुडी ही शरीरात उष्णता निर्माण करणारी भाजी आहे, त्यामुळे उष्णता अधिक झाल्यास युरिक अ‍ॅसिड बुस्ट होते.

हेही वाचा :  नव्या नवरीने देवोलिनाच्या लुक्सवरून घ्या स्टाईलची प्रेरणा

​त्वचेवर जळजळ निर्माण करते​

​त्वचेवर जळजळ निर्माण करते​

अळकुडीमध्ये असणारे ऑक्सिलिक अ‍ॅसिड हे त्वचेवर आणि चेहऱ्यावर जळजळ निर्माण करते. तर अधिक प्रमाणात ऑक्सिलिक अ‍ॅसिड शरीरात गेल्यामुळेच युरिक अ‍ॅसिडवरही परिणाम होतो आणि त्याचा अधिक त्रास तुम्हाला होतो. यामुळे संपूर्ण शरीरावर परिणाम होतो.

(वाचा – Heart Failure किंवा मृत्यूसाठी जबाबदार ठरते पेरीकार्डियल इफ्यूजन, काय आहेत लक्षणे आणि उपचार)

​अळकुडीतील कार्बोहायड्रेटने होतो त्रास​

​अळकुडीतील कार्बोहायड्रेटने होतो त्रास​

अळकुडीमधील कार्बोहायड्रेटमुळे रक्तातील साखरेचा स्तर कमी होतो. त्यामुळे अळकुडीचे सेवन करताना याचाही विचार करावा. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी याची काळजी घ्यावी. रक्तातील साखरेची कमतरतादेखील युरिक अ‍ॅसिडवर परिणाम करू शकते.

(वाचा – सप्लिमेंट्सचा शरीराच्या अवयवांवर होतो दुष्परिणाम? खरंच Supplements गरज आहे का)

​युरिक अ‍ॅसिड रूग्णांनी सेवन करू नये ​

​युरिक अ‍ॅसिड रूग्णांनी सेवन करू नये ​

युरिक अ‍ॅसिडच्या रूग्णांनी अळकुडीचे सेवन केल्यास त्यांच्यावर मात्र ही भाजी विषाप्रमाणे काम करू शकते. अळकुडी ही खरं तर हेल्दी भाजी आहे मात्र युरिक अ‍ॅसिड रूग्णांसाठी ही विष ठरते. यामध्ये प्युरीन, कॅल्शियम आणि ऑक्सालेटचे प्रमाण अधिक असून किडनीलाही नुकसान पोहचते. अळकुडीचे सेवन केल्याने Gout Problem अधिक निर्माण होतो.

हेही वाचा :  पोटात गॅस-छातीत जळजळ, मोकळेपणाने ढेकर देणंही झालंय कठीण? या ५ सवयींमुळे आतडे जाळून तयार होते भयंकर ऍसिडिटी

(वाचा – महिला आणि मुलांच्या आरोग्यासाठी लोहाचे महत्त्व, अन्यथा होऊ शकतो अ‍ॅनिमिया)

​युरिक अ‍ॅसिड शरीरात वाढल्याने काय होते?​

​युरिक अ‍ॅसिड शरीरात वाढल्याने काय होते?​

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिड वाढल्यास अत्यंत धोकादायक ठरते. तसंच यामुळे सांधेदुखी, संधिवाताचे त्रास सुरू होऊन कमी वयातच धोका निर्माण होतो. त्यामुळे डायबिटीस, वाढते कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि वाढते LDL, कॅन्सरसारख्या आजारांप्रमाणेच आता युरिक अ‍ॅसिडच्या वाढत्या प्रमाणाकडे लक्ष देणेही गरजेचे झाले आहे. त्यामुळे आहारात भाजी निवडताना योग्य विचारपूर्वक निवडावी आणि मगच डाएटमध्ये समावेश करावा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …