पोटात गॅस-छातीत जळजळ, मोकळेपणाने ढेकर देणंही झालंय कठीण? या ५ सवयींमुळे आतडे जाळून तयार होते भयंकर ऍसिडिटी

जेवल्यानंतर लगेच आंघोळ करणे

आयुर्वेदानुसार, प्रत्येक कामाची एक वेगळी गोष्ट असते. या गोष्टी फॉलो न केल्यामुळे शरीराला मोठे नुकसान पोहोचते. जेवणानंतर लगेच आंघोळ करणे शरीरासाठी घातक असते. जेवणानंतर २ तास तरी आंघोळ करू नये. शरीरातील अग्नि अन्न पचवण्याचे काम करतो. जेवल्यानंतर अग्नी तत्व सक्रिय होते मात्र जेव्हा तुम्ही लगेच आंघोळ करता तेव्हा शरीरातील तापमान कमी होते. ज्याचा थेट परिणाम पचनक्रियेवर होत असतो.

(वाचा – Low Sodium Foods: सतत लघवीला होतेय? सोडियमची उच्च पातळी रक्ताचं करतंय पाणी, खायला सुरू करा ५ पदार्थ))

​जेवल्यानंतर लगेच शतपावली करणे

लांब अंतर चालणे, पोहणे, व्यायाम करणे – या सर्व क्रिया वात वाढवतात आणि पचनात अडथळा आणतात. ज्यामुळे पोट फुगणे, पोषणाचे अपूर्ण शोषण आणि जेवणानंतर अस्वस्थता येते. नेहमी जेवल्यानंतर किमान दहा मिनिटांनी फिरायला जा. मात्र थोडावेळ थांबून.

​दुपारी २ नंतर जेवणे

आयुर्वेदानुसार दुपारी १२ ते २ या वेळेत जेवणे योग्या आहे. या दरम्यान सूर्य आकाश अगदी डोक्यावर असतो. दिवसातील हा वेळ पित्त प्रमुख आहे. ज्यामुळे अन्न पचवण्यास मदत होते. आयुर्वेदात दुपारचे जेवण अतिशय महत्वाचे समजले जाते.

हेही वाचा :  इरसालवाडीतील 78 जण अद्यापही बेपत्ता; संध्याकाळी शोधकार्य थांबवण्याची शक्यता

(वाचा – Cataract Symptoms : मोतिबिंदूची ही लक्षणे खूप आधीच दिसतात, वेळीच संकेत जाणून घेतल्यास सर्जरी टाळाल)

​रात्री दही खाणे

दही चवीला आंबट आणि गोड असल्यामुळे शरीरातील कफ आणि पित्तदोष वाढतो. रात्रीच्या वेळी शरीरात कफ नैसर्गिकरित्या वाढतो आणि अशा वेळी दही खाल्ल्याने अधिक कफ तयार होऊ शकतो. ते आतड्यात जमा होऊ शकते आणि बद्धकोष्ठता होऊ शकते.

(वाचा – मेलो तरी चालेल, पण… संजय दत्तने कॅन्सर ट्रिटमेंट घेण्यास दिला होता नकार, असा होता अंगावर काटा आणणारा प्रवास))

​जेवल्यावर लगेच झोपणे

आयुर्वेद जेवण आणि झोपण्याच्या वेळेत किमान ३ तासांचे अंतर ठेवण्याची शिफारस करतात. झोपेमुळे शरीर ताजेतवाने होते, शरीर दुरुस्त करते, अतिशय फ्रेश वाटते आणि तुमचे मन सकारात्मक विचार करायला तयार होते. हेच कारण आहे की तुमचे शेवटचे जेवण हलके असावे आणि झोपण्याच्या तीन तास आधी पूर्ण करावे.

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञांशी संपर्क साधावा.

(वाचा – Cough Syrups : WHO कडून अलर्ट, भारतीय कंपनीचे हे २ सिरप चिमुकल्यांसाठी घातक, १८ मुलांचा गेलाय जीव))

हेही वाचा :  WhatsApp चे हे फीचर माहितेय का? कोणत्याही भाषेत पाठवता येतो मेसेज, पाहा ट्रिक्स

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …