Gas remedy : थोडंसं खाल्यावरही पोट एकदम टम्मं भरलेलं वाटतं किंवा गच्चं होतं? करा हा उपाय 2 मिनिटात शरीरातील सर्व गॅस पडेल बाहेर!

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बैठी जीवनशैली यामुळे अनेकांना पोटाचे त्रास व अपचन होतं. पोटात जडपणा, गॅस, ऍसिडिटी, मळमळ आणि बद्धकोष्ठता यासारखे विकार सध्याच्या काळात अगदी सामान्य झाले आहेत. अर्थात ही काही गंभीर समस्या नाही पण तुमच्या दैनंदिन कामकाजावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. काही लोक इतर गंभीर समस्यांपेक्षा या साध्यासुध्याच समस्यांमुळेच जास्त त्रासलेले असतात. काही वेळा, जास्त गॅस अस्वस्थ किंवा वेदनादायक देखील असू शकतो. तज्ज्ञांचे मत आहे की खाण्यापिण्यात काही साधे बदल केल्यास गॅससारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो आणि पचनक्रियेलाही मदत होऊ शकते.

साहजिकच पोट आणि पचनाशी संबंधित या समस्यांवर अनेक प्रकारची औषधे उपलब्ध आहेत, परंतु प्रत्येक वेळी औषधांचा वापर आरोग्यास हानी पोहोचवू शकतो. आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार तुम्हाला पोटाशी संबंधित या समस्यांपासून लवकर आराम मिळवण्यासाठी एक सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय सांगत आहेत. त्या म्हणतात की स्वयंपाकघरातील तीन घटकांचा समावेश करून बनवलेली ही रेसिपी पोट फुगणे, भूक न लागणे, पोट फुगणे किंवा जड होणे या समस्यांपासून बद्धकोष्ठतेपर्यंतच्या सर्व पाचन समस्यांपासून आराम देते. (फोटो साभार: TOI)

हेही वाचा :  जगभरातील सोने संपणार? पृथ्वीवर आता फक्त इतके टक्केच उरलंय? जाणून घ्या

सामग्री व विधी

1. कढीपत्ता

2. पुदिन्याची काही पाने

3. ताजे आले / सुंठ पावडर

एका भांड्यात ३ ग्लास पाणी घेऊन गॅसवर ठेवा. 7 ते 10 कढीपत्ता आणि पुदिन्याची पाने आणि एक इंच ताजे आले किंवा 1 टीस्पून सुंठ पावडर या पाण्यात घाला. हे मिश्रण ५ ते ७ मिनिटे चांगले उकळा आणि गरम झाल्यावर गाळून घ्या.

(वाचा :- सकाळी रिकाम्या पोटी हे फळ खाल्यास आतड्यांमधील घाण, नसांमध्ये चिकटलेले कोलेस्ट्रॉल, म्हातारपण व कॅन्सरचा धोका होईल दूर!)

पुदिना व कडीपत्त्याचे फायदे

पुदीना सर्व ऋतूंसाठी सर्वोत्तम आहे. याच्या सेवनाने सर्दी-खोकला, अ‍ॅसिडीटी, गॅस, पोटात सूज येणे, अपचन, डिटॉक्स, मुरुम, सायनसायटिस आणि बद्धकोष्ठता इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो. कढीपत्त्यात कार्बोहायड्रेट, फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, तांबे आणि जीवनसत्त्वे सी, ए, बी आणि ई भरपूर असतात.

(वाचा :- करीना कपूरची डाएटिशियन ऋजुता दिवेकरने उलगडली 3 वेटलॉस रहस्य, करीनाला 2 प्रेग्नेंसीनंतरही ऋजुताने असं बनवलं स्लिम-ट्रिम..!)

हेही वाचा :  नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या जोडीदाराला द्या या ५ अमुल्यगोष्टी, नाते अजूनच होईल अतूट

आल्याचे फायदे

पचनाशी संबंधित सर्व समस्यांसाठी आले सर्वोत्तम आहे. आले शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर फेकण्यास मदत करते. अशा प्रकारे आपल्याला अन्नातील चांगली पोषकद्रव्ये चांगल्या प्रकारे शोषण्यास मदत होते.

(वाचा :- Mouth Cancer : सावधान, डॉक्टरांनी सांगितली माउथ कॅन्सरची मुख्य लक्षणे, म्हणाले फर्स्ट स्टेजमध्ये समजतही नाहीत माऊथ कॅन्सरचे ‘हे’ संकेत!)

गंभीर आजारांवर रामबाण उपाय

वरील सर्व घटकांमध्ये अँटीडायबिटीक, अँटीडायरियल, अँटीऑक्सिडंट, अँटीफंगल, अँटीकार्सिनोजेनिक, अँटीहाइपरटेन्सिव्ह, अँटीयुल्सर, अँटीबॅक्टेरियल आणि कोलेस्ट्रॉल कमी करणारे आणि इतर अनेक उपयुक्त औषधी गुणधर्म आहेत.

(वाचा :- चहासोबत चुकूनही खाऊ नका ‘हा’ 1 पदार्थ, हाडे होतील कमजोर आणि वाढेल या 5 गंभीर आजारांचा धोका..!)

पोटाच्या हजार समस्यांवर एकच रामबाण उपाय!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …