Co-Sleeping: मुलांसोबत कोणत्या वयात पालकांनी झोपणं थांबवावं? ‘ही’ आहेत वैज्ञानिक कारणं…

Parenting Tips for Co-Sleeping: लहान मुलांना सांभाळणं हा आपल्या सर्वांसाठीच एक मोठा टास्क असतो. लहानपणापासूनच त्यांना शिस्त लावणं, त्यांचे वेळप्रसंगी हट्ट पुरवणं, त्यांचे शिक्षण या सगळ्यांचीच काळजी आपल्याला असते. मुलं लहान असतात तेव्हा त्यांच्यासोबत झोपणेही (At what age parents stop sleeping with their children) गरजेचं असते कारण रात्री त्यांना भिती वाटू नये किंवा त्यांना त्रास होऊ नये याची खबरदारी आपल्याला घ्यावी लागते. त्यासोबत त्यांना काही लागलं खुपलं तर तेही आपण करू शकतो. परंतु तुम्हाला माहितीये का की मुलं थोडी मोठी झाल्यानंतर मात्र आपल्याला त्यांच्यासोबत झोपणं हे कमी करणं आवश्यक असते. 

यामागे अनेक कारणं आहेत. लहान मुलांमध्ये चिडचिडही होत असते तसेच अनेकदा त्यांना अस्वस्थही वाटू लागते. तेव्हा आपल्या मुलांजवळ आपण रात्री किंवा ते एकटे असताना झोपणं हे पालकांसाठी आवश्यक असते. अनेक घरांमध्ये त्यांच्या मुलांसाठी स्वतंत्र बेडरूमही असते. परंतु अनेकदा लहान मुलांना आपली आई नाहीतर वडिल हे सोबत हवेच असतात. या लेखातून जाणून घेऊया की नक्की कोणत्या वयानंतर लहान मुलांसोबत पालकांनी झोपणं थांबवले पाहिजे. 

हेही वाचा :  अजित पवारांना वाहतुकीच्या नियमाचा विसर, पुण्यात उलट दिशेने चालवली वाहने

यामागील कारणं काय? 

आपल्या लहान मुलांसोबत रात्री झोपल्यानंतर त्यांच्यासोबत मी टाईम व्यतित करणं हे पालकांसाठी फार आवश्यक असते. ऑफिसचं काम संपलं की आपल्या लहान मुलांसोबत तुम्ही आपला वेळ घालवता त्यामुळे लहान मुलांमध्ये आपल्या पालकांसोबतचे एक वेगळे बॉण्डिंग तयार होते. आपल्या लहान मुलांसोबत मिठी मारून झोपणं हे आपल्या सर्वांसाठी (Effects of Co Sleeping) महत्त्वाचं असते त्यानं आपला थकवा निघून जातो. परंतु एका वयानंतर मुलांसोबत झोपणं हे पालकांनी टाळावं. कारण यानं तुमच्या मुलांचे नुकसान होऊ शकते. यामध्ये त्यांच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. 

काय आहेत कारणं? 

जर का मुलं तुमच्याशिवाय झोपूच शकणार नसतील तर त्यावेळी तुम्हाला त्यांच्यासोबत झोपणं अवाश्यक आहे. परंतु तुम्हाला मुंल जेव्हा पौंगंडावस्थेच्या उंबरठ्यावर येतात तेव्हा मात्र पालकांनी त्यांच्यासोबत झोपणं बंद करावे. याचं कारणं म्हणजे शरीरात होणाऱ्या विविध बदलांमुळे मुलं ही पालकांसोबत झोपायला हळूहळू संकोचू लागतात. त्याबद्दल पालकांपाशी मुलं ही बोलतीलच असं नाही. तरूण्यात मुलांना त्यांची स्पेस हवी असते. निदान मुलं दोन ते पाच वर्षांची होईपर्यंत मुलांनी त्यांच्यासोबत झोपावे परंतु त्याआधी किंवा त्यानंतर त्यांनी मुलांसोबत झोपणं टाळावं. पालकांसोबत झोपल्यानं लहान मुलांच्या वर्तनातही (Behavioral Changes) बदल होऊ शकतो. 

हेही वाचा :  Optical Illusion: 'या' फोटोत लपलेली मगर शोधून दाखवा, तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …