Wrestler Protest : प्रियंका गांधी यांचा कुस्तीपटूंना पाठिंबा, आंदोलनाबाबत चर्चा

Priyanka Gandhi Protest : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलनासाठी बसलेल्या कुस्तीपटूंची काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भेट घेतली. तसेच त्यांच्यासोबत चर्चाही केली. यावेळी महिला कुस्तीपटूंना भावना अनावर झाल्याने प्रियंका यांनी मायेने त्यांच्या डोक्यावरुन हात फिरवत त्यांना धीर दिला. जंतरमंतरवर बसलेल्या कुस्तीपटूंच्या धरणे आंदोलनाचा सातवा दिवस आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटू आंदोलनासाठी बसले आहेत. बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहे. 

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांना अटक होण्याची शक्यता

आज सकाळी प्रियंका गांधी दिल्लीच्या जंतरमंतरवर पोहोचल्या. प्रियांका गांधी या ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंसोबत धरणे आंदोलनात सहभागी झाल्यात. कुस्तीपटूंनी आधीच स्पष्ट केले होते की, आम्ही कोणाला अडवणार नाही.  या लढ्यात ज्याला आम्हाला साथ द्यायची असेल ते आम्हाला मदत करु शकतात. दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटूंचे आंदोलन सातव्या दिवशीही सुरु आहे. प्रियंका गांधी यांनी कुस्तीपटूंशी संवाद साधला. काँग्रेस नेते दीपेंद्र हुड्डाही या आंदोलनात सहभागी झाले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही आज जंतरमंतरवर पोहोचणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा :  viral snake video : कोब्रा सापाने केली शाम्पूने अंघोळ..Video पाहून येईल अंगावर काटा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …