Shraddha Murder Case : 23 दिवस, शेकडो प्रश्न पण… पाहा आतापर्यंत पोलिसांच्या हाती काय लागलं

Shraddha Murder Case : दिल्लीतल्या श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) हत्या प्रकरणात 23 दिसवसांनंतरही पोलीस तपास सुरुच आहे.  हत्या प्रकरणाची उकल करण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून (Delhi Police) आटोकाट प्रयत्न सुरु आहेत, पण आतापर्यंत तपास अपूर्णच आहे. श्रद्धा वालकरची हत्या झाल्याचं उघडकीस आल्यानतंर आरोपी आफताब पूनावालाला (Aaftab Poonawala) अटक करण्यात आली. याला आता 23 दिवस उलटून गेले आहेत. पण अद्याप पोलिसांच्या हाती ठोस पुरावा लागलेला नाही. पुरावे जमा करण्यासाठी पोलिसांकडून अजूनही शोधकार्य सुरु आहे. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची आफताब उलट सुलट उत्तर देत असल्याने पोलिसांसमोर आव्हान उभं राहिलं आहे. 

18 मेला श्रद्धाची हत्या
18 मे 2022 ला दिल्लीतल्या (Delhi) छतरपूर भागातून देशातल्या सर्वात मोठ्या मर्डर मिस्ट्रीला (Murder Mystrey) सुरुवात झाली. आफताबबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in Relationaship) राहणाऱ्या श्रद्धा वालकर या तरुणीची आफताबने निर्घृण हत्या केली. तिच्या शरीराचे 35 तुकडे करुन त्याने दिल्लीतल्या मेहरौलीमधल्या जंगलात (Mehrauli Forest) फेकून दिले. त्यानंतर तब्बल सहा महिने या प्रकरणाचा कोणालाही सुगावा लागला नाही. पण श्रद्धाच्या वडिलांनी श्रद्धा बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत केल्यानंतर ही धक्कादायक घटना उघड झाली. यानंतर आफताब पुनावालाला अटक करण्यात आली.

हेही वाचा :  सपना चौधरी घेणार सोशल मीडियापासून ब्रेक, पोस्ट शेअर करत म्हणाली “राम राम…”

23 दिवस तपास सुरुच
आफताबला अटक केल्यानंतर गेल्या 23 दिवसात पोलीसांनी अनेक ठिकाणी शोध घेतला. काही दिवस आफताबची पॉलीग्राफ टेस्ट (Polygraph Test) झाली, तर दोन वेळा नार्को टेस्ट (Narco Test) झाली. पण यानंतरही पोलीसांकडे ठोस पुरावा नाही. पॉलीग्राफ टेस्टसाठी आफताबला विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची यादी तयार करण्यात आली होती. त्यानंतर नार्को टेस्टमध्ये सत्या बाहेर येईल असं वाटत होतं. पण आफताब प्रचंड चलाख निघाला. तो पोलिसांच्या प्रश्नांना सातत्याने गुंगारा देतोय. त्यामुळे हे प्रकरण वाटतं तेवढं सोप नाही हे नक्की.

आफताबच्या क्रूर चाली
नार्को टेस्टमध्ये सांगितलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास केला, पण अजूनही ज्या पुराव्यांच्या आधारावर गुन्हा सिद्ध होईल असे पुरावे पोलीस गोळा करु शकलेले नाहीत. बुद्धीबळ खेळण्याची आवड असलेला आफताब एकामागोमाग एक क्रूर चाली रचत आहे. 

आफताबची पहिली चाल
श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताब पहिली चाल खेळला ते म्हणजे त्याने हत्येनंतर सर्व पुरावे नष्ट केले. ज्या शस्त्राने आफताबने श्रद्धाची हत्या केली होती, ते हत्यारही पोलिसांच्या हाती अद्याप लागलेलं नाही. श्रद्धाच्या मोबाईलमधून काही पुरावे मिळू शकले असते, पण मोबाईलही आफताबने समुद्रात फेकून दिल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. आफताबने खरच श्रद्धाचा मोबाईल समुद्रात फेकला असेल तर पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.
 
श्रद्धाच्या हत्येवेळी आफताबने जे कपडे घातले होते, ते कपडेही त्याने कचरा गाडीत टाकून दिले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अद्याप श्रद्धाचं शीर सापडलेलं नाही. श्रद्धाची हत्या आफताबनेच केली आहे हे सिद्ध करण्यसाठी हे पुरावे महत्त्वाचे ठरणार आहे. पण नार्को आणि पॉलीग्राफ टेस्टनंतरही पोलिस निर्णयापर्यंत पोहोचू शकत नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

हेही वाचा :  'ये रिस्क हाये, हड्डिया तुडवाये', स्टंटच्या नादात रस्त्यावरच पार्श्वभागावर कोसळली तरुणी; दिल्ली पोलिसांचं भन्नाट ट्वीट

आफताबची दुसरी चाल
पोलिसांच्या प्रत्येक टेस्टसाठी आफताब पूर्ण तयारीत असतो, त्यामुळे पोलिसही हैराण झाले आहेत. इतकंच काय तर त्याने नार्को टेस्ट करण्यासाठीही नकार दिला नाही. नार्कोत पोलिसांच्या हाती काहीही माहिती लागली तरी कोर्टात ते सिद्ध करु शकत नाहीत, याची कल्पना आफताबला आहे. 

हे ही वाचा : ‘चला कर्नाटक नव्याने पाहूया’ कर्नाटक पर्यटन विभागाकडून चक्क नागपुरात पोस्टरबाजी
 
आफताबीच तिसरी चाल
श्रद्धाची हत्या कधी तरी उघड होणार आणि पोलिसांना ज्या घरात हत्या केली त्या घरातून पुरावे मिळणार हे आफताबला आधीपासूनच माहित होतं. त्यामुळे त्याने आपल्या घरातील प्रत्येक पुरावा नष्ट केला आहे. इंटरनेट आणि गुगलवरुन सर्च करत त्याने पुरावे कसे नष्ट करावेत याची संपूर्ण माहिती घेतली. त्यामुळेच पोलिसांनाही त्याच्या घरातून महत्त्वाचे पुरावे मिळाले नाहीत. आफताबच्या घरात रक्ताचे काही छोटे डाग आढळले असून श्रद्धाचे वडिल आणि श्रद्धाच्या भावाच्या रक्ताशी त्याची तपासणी केली जाईल.
 
आफताब तुरुंगात बुद्धीबळ खेळतो
आफताब सध्या तिहार जेलमध्ये आहे. इथे तो कोणाशीही बोलत नाही. एकटात बुद्धीबळ खेळत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळेच कि काय आफताब प्रत्येक वेळी एक नवी चाल रचत आहे. आफताबने ज्याप्रकारे कोणताही तणाव येऊ न देता पॉलीग्राफ आणि नार्को टेस्टचा सामना केला आहे, ते पाहून पोलिसही हैराण आहेत. 

हेही वाचा :  Workout Mistakes In Gym : जीममध्ये व्यायाम करताना 'या' चुका करु नका, डॉक्टरांनी पाहा काय दिलाय सल्ला?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …