बॅंकेने अलर्ट करुनही दुर्लक्ष केले आणि नंतर…; वीजबिलाच्या नावावर डेप्युटी मॅनेजर मोठी फसवणूक

Online Fraud : गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन आर्थिक फसवणूकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येतय. नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करुनही फसवणूकीचे प्रकार सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहेत. सायबर गुन्हेगांरांकडून (Cyber Crime) जेष्ठ नागरिकांना अधिक प्रमाणात लक्ष्य करण्यात येत आहे. मात्र उच्च शिक्षितही या फसवणूकीला बळी पडत असल्याचे पाहणे आश्चर्याचे ठरत आहे. पुण्यात अशा एका मोठ्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला तब्बल 1. 4 लाखांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. वीजबिलाच्या (electricity bill) नावावर ही फसवणूक करण्यात आलीय. (pune man duped online electricity bill fraud crime news in marathi)

डेप्युटी मॅनेजरची 1.4 लाखांची फसवणूक

वीजबिल भरण्याचा मेसेज पाठवून ‘महावितरण’चा अधिकारी असल्याची बतावणी करून गुन्हेगार फसवणूक करत आहेत. वीजबिल भरण्यासाठी सायबर गुन्हेगार नागरिकांना अॅप डाउनलोड करायला भाग पाडतात आणि त्यानंतर फसवणूक करत आहेत. पुण्यात हा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरु आहे. हिंजवडी येथील एका खाजगी कंपनीत डेप्युटी मॅनेजरची 1.4 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. 

हे ही वाचा >> बेस्ट चालकाच्या पत्नीला Instagramवरील मित्राने पाठवलेलं गिफ्ट पडलं महागात

हेही वाचा :  माझी कहाणी : हनीमूनच्या रात्री ईमेलमध्ये लपवून ठेवलेली एक चिठ्ठी सापडल्याने माझ्या नव-याचं एक खोल रहस्य उघड झालं आणि मग..!

आधी अॅप डाउनलोड करायला लावलं आणि नंतर….

ऑक्टोबरमध्ये फसवणूक झालेल्या व्यक्तीला त्याच्या फोनवर सप्टेंबरचे बिल अपडेट न झाल्याने महावितरण (MSEDCL) संध्याकाळपर्यंत वीज पुरवठा खंडित करणार असल्याचा मेसेज आला. जेव्हा त्या व्यक्तीने मेसेजवरील नंबरवर संपर्क साधला तेव्हा एका व्यक्तीने त्याला बिल भरण्याच्या त्याच्या नेहमीच्या  पद्धतीबद्दल विचारले. जेव्हा त्याव्यक्तीने आपण यूपीआय पद्धतीने रक्कम भरत असल्याचे सांगितले तेव्हा फसवणूक करणाऱ्याने अशा प्रकारची रक्कम सिस्टीममध्ये अपडेट होत नाहीत असे सांगितले. त्याऐवजी रिमोट ऍक्सेस कंट्रोल अॅप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्याचे वेबपेज उघडून बिल ते भरण्यास सांगण्यात आले. त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क लागणार नसल्याचेही सांगितले.

हे ही वाचा >> अरे देवा, एका मेसेजवर क्लिक करताच 57 हजारांचा गंडा

जेव्हा त्याला कोणताही ओटीपी (OTP) आला नाही, तेव्हा त्याला नेटबँकिंगद्वारे प्रयत्न करण्यास सांगण्यात आले. “पीडित व्यक्तीने त्याचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड तपशील भरले, परंतु तरीही ओटीपी मिळाला नाही. दरम्यान, त्यांच्या बँकेने त्यांना फोन केला होता, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यांच्या बँकेतून  कोणीतरी त्यांचे क्रेडिट कार्ड डिटेल वापरून 1.40 लाख रुपयांचे व्यवहार केल्याचे पाहून त्याला धक्काच बसला,” असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा :  पतीचे इन्स्टाग्रामवरुन अफेअर! पत्नीने प्रेयसीला घरी बोलावून...' बेवारस मृतदेहावरुन समोर आला प्रकार

दरम्यान, पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी सांगितले की, मुंबई पोलिसांनी नुकतेच अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्याला झारखंडमधून अटक केली होती. आम्ही अशा प्रकारे फसवणूक झालेल्यांचा शोध घेत आहोत असेही पोलिसांनी सांगितले.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

स्क्रॅप माफिया ते करोडपती, आता साम्राज्य संकटात… कोण आहे गँगस्टर रवी काना?

स्क्रॅप माफिया रवी कानाला पकडण्यात भारतीय पोलिसांनी यश मिळालंय. पश्चिम उत्तर प्रदेशातील फरारी गुंड रवी नागर …

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य …