Weekend Plans: विकेंड पर्यटन करण्याचा बेत आखात असाल तर ही मोठी बातमी, ‘हा’ घाट राहणार बंद

प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार: सध्या थंडीचा मौसम सुरू झाला आहे. त्यामुळे लोकं विकेंड प्लॅनिंग (winter travel plans) सुरू करतायत. आजकाल करोनाचा पार्दुभाव कमी झाल्यानं सगळीकडेच वीकेंडला प्लॅनिंगला उधाण आलं आहे. त्यामुळे लोकं वर्केशन, स्टेकेशनसारखे (staycation) पर्यायही निवडताना दिसतायत. त्यातून ट्रेकिंग ही गोष्ट तर कधीही महत्त्वाचीच. आपल्याला ट्रेकिंगसाठी घाटांवरही फिरायला आवडतात. आपल्या महाराष्ट्रात असे अनेक निसर्गरम्य घाट आहेत. त्यामुळे आपल्यालाही अशा घाटांवर फिरायला जाण्याचा मोहही आवरत नाही. परंतु सध्या फिरस्त्यांसाठी एक वाईट बातमी आहे. नंदुरबार (nandurbar satpuda parwat) येथील सातपुडा पर्वत नजीक असलेला चांदसैली घाट आणि घाटाजवळील रस्ता बंद राहणार आहे. (nandurbar news chandchauli ghat will be closed till 8th of january near satpuda parwatranga)

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा डोंगर रांगांना जोडणारा रोषमाळ – कोठार – तळोदा राष्ट्रीय महामार्ग आठ लगत असलेला चांदसैली घाट रस्ता हा आठ जानेवारीपर्यंत बंद करण्यात आला आहे. घाटाची दुरुस्ती करण्यासाठी तो बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिला असून अत्यावश्यक सेवा देणारी वाहन वगळता इतर वाहनांसाठी हा घाट बंद राहणार आहे. हा घाट बंद असल्यामुळे धडगाव तालुक्यातील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. आता सातपुड्यातील नागरिकांना जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या नंदुरबारला येण्यासाठी शहादा मार्गे यावे लागणार आहे.

हेही वाचा :  Rohan Bopanna : 'खेळ असो वा राजकारण, वयाची मर्यादा फक्त...', अजित पवारांवर खोचक टीका!

सातपुडा पर्वत आणि खासियत: 

सातपुडा पर्वतरांगाचा (Satpuda mountain) विस्तार हा खूप मोठा असून तो नाशिक या जिल्ह्यापर्यंत आहे. सातपुडा पर्वतरांगामधले निसर्ग सौंदर्य हे कायमच सगळ्यांना आकर्षित करणारे आहे. आपल्या देशातीलच काय परदेशातील व्यक्तीही या ठिकाणी पर्यटक म्हणून येथे येतात. खानदेशातील जळगाव, धुळे ते नंदूरबार या जिल्ह्यांतून सातपुडा पर्वतरांगा पसरल्या आहेत. येथे अनेक वन्यजीव, वनस्पती आहेत. सातुपडा पर्वतरांगांचे वैशिष्ट्य तुम्हालाही वाचून परत आकर्षित करेल. 

 नंदूरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा प्रत्यक्षात पाहून तुमच्या डोळ्याचे पारणं फिटेल. या ठिकाणी या जागेचे निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी बाराही महिने खानदेशातीलच नाही तर गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थान या भागातीलही अनेक मंडळी येथे येतात आणि या निसर्गरम्य ठिकाणी भेट देतात. याठिकाणी अनेक प्रेक्षकणीय स्थळं आहेत. महाबळेश्वर, (mahabaleshwar) लोणावळाप्रमाणे (lonavala) हा येथे असणारा चांदचौली घाटही प्रेक्षणीय आहे. सीताखाई, यशवंत तलाव, तोरणमाळ तसेच पौराणिक महत्त्व असलेले अश्वस्थामाचे शिखर, वाल्हेरी येथील फेसाळणारे धबधबे, चांदसैली घाटातील आकर्षित करणाऱ्या पर्वतरांगा, डोंगरावरील अशी अनेक नयनरम्य ठिकाणं येथे आहेत. बिलगाव येथील बारामुखी धबधबा, कुंडलेश्वर येथील महादेव मंदिर व गरम पाण्याचे झरे आकर्षित करतात. गेंदा गावाजवळ नैसर्गिकरीत्या तयार झालेली दरी, चांदसैली घाट रस्त्यावरून गढवली, रोझवा अशी अनेक ठिकाणं फिरण्यासारखी आहेत.  

हेही वाचा :  4 कोट्यधीश, 2 अब्जाधीश; एकाची संपत्ती तर तब्बल 450 कोटी! पाहा, राज्यसभेच्या सर्व उमेदवारांची नेटवर्थ

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …