धोनी-विराटलाही टाकलंय मागं; यावर्षात ‘या’ खेळाडूचं गूगलवर सर्वाधिक सर्च

Most searched Indian Cricketer: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि स्टार फंलदाज विराट कोहलीच्या (Virat Kohli) चाहत्यांची संख्या कोटींमध्ये आहे. महेंद्रसिंह धोनीनं 15 ऑगस्ट 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. मात्र, अजूनही त्याच्या फॅन फॉलोईंगमध्ये कोणतीही कमतरता पाहायला मिळाली नाही. पण यावर्षी गूगलवर सर्च केलेल्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये धोनी, विराट यांचं नाव नसून या यादीत प्रविण तांबेचं (Pravin Tambe) नाव पहिल्या क्रमांकावर आहे.

प्रवीण तांबे हा यावर्षी गूगलवर सर्वाधिक सर्च केलेला भारतीय खेळाडू ठरला आहे. तांबेनं आयपीएलमध्ये गोलंदाजी केली आहे. महत्त्वाचं म्हणजे, त्यानं कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला नाही. परंतु, असं असताना त्याचं गूगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या यादीत अव्वल स्थान नाही. त्याचं या यादीत अव्वल स्थान असणं खरोखरच आश्चर्यकारक आहे. या वर्षी प्रवीण तांबेंचा बायोपिक प्रदर्शित झाला ज्यामध्ये श्रेयस तळपदेनं उत्कृष्ट अभिनय केलाय. बहुधा या चित्रपटामुळं तांबेला गूगलवर सर्वाधिक सर्च केलं असावं.

तांबे प्रेरणादायी प्रवास
वयाच्या 41 व्या वर्षापर्यंत तांबे यांनी कोणतेही व्यावसायिक क्रिकेट खेळले नाही. परंतु, त्यानंतर राजस्थान रॉयल्सनं त्यांना इंडियन प्रीमियर लीगमध्ये संधी देऊन त्यांचे आयुष्य बदलून टाकलं. तांबेनं राजस्थानकडून खेळताना चमकदार कामगिरी केली. त्यानंतर त्याचा कोलकाता नाईट रायडर्समध्येही समावेश करण्यात आला. मात्र, टी10 लीगमध्ये खेळल्यामुळं त्याला भारताच्या कोणत्याही देशांतर्गत सामन्यात खेळण्यास बंदी घालण्यात आली होती. सध्या तो कोलकाता संघात गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे.

हेही वाचा :  ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीपूर्वी विराट पोहोचला ऋषीकेशला, पत्नी अनुष्कासोबत घेतलं दर्शन

प्रविण तांबेची कारकिर्द
51 वर्षांचे असलेले तांबे यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण 64 टी-20 सामने खेळले. ज्यात त्यानं 70 विकेट्स घेतल्या आहेत.  15 धावांत चार विकेट्स घेणं ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याची इकोनॉमी सात पेक्षा कमी आहे. 

News Reels

हे देखील वाचा-

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …