आयसीसीचा विराटला सलाम! ‘त्या’ षटकाराची ‘ग्रेटेस्ट टी-20 शॉट ऑल टाईम’ म्हणून निवड

Greatest single T20 shot of all time: भारताच्या टी-20 विश्वचषकातील सलामीच्या लढतीत स्टार फलंदाज विराट कोहलीच्या (Virat Kohli)  तडाखेबाज खेळीच्या जोरावर भारतानं पाकिस्तानचा (IND vs PAK) चार विकेट्सनं धुव्वा उडवला. या सामन्यात कोहलीनं पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफच्या (Haris Rauf) चेंडूवर अप्रतिम षटकार मारला होता. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. दरम्यान, आयसीसीनं (ICC)  विराटच्या या अप्रतिम षटकाराची ग्रेटेस्ट टी-20 शॉट्स ऑफ ऑल टाईम म्हणून निवड केलीय.

पाकिस्तानविरुद्ध भारतानं सुरुवातीलाच विकेट गमावल्या होत्या. हा सामना पाकिस्तानच्या बाजूनं झुकलेला दिसत असताना विराट कोहली आणि हार्दिक पाड्यांनं संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. अखेरच्या तीन षटकात भारताला विजयासाठी 48 धावांची गरज होती. कोहलीनं 19वं षटक टाकणाऱ्या हरिस रौफची चांगलाच समाचार घेतला. या षटकात रौफनं चार चेंडूत कमी धावा दिल्या. पण पाचव्या आणि अखेरच्या चेंडूवर विराटनं षटकार खेचून सामन्याचं रुप बदललं. दरम्यान, विराटनं रौफच्या पाचव्या चेंडूवर मारलेल्या षटकाराची जोरदार चर्चा रंगलीय. पाचव्या चेंडूवर विराटनं समोरच्या बाजूला षटकार मारला. हा चेंडू संथ आणि आखूड टप्पाचा होता. मात्र, तरीही विराटनं या चेंडूवर अप्रतिम षटकार मारला.

हेही वाचा :  लाहिरु कुमाराने अप्रतिम गोलंदाजीच्या जीवावर बाद केलं विराटला, बोल्डचा VIDEO पाहण्यासारखा

व्हिडीओ-

 

विराटच्या षटकाराला आयसीसीचा सलाम
आयसीसीच्या म्हणण्यानुसार, कोहलीनं षटकार मारला, तो परिस्थितीनुसार कोणत्याही फलंदाजासाठी अशक्य गोष्ट शक्य करून दाखवण्यासारखा होता.यामुळं आयसीसीनं विराटच्या अप्रतिम षटकाराची ‘ग्रेटेस्ट टी-20 शॉट ऑल टाईम’म्हणून निवड केलीय. वेगवान गोलंदाजाविरुद्ध फुल लेन्थ चेंडूवर समोरच्या दिशेनं षटकार मारणं खरोखरच कौतुकास्पद आहे.

टी-20 विश्वचषकात भारताची निराशाजनक कामगिरी
ऑस्ट्रेलियात नुकतीच पार पडलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये भारताला इंग्लंडकडून 10 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवासह भारताचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. या स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. पण भारताला सेमीफायनल सामन्यातील दबावाला सामोरे जाता आलं नाही. यासह पुन्हा भारताचं  टी-20 विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. भारतानं 2007 मध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात पहिला टी-20 विश्वचषक जिंकला होता. तेव्हापासून टी-20 विश्वचषक जिंकता आला नाही.

हेही वाचा :  शिखर धवन की मयांक अग्रवाल? पंजाबचं नेतृत्व कोणाकडं? फ्रँचायझीकडून नव्या कॅप्टनची घोषणा

हे देखील वाचा-



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …