नवाब मलिक पुन्हा ‘ईडी’ कार्यालयात


मुंबई:  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या प्राकृतीमध्ये सुधारणा झाल्यामुळे सोमवारी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. पोटदुखीच्या त्रासामुळे शुक्रवारी त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कुल्र्यातील जमीन बळकावल्याप्रकरणी त्यांना ३ मार्चपर्यंत सक्तवसुली संचलनालय (ईडी) कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे ईडीने त्यांना बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात नेले.

नवाब मलिक यांना २५ फेब्रुवारीला सकाळी वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात आणले होते0. नवाब मलिक यांची प्रकृती खाल्यावल्यामुळे त्यांना दुपारी २.३०च्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना सोमवारी सकाळी १० च्या सुमारास रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले.

कुर्ला येथील ३०० कोटी रुपये किमतीची जमीन बळकावल्याप्रकरणी सध्या ईडी तपास करीत आहे. हसीना पारकरच्या हस्तकांनी ही जागा बळकावली होती. त्याप्रकरणी मनी लाँडिरग झाल्याचा ईडीला संशय आहे. या जमिनीची किंमत विक्रीखतानुसार तीन कोटी ३० लाख रुपये होती. त्यातील केवळ १५ लाख रुपये मलिक यांच्याकडून भरण्यात आल्याचा आरोप आहे.

नवाब मलिक यांच्या मुलाला समन्स

नवाब मलिक यांचे पुत्र फराझ मलिक यांना ईडीने समन्स बजावले होते. पण ते आज ईडी कार्यालयात आले नसल्याचे सूत्रानी सांगितले. या प्रकरणातील व्यवहारांचे व कंपनी संबंधित कागदपत्रांसह त्यांना बोलवण्यात आले होते, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी मलिक यांच्याकडून वेळ मागण्यात येणार असल्याचे मालिक कुटुंबीयांच्या निकटवर्ती सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा :  “किरीट सोमय्या नावाचा नवीन शिपाई ईडीच्या कार्यालयात लागलेला दिसतोय, त्याला…”

The post नवाब मलिक पुन्हा ‘ईडी’ कार्यालयात appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …