जगभरातील सोने संपणार? पृथ्वीवर आता फक्त इतके टक्केच उरलंय? जाणून घ्या

Gold mines : जगभरातील अनेक देशात सोन्याचे उत्खनन होते. या सोन्यामुळे त्या त्या देशांची अर्थव्यवस्था चालत असते. मात्र या देशांसाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. जगभरातील सोन आता संपत चाललंय. येत्या 20 वर्षात पुथ्वीवरचे सोने संपणार आहे? त्यामुळे ही फारच चिंताजनक बाब आहे. तज्ञांनी देखील यावर चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आता पृथ्वीवर किती टक्के सोने उरलंय? आणि सोन्याचा नवीन शोध कूठून लावण्यात येणार आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

येत्या 20 वर्षात सोने संपणार? 

अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँक गोल्डमन सॅक्सला भीती आहे की, येत्या 20 वर्षांत जमिनीखालील सोने पूर्णपणे संपणार आहे. कारण जगभरात खुप वेगाने उत्खनन होत आहेत, त्यामुळे पृथ्वीवरचे सोने संपत चालले आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात सोने पुर्णपणे संपन्याची भीती आहे, 

इतकं सोने उरलंय?

यूएस जिऑलॉजिकल सर्व्हेनुसार, आतापर्यंत सुमारे 2 लाख टन सोने काढले गेले आहे. आता पृथ्वीवर फक्त 50 हजार टनच सोने शिल्लक आहे. जर पृथ्वीखाली 50 हजार टन सोने उरले असेल तर ते दोन मालवाहू जहाजांमध्ये येऊ शकेल इतकेच आहे. विशेष म्हणजे पृथ्वीवर किती टक्के सोने शिल्लक आहे, याबाबत वेगवेगळ्या संस्था वेगवेगळी आकडेवारी देतात, त्यात थोडाफार फरक असतो. 

हेही वाचा :  राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार, देशावर पावसाळी वारे घोंगावणार; पाहा हवामानाचा अंदाज

कंपन्या काय करणार? 

अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँकर जिम रिचर्ड्स त्यांच्या ‘द न्यू केस फॉर गोल्ड’ या पुस्तकात सांगतात की, सोने संपणार आहे, याबाबत अनेक भाकीते करण्यात आली आहे. मात्र तरीही खाणकाम चालूच राहील. यासाठी नवीन तंत्रे येतील. ज्या ठिकाणी कोणी जात नाही अशा ठिकाणी खाणी टाकल्या जातील.या सगळ्यामुळे असे होईल की छोट्या खाण कंपन्यांच्या जागी फक्त काही कंपन्याच उरतील. तसेच पैसा असणाऱ्या कंपन्या सर्व अशक्य वाटणाऱ्या ठिकाणांचा शोध घेतील.

दुसऱ्या ग्रहावर सोने शोधणार?

पृथ्वीवर जरी सोने संपले तरी अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथून सोने उत्खनन केले जाऊ शकते. जसे समुद्राच्या खाली, बर्फाळ वाळवंटात शोध घेतला जाऊ शकतो. या प्रश्नावर खगोल भौतिक शास्त्रज्ञ डॉ. नील डीग्रास टायसन यांनी सुचवले की अंतराळात असलेल्या लघुग्रहांमध्ये सोन्याचा साठा असू शकतो. हे खरे असेल तर ही जगासाठी मोठी आशा असू शकते. 

लघुग्रहावर आहे सोने? 

अंतराळात बृहस्पति आणि मंगळ यांच्यामध्ये एक असा लघुग्रह आहे, ज्याला स्पर्श केल्यास पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्ती श्रीमंत होईल. या लघुग्रहाचे नाव 16-सायक आहे, जो सोने, प्लॅटिनम, निकेल आणि लोहापासून बनलेला आहे. सुमारे 225 किलोमीटर व्यासाच्या या तुकड्यात इतके सोने आहे, ज्याची निश्चित गणनाही करता येत नाही.

हेही वाचा :  ‘परी म्हणू की सुंदरा’, श्रियाची अदा करी फिदा, रेड कार्पेटवर अवतरली अप्सरा

सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार? 

पृथ्वीवर सोने संपल्यास सर्वसामान्यांवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे.सोन्याची भाव (Gold Rate) वाढण्याची भीती आहे. यामुळे ते सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर जाईल. अशा परिस्थितीत नागरीकांजवळ असलेले सोनेच शेवटचे सोने असणार आहे. आणि हाच त्यांचा आधार असणार आहे. 

दरम्यान ही घटना जगभरातील संपुर्ण देशांसाठी धक्कादायक असणार आहे.याचा सर्वसामान्यांवर मोठा परिणाम होणार आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …

लहानपणी शाळेत खाल्लेला रट्टा लागला जिव्हारी, अभिनेत्याने शाळा विकत घेत फिरवला बुलडोझर

Trending news in Marathi : आई वडील असो किंवा शिक्षक मुलांना चांगली सवय आणि शिस्त …