Imran Khan च्या एक्स वाईफने तिसऱ्यांदा केलं लग्न, फोटो केले शेअर

Imran Khan X-Wife Marriage: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांची पूर्वाश्रमीची पत्नी (X-Wife)  रेहम खानने (reham khan) तिसर्‍यांदा लग्न केले आहे. रेहमने तिच्यापेक्षा 14 वर्षांनी लहान बिलालशी (Mirza Bilal) लग्न केले आहे. या लग्नाबाबतची घोषणा तिने सोशल मीडियावर केली आहे. या लग्नाची आता एकच चर्चा सुरू झाली आहे.

पोस्टमध्ये काय?

इम्रान खान (Imran Khan) यांची माजी पत्नी (X-Wife)  रेहम खानने (reham khan)  पाकिस्तानी अभिनेता आणि व्यंगचित्रकार मिर्झा बिलाल (Mirza Bilal) यांच्याशी लग्न केले आहे.49 वर्षीय रेहमने ट्विट करून याबाबतची घोषणा केली आहे. या ट्विटमध्ये तिने म्हटलेय की,अमेरिकेतील सिएटल शहरात एका साध्या सोहळ्यात बिलालसोबत लग्न केले आहे. 

फोटोत काय? 

रेहम खानने (reham khan) बिलालसोबतचा (Mirza Bilal) लग्नाचा फोटोही तिने ट्विटरवर शेअर केला आहे. पहिल्या फोटोत, दोघेही हात धरून त्यांच्या लग्नाच्या अंगठी दाखवताना दिसत आहेत. रेहम आणि बिलाल या दोघांचे हे तिसरे लग्न आहे.

कोण आहे बिलाल?

बिलाल (Mirza Bilal) सूरूवातीला एक मॉडेल होता.’द 4 मॅन शो’, ‘दिल पे मत ले यार’ आणि ‘नॅशनल एलियन ब्रॉडकास्ट’ सारख्या शोचा भाग होता. रेहमचे पहिले लग्न मनोचिकित्सक इजाज रहमान यांच्याशी झाले होते. त्यांनी 1993 मध्ये लग्न केले आणि 2005 मध्ये घटस्फोट घेतला, अशी माहिती एका पोर्टलने दिली आहे. 

हेही वाचा :  Job News : तरूणांसाठी नोकरीची संधी... 'या' ठिकाणी आहेत अनेक रिक्त पदं

इम्रान खानसोबत घटस्फोट?

ब्रिटिश-पाकिस्तानी पत्रकार रेहमने (reham khan) 2014 मध्ये खानसोबत लग्न केले होते आणि एका वर्षाच्या आतच 2015 मध्ये हे लग्न तुटले. रेहमने इम्रान खानसोबत दुसरे लग्न केले जे फक्त 10 महिने टिकले. त्यांनी 2014 मध्ये लग्न केले आणि 2015 मध्ये वेगळे झाले होते. 

दरम्यान आता इम्रान खान (Imran Khan) यांची माजी पत्नी (X-Wife)  रेहम खानच्या (reham khan) या लग्नाची एकच चर्चा रंगली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …