सुपरस्टार विकीचं कौतुक करण्यासाठी सिंपल कपड्यात आई बाबांची हजेरी, नेटकऱ्यांना साधेपणा भावला

विकी कौशलने आपल्या अभिनयाच्या जोरावर कला क्षेत्रामध्ये आपली ओळख निर्माण केली. उत्तम चित्रपटांची निवड करुन त्यांने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. पण या झगमगत्या दुनियेत विकीने त्याचा साधेपणा कायम ठेवला आहे. विकीचा हा नम्र आणि साधेपणा त्याच्या पालकांकडून आला आहे यात कोणताही वाद नाही. सध्या विकी कौशलच्या ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. नुकतेच या चित्रपटाची स्क्रिनींग ठेवण्यात आली होती. यावेळी सुपरस्टार लेकाचं कौतुक करण्यासाठी सिम्पल कपड्यात आई बाबांची हजेरी. विकीच्या लग्नामध्ये सुद्धा त्यांचा हा साधा लुक पाहायला मिळाला होता. (फोटो सौजन्य: @योगेन शाहा)

​साध्या पंजाबी सुटवर आईची एन्ट्री

लेकाचं भर भरुन कौतुक करण्यासाठी विकीच्या आईने साधा ब्लु रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसला गोल नेकलाईन देण्यात आली होती. तर त्यांच्या गळ्याच्या भोवती नाजूक फुलांची नक्षी काढण्यात आली होती. सिल्कच्या या ड्रेसमध्ये विकीची आई अगदी सर्वसामान्य स्त्रीसारखी दिसत आहे.

हेही वाचा :  RRR OTT Release Date : राजामौलींचा 'आरआरआर' सिनेमा 'या' दिवशी होणार ओटीटीवर प्रदर्शित

​हातात पर्स आणि सिम्पल मेकअप

यावेळी विकीच्या आईने हातमध्ये सिम्पल पर्स आणि अगदी हलका मेकअप केला होता. तर सिल्वर रंगीची हिल्स घालुन त्यांनी त्याचा लुक पूर्ण केला लेकाची प्रगती पाहून या माऊलीच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य पाहायला मिळत आहे.

​ओढणीने वाढवला लुक

विकीच्या आईने या ड्रेसवर घेतलेल्या ओढणीने त्या ड्रेसला सुंदर लुक आला होता. एखाद्या पार्टीला तुम्ही देखील असा लुक कॅरी करु शकता.

​शाम कौशल यांचा हिरोला लाजवेल असा लुक

मुलाचं काम पाहण्यासाठी शाम कौशल यांनी ग्रे पॅंन्ट आणि व्हाईट टी शर्ट परिधान केले होते. त्यावर त्यांनी ब्लॅक जॅकेट देखील परिधान केले होते. त्यांचा हा साधेपणा तेथे उपस्थित लोकांनी खूप आवडला.

​हातात हात घालून काढले फोटो

विकीची प्रगती आणि सर्व करत असलेले कौतुक या दोघांच्या चेहऱ्यावर स्पष्ट पणे दिसत आहे. पण कॅमेराची सवय नसल्याने यावेळी या दोघांनी एकमेकांच्या हातात हात घालून फोटो काढले आहेत.

​असा होता विकीचा लुक

यावेळी विकीने व्हाईट रंगाचे शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट परिधान केली होती. यावेळी त्यांच्या ब्लॅक रंगाच्या शुजने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (वाचा :- सिक्वेन ड्रेसमध्ये भूमीचा ग्लॅमरस अंदाज,गळ्याच्या डिझाईनने वेधलं सर्वांचे लक्ष, चाहते म्हणतात ”पटाखा पेडणेकर”)

हेही वाचा :  December Release : डिसेंबरमध्ये बॉलिवूडचा धमाका; ब्लॉकबस्टर सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …

सिनेस्टाइल पाठलाग करत उधळला डाव, गाडीतील वस्तू पाहून पोलिसही थक्क, तब्बल 2 कोटींचे…

Sandalwood Smuggling: भारताचे ‘लाल सोनं’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदनाची खुलेआम तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा …