‘आम्ही तुम्हाला नोकरी का द्यायची?’, मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाचे ‘असे’ द्या प्रभावी उत्तर

Interview Tips: एखादी मुलाखत द्यायची असेल तर द्याआधी आपण जोरदार तयारीला लागतो. संभाव्य प्रश्नांची यादी काढून त्याची उत्तरे तोंडपाठ करतो. पण मुलाखत घेणारा आपल्यापेक्षा अधिक अनुभवी आणि हुशार असतो. त्यामुळे तो भलताच प्रश्न विचारुन तुम्हाला बुचकळ्यात पाडू शकतो. त्या सर्वांची अचूक उत्तरे दिली तर तुमची निवड होण्याची शक्यता खूप जास्त असते. अनेकदा मुलाखतीत ‘आम्ही तुम्हाला का कामावर ठेवू’ असा प्रश्न विचारला जातो, ज्याचे उत्तर देताना तुम्हाला कदाचित समोर काहीच आठवणार नाही. अशावेळी काय करायचं याच्या टिप्स आताच जाणून घ्या. ज्यामुळे तुमची नोकरी पक्की झाली असं समजा.

मुलाखतीत ‘आम्ही तुम्हाला नोकरी का देऊ’ याच्या उत्तरात तुमच्याकडे कोणती कौशल्ये आहेत आणि कंपनीत निवडलेल्या व्यक्तीमध्ये कोणते गुण असायला हवेत हे जरूर सांगावे. जर तुम्ही मुलाखतीत तुमच्या कौशल्यांबद्दल योग्य माहिती दिली असेल आणि कंपनीची उद्दिष्टे लक्षात घेऊन तुमच्या कौशल्यांची माहिती द्यावी.

Online interview मध्ये यश मिळवायचे असेल तर ‘या’ ७ टिप्स फॉलो करा

तुमचे प्लस पॉइंट्स

मुलाखतीत विचारलेल्या ‘आम्ही तुम्हाला नोकरी का द्यायची’ या प्रश्नाच्या उत्तरादाखल, तुम्ही तुमचे प्लस पॉइंट्स सांगायला हवेत. तुम्ही तुमच्या कामगिरीबद्दल माहिती दिली पाहिजे. यामुळे तुमची निवड होण्याची शक्यता वाढेल आणि तुम्ही या पदासाठी योग्य आहात हे कंपनीला कळण्यासही मदत होईल.

हेही वाचा :  Latest Job News : लष्करात थेट अधिकारी पदासाठी नोकरीची संधी; गडगंज पगारानं पदवीधर होणार मालामाल

तुम्ही आतापर्यंत केलेल्या एखाद्या कामगिरीचे उदाहरण देऊन आपला मुद्दा स्पष्ट करा.हे उत्तर देताना समोरच्याच्या डोळ्यात बघण्याचा प्रयत्न करा. यातून तुमचा आत्मविश्वास दिसेल आणि नोकरी मिळण्याची शक्यता अधिक असेल.

स्पष्ट उत्तर द्या

तुम्हाला तुमच्या मुलाखतीत ‘आम्ही तुम्हाला कामावर का घेऊ’ या प्रश्नाचे उत्तर लहान आणि स्पष्ट ठेवावे. यासोबतच मुलाखतीत ‘मी खूप मेहनत करतो’ आणि ‘मी हे काम सहज करेन’ अशी ठरलेली उत्तरे देणे टाळा. तुम्ही दिलेले काम ठरलेल्या वेळेत करता हे पटवून द्या. तुमच्या स्किल्सबद्दल देखील माहिती द्या.

Interview Tips: मुलाखत देताना घाम फुटतो? काहीच आठवत नाही?..मग ‘या’ टिप्स करा फॉलो

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …