केंद्र सरकारच्या सल्ल्यावर उर्फी जावेदने शेअर केला भाजप नेत्याचा ‘तो’ व्हिडीओ

Urfi Javed Tweet On Cow Hug : सध्या व्हॅलेंटाईन वीकचा माहोल आहे. 14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेटाईन डे’ (Valentine Day) बरोबरच ‘काऊ हग डे’देखील (Cow Hug Day) साजरा करण्याचे आवाहन  केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन मंत्रालयाने दिले होते.  आता यावर आपल्या फॅशन आणि हटके स्टाईलमुळे चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदने (Urfi Javed) ट्वीट केलं आहे. 

उर्फीने (Urfi Javed) शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये  भाजप नेते गाईजवळ जाताना दिसत आहेत. पण ते गाईजवळ जाताच गाय त्यांना पाय मारत आहे. त्यानंतर ते पुन्हा गाईला हात लावण्याचा प्रयत्न करतात पण गाय त्यांना पुन्हा मारते. हा व्हिडीओ शेअर करत उर्फीने लिहिलं आहे,”cowhugging”. उर्फीने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उर्फीच्या या ट्वीटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या ट्वीटवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

उर्फीने आणखी एक गंमतीशीर ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमधील फोटोत एक माणूस गाईला मिठी मारण्यासाठी जाताना दिसतो आहे. पण त्यावेळी बैल म्हणतोय,”लांब हो… ती माझी ‘व्हॅलेटाईन आहे”. हे ट्वीट शेअर करत उर्फीने लिहिलं आहे,”गाईचीदेखील संमती असणं आवश्यक आहे. #cowhugging”. 

हेही वाचा :  विजय अन् रश्मिकाच्या 'वरिसु' चा ट्रेलर रिलीज

‘काऊ हग डे’बद्दल जाणून घ्या… (Cow Hug Day) 

14 फेब्रुवारीला गाईला मिठी मारावी (Cow Hug Day), असं आवाहन केंद्रीय मत्स्य, पशुपालन आणि डेअरी मंत्रालयाच्या निर्देशानुसार, पशुकल्याण बोर्डाने केलं होतं. यावर देशात बरीच चर्चा झाली. अनेक मतमतांतरं आली आणि या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. त्यामुळे केंद्र सरकार बॅकफूटवर गेलं. अखेर शुक्रवारी हे आवाहन मागे घेत असल्याची माहिती केंद्रीय मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली

गाईला मिठी मारणे केवळ त्यांच्या आरोग्यासाठीच नाही तर माणसांच्या आरोग्यासाठीही चांगले आहे. यामुळे माणसाला सकारात्मक राहायला मदत होते. तसेच पाळीव प्राण्यांबरोबर थोडा वेळ घालवणे, त्यांच्यासोबत खेळणे, बसणे यामुळे मनाला शांती मिळते. गायीला मिठी मारल्यामुळे त्या व्यक्तीचे आणि त्या गाईचे आरोग्य चांगले राहते, असे बोर्डचे म्हणणे आहे.  

संबंधित बातम्या

Valentine’s Day 2023 : 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याऐवजी गायींना मिठी मारून प्रेम दाखवा : पशु कल्याण मंडळाची मागणी



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …