फेब्रुवारी 29, 2024

IPL Mega Auction 2022 : मिस्टर IPLला धक्का; रैनासह ‘हे’ चार खेळाडू राहिले UNSOLD!

पहिल्या फेरीत ‘या’ चार खेळाडूंना कोणीही आपल्या संघात घेतले नाही.

आयपीएल २०२२मध्ये (IPL 2022) आता दोन नवीन संघ खेळताना दिसणार आहे. लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन नवीन संघ जोडले गेले आहेत. लीगच्या १५व्या हंगामासाठी बंगळुरूमध्ये मेगा ऑक्शन सुरू आहे. या ऑक्शनमध्ये पहिल्या दिवशी दुपारपर्यंत चार खेळाडू अनसोल्ड राहिले आहेत. यात भारताच्या दिग्गज खेळाडूचा समावेश आहे.

मिस्टर आयपीएल सुरेश रैना अनसोल्ड राहिला आहे. ३५ वर्षीय रैना मागील मोसमात फ्लॉप ठरला होता, त्यामुळे कोणत्याही फ्रेंचायजीने त्याच्या नावावर लिलावात रस दाखवला नाही. या लीगमधील यशस्वी फलंदाज असल्यामुळे रैनाला मिस्टर आयपीएल म्हटले जाते. त्याचा मित्र आणि भारताचा माजी ऑफ-स्पिनर हरभजन सिंगनेही त्याच्यावर कोणत्याही फ्रेंचायझीने बोली न लावल्याने निराशा व्यक्त केली

हेही वाचा – IPL Auction 2022: लिलाव सुरु असताना अचानक ऑक्शनर कोसळला अन्…; धक्कादायक Video व्हायरल

याशिवाय, टी-२० लीगमधील स्फोटक फलंदाजांपैकी एक असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरवरही कोणत्याही फ्रेंचायझीने रस दाखवलेला नाही. तसेच ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन अनसोल्ड राहिला आहे.

हेही वाचा :  नवाब मलिक यांना भर चौकात फाशी द्या; भाजपा आमदार लांडगे यांची जीभ घसरली

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …