“डॉक्टर आम्हाला सगळं मांसाहाराचंच सांगायचे”, अजित पवारांनी सांगितली करोना काळातली आठवण!

करोनासंदर्भातली आपली आठवण सांगताना अजित पवार यांनी मांसाहारी आहाराविषयी मिश्किल टिप्पणी केली आहे.

गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ जगभरात करोना ठाण मांडून बसला आहे. करोनाचा सामना करण्यासाठी आता प्रभावी लसी देखील उपलब्ध झाल्या असून जगभरात वेगाने लसीकरण केलं जात आहे. मात्र, करोनाच्या सुरुवातीच्या काळात डॉक्टरांकडून बाधितांना वेगवेगळ्या प्रकारचे उपचार सुचवले जात असत. यासंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बोलताना एक गंमतीशीर आठवण सांगितली आहे. पुण्यात जैव सुरक्षा स्तर 2 आणि 3 नविन प्रयोगशाळेच्या बांधकामाचे भूमिपूजन आणि कुक्कुट व विषाणू लस निर्मिती प्रयोगशाळा नवीन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

अजित पवारांनी सांगितली करोनाची आठवण!

यावेळी शाकाहार विरुद्ध मांसाहार यासंदर्भातला विषय निघाल्यानंतर अजित पवारांनी त्यांना करोना झाल्यानंतरची आठवण सांगितली आहे. “आम्हाला जेव्हा गेल्या वर्षी करोना झाला आणि उपचारांनंतर आम्ही बाहेर पडलो, तेव्हा डॉक्टर सांगायचे जरा पौष्टिक आहार घेतला पाहिजे. मग काय घ्यायचं, तर पाया सूप घ्या. असलं काहीतरी सांगायचे. जे काही सांगायचे ते नॉन व्हेजचंच सांगायचे. चिकन सूप घ्या, पाया सूप घ्या, मटण सूप घ्या”, असं अजित पवार म्हणाले.

हेही वाचा :  संत गजानन शेगावीचे मालिकेतील हि बालकलाकार आहे प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी - Bolkya Resha

“यमदेव घेऊन जातो तेव्हा त्याच्या जवळही रेडा असतो, म्हणून…”; अजित पवारांनी सांगितलं पशुपालनाचं महत्त्व

“शाकाहारी वि. मांसाहारी हा कित्येक वर्षांचा वाद”

“जे शाकाहारी आहेत त्यांची पंचाईतच आहे. मग त्यांच्यासाठी तेवढ्याच तोडीचं काहीतरी द्यायचा प्रयत्न केला गेला. मशरूम हे त्यातलं एक समजलं जातं. पण ठीक आहे. शाकाहारी विरुद्ध मांसाहारी हे पिढ्यान पिढ्या चालत आलं आहे. त्याच्याबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात. त्यात खोलात जाऊन मी आपला वेळ घेत नाही. पण वर्षानुवर्ष काही समाजघटकांच्या आहारात मांसाहार चालत आला आहे”, असं अजित पवार म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …