Gold Price: सोनं स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Gold Price Today: गेल्या महिन्यात सोन्याच्या दरात आपण सर्वांनीच लक्षणीय वाढ पाहिली परंतु एप्रिल महिन्यापासून मात्र ही वाढ काही अंशी कमी झाल्याचेही पाहायला मिळाले होते. गुढीपाडव्याच्या पुर्वी आणि नंतर काही अंशी ही वाढ घसरत होती त्यामुळे सोन्याचे दरही घसरल्याचे पाहायला मिळाले होते. आता परत सोन्याच्या दरात वाढ होताना दिसते आहे. सोन्याच्या दरात आजही लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. अक्षयतृतीया जवळ येते आहे तेव्हा तुम्हीही सोनं खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडत असाल तेव्हा सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी आधी ही बातमी वाचा. 

आज 24 कॅरेट सोन्याचे दर ही 61,830 रूपये प्रति तोळा तर 22 कॅरेट सोन्याचे दर हे 56,660 रूपये प्रति तोळा इतके आहेत. त्यामुळे आता तुम्हाला सोनं खरेदी करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. 

गुडरिटर्न्सच्या वेबसाईटनुसार, 10 एप्रिलनंतर सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. 11 एप्रिलला 22 कॅरेट सोन्याचे दर हे 55,700 रूपये प्रति तोळा तर 24 कॅरेट सोन्याचे दर हे 60,760 रूपये इतके होते. 12 एप्रिलला हे भाव थोडे अजून वाढलेले दिसले. या दिवशी सोन्याचे भाव हे 22 कॅरेट 56,200 रूपये प्रति तोळा होते तर 24 कॅरेट सोन्याचे भाव हे 61,310 प्रति तोळा इतके होते. म्हणजेच एका दिवसात 22 आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत ही अनुक्रमे 500 रूपये प्रति तोळा आणि 550 रूपये प्रति तोळ्यानं वाढली. 

हेही वाचा :  मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाची मोठी कारवाई! वर्षभरात तब्बल 86 व्यक्तींचा वाचवला जीव

काय होते आत्तापर्यंतचे दर? 

गुडरिटर्न्सनुसार, या आधी 10 दिवस सोन्याचे दर हे प्रचंड वाढले होते. 24 कॅरेट सोनं हे 61,115 रूपये प्रति तोळा इतके होते. तर 22 कॅरेट सोनं हे 56,023 रूपये प्रति तोळा इतके होते. त्यातून गेल्या महिन्याभरातील हा दरही प्रचंड वाढला आहे. 24 कॅरेट सोनं हे 60,504 रूपये प्रति तोळा इतके होते तर 22 कॅरेट सोनं हे प्रति तोळा 55,462 रूपये इतके होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये ही चढउतार दिसते आहे. 

तुमच्या शहरातील दर जाणून घ्या (प्रति ग्रॅम)

  • नागपूर – 5,595 रूपये प्रति ग्रॅम 
  • नाशिक – 5,598 रूपये प्रति ग्रॅम
  • पुणे – 5,595 रूपये प्रति ग्रॅम 
  • सोलापूर – 5,595 रूपये प्रति ग्रॅम 
  • कोल्हापूर – 5,595 रूपये प्रति ग्रॅम 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ATM मधून फाटलेल्या नोटा निघाल्यात? घाबरू नका, ‘या’ पद्धतीने मिळवा कोऱ्या करकरीत नोटा

Damaged Note Exchange RBI Rule: एटीएममध्ये पैसे काढायला गेल्यानंतर अनेकदा त्यातून फाटलेले नोटा येतात. एटीएममधून …

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …