जर तुम्हाला जिम आणि डाएट शिवाय किंवा खाण्यापिण्यात बदल न करताच वजन कमी करायचे असेल तर तुम्ही इतर काही सोप्या पद्धती देखील वापरून पाहू शकता. वजन कमी करण्याचे काही सोपे मार्ग देखील आहेत, ज्याद्वारे तुम्ही खाणेपिणे न सोडता चांगले परिणाम मिळवू शकता. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे विज्ञान देखील या पद्धतींचा विचार करते. उदाहरणार्थ, जर तुम्ही जेवणापूर्वी पाणी प्यायले तर ते तुमचे वजन लवकर कमी होण्यास मदत होऊ शकते. चला तर जाणून घेऊया वजन कमी करण्याच्या अशाच काही विचित्र पद्धतींबद्दल. (फोटो साभार: TOI)
जेवणाआधी पाणी प्या

एका संशोधनानुसार, जेवणाच्या 30 मिनिटांपूर्वी सुमारे 16 औंस पाणी प्यायल्याने तुम्हाला स्लिम होण्यास मदत होऊ शकते. या संशोधनातील सहभागींनी जीवनशैलीत कोणताही बदल केला नाही तरीही त्यांचे वजन सुमारे 2 किलो (4.4 पौंड) कमी झाले. जेवण करण्यापूर्वी दररोज 1 ते 1.5 लिटर (34-50 औंस) पाणी पिण्याचा प्रयत्न करा.
(वाचा :- Lassa fever : ओमिक्रॉनमध्येच आता लासा तापाने वाढवली चिंता, ‘या’ लोकांना आहे जास्त धोका, लक्षणं व उपाय जाणून घ्या!)
डोळ्यांवर पट्टी बांधून खा

डोळ्यावर पट्टी बांधून खाल्ल्याने तुमचे वजन लवकर कमी होऊ शकते, असा निष्कर्ष एका जर्मन अभ्यासातून समोर आला आहे. याचे कारण असे की अन्नाकडे न बघितल्याने भूक कमी होते आणि तुम्ही कमी खाता.
(वाचा :- Health tips : सावधान, दिवसभर घालता फिटिंगवाली घट्ट जिन्स? होऊ शकतात ‘हे’ 5 गंभीर आजार..!)
भरपूर कॉफी पिणे

जर तुम्ही कॉफीचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. संशोधनानुसार, कॉफी आणि चहा पिणं वाढवल्याने तुम्हाला भूक आणि सतत काहीतरी खाण्याची इच्छा या दोन्ही गोष्टींवर नियंत्रण ठेवता येते. हे चयापचय क्रिया गतिमान करू शकते आणि व्यायाम करताना अधिक चरबी जाळण्यास मदत करू शकते.
(वाचा :- Weight loss inspiration : 122 किलो वजनामुळे लठ्ठ म्हणून उडवली जायची खिल्ली, सकाळी लिंबू पाणी व मध आणि लंचनंतर हे खास पाणी पिऊन घटवलं तब्बल 41 किलो वजन!)
अधिक प्रोटीन खा

जेव्हा तुम्ही प्रथिनेयुक्त म्हणजेच प्रोटीन जास्त असलेल्या पदार्थांचे सेवन सुरू करता तेव्हा तुम्हाला इतर गोष्टी खाण्याची इच्छा होत नाही. साहजिकच, यामुळे तुम्ही जास्त कॅलरीज घेऊ शकत नाही. प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ल्याने तुमचे वजन कमी होण्यासच मदत होत नाही तर स्नायुंचे वजन वाढण्यासही मदत होते.
(वाचा :- Bathing Habit : आजच सोडा अंघोळीबाबतची ‘ही’ घाणेरडी सवय, दीर्घायुष्यासाठी हार्वर्ड एक्सपर्ट्सनी सांगितली अंघोळ करण्याची योग्य पद्धत..!)
आरामशीर बसून खा

वेळेअभावी बरेच लोक चालता-चालताच जेवतात त्यामुळे वजन झपाट्याने वाढते. तज्ज्ञांचे मत आहे की अन्न नेहमी आरामात एका जागी बसूनच खावे. याचे कारण असे की खाली बसल्याने मेंदूला संदेश जातो की तुम्ही योग्य प्रकारे खाल्ले आहे, ज्यामुळे दिवसभर जास्त खाण्याची शक्यता कमी होते.
(वाचा :- COVID Mask : घाणेरडा मास्क वापरण्याची चूक अजिबात करू नका, थेट फुफ्फुसापर्यंत पोहचेल इनफेक्शन, मास्क एक्सपायर झाला हे कसं ओळखावं?)
32 वेळा चावून खा

जेवण किंवा प्रत्येक पदार्थ नीट चावून खावा यात काही शंकाच नाही. असे मानले जाते की जोपर्यंत पदार्थाचा पूर्ण चुरा होत नाही आणि त्यातील गुठळ्या नाहीश्या होत नाहीत तोपर्यंत अन्न चावून खाल्ले पाहिजे. अन्न व्यवस्थित चावल्याने शरीरात पचनक्रिये दरम्यान जास्त कॅलरीज बर्न होतात. तसेच हळूहळू चघळल्याने पोटातील रक्तप्रवाह सुधारू शकतो.
(वाचा :- Symptoms of High Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढल्यावर येऊ शकतो हार्ट अटॅक, कोलेस्ट्रॉल वाढल्यास डोळ्यांवर दिसतात ‘ही’ लक्षणे, लगेच करा चेकअप!)
टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.