Bleeding Piles : मुळव्याध झालाय? मग औषधं व सर्जरी सोडा, घरच्या घरी करा या 5 उपायांनी मिळवा मुक्ती..!

Bleeding Piles : मुळव्याध झालाय? मग औषधं व सर्जरी सोडा, घरच्या घरी करा या 5 उपायांनी मिळवा मुक्ती..!


पाइल्स (Piles) हा एक सामान्य आजार आहे जो कोणालाही होऊ शकतो. याला वैद्यकीय भाषेत मूळव्याध असेही म्हणतात. हा रोग गुदाशय आणि गुद्द्वाराला प्रभावित करतो. जर मूळव्याध होण्याची कारणं जाणून घ्यायची झाली तर हा सहसा बद्धकोष्ठतेमुळे होणारा आजार आहे. या आजारात शौचास साफ होऊ शकत नाही त्यामुळे गुदाशय आणि गुदद्वाराच्या भागाच्या नसा फुगतात आणि गाठी तयार होतात. या वाढलेल्या चमड्यामध्ये किंवा गाठींमध्ये वेदना होतात आणि कधीकधी रक्त देखील येते. मूळव्याध हे दोन प्रकारचे असतात. पहिला अंतर्गत मूळव्याध जो गुदाशयाच्या आतमध्ये विकसित होतो आणि दुसरा बाह्य मूळव्याध जो बाहेर म्हणजे गुदाशयाच्या भोवतीच्या त्वचेखाली विकसित होतो. या दोन्हींमुळे रुग्णाला रक्त येऊ शकते. अशा परिस्थितीत त्वरित वैद्यकीय उपचार आवश्यक आहेत. मूळव्याधातून रक्तस्त्राव होण्याचा अर्थ आहे की गुदाशय आणि गुद्द्वारमध्ये काहीतरी गंभीर समस्या आहे.

कधीकधी ही समस्या स्वतःहून बरी होते पण काहीवेळा लक्ष न दिल्याने समस्या वाढू शकते. मूळव्याधाच्या लक्षणांमध्ये (Symptoms of Piles) मलविसर्जनाच्या वेळी रक्तस्त्राव, गुदद्वाराला खाज किंवा वेदना, सतत शौचास जाण्याची इच्छा होणे, गुदद्वाराभोवती गाठ येणे किंवा गुदद्वाराभोवती वेदना होणे इत्यादी लक्षणांचा समावेश असतो. रक्तस्त्राव मूळव्याधासाठी औषधे उपलब्ध आहेत, पण काही प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया देखील आवश्यक असू शकते. तथापि, मूळव्याधासाठी काही घरगुती उपाय देखील आहेत, जे बरे होण्यास गती देतात आणि अस्वस्थता कमी करण्यास मदत करतात. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रक्तस्त्राव हे मूळव्याधीचे लक्षण नसते त्यामुळे डॉक्टरांकडून तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. (फोटो साभार: TOI)

हेही वाचा :  लठ्ठपणामुळे व्हाल डायबिटीजसारख्या 5 भयंकर आजारांचे शिकार, पोटावरची चरबी जाळण्यासाठी प्या 'हे' 4 प्रकारचे घरगुती चहा!

सिट्स बाथ घ्या

तुम्ही सिट्झ बाथ घेऊन गुदद्वाराच्या भागात होणा-या वेदना आणि सूज कमी करू शकता. सिट्झ बाथसाठी एक टब भरून गरम पाणी घ्या आणि झाकणामध्ये बीटाडीन लिक्विड घाला आणि त्या पाण्यात थोडा वेळ बसून राहा. तुम्ही पाण्यात थोडं एप्सम सॉल्ट देखील घालू शकता.

(वाचा :- Immunity booster foods : इम्युनिटी होईल 100 पट मजबूत, डाएटिशियनने सांगितले ब्रेकफास्ट, लंच व डिनरमध्ये काय खाणं गरजेचं..!)

वेट वाइप्सचा वापर करा

टॉयलेटला जाताना टॉयलेट पेपर कधीही वापरू नका. ते खडबडीत आणि त्रासदायक ठरू शकते. त्याऐवजी वेट वाइप्स वापरा. लक्षात ठेवा की ते गंधरहित असावेत.

(वाचा :- Heart and Corona Risk : सावधान, हार्ट पेशंट्सवर करोना करतोय जोराचा आघात, कार्डियोलॉजिस्टने सांगितले काय करावं व काय नाही..!)

कोल्ड पॅक वापरा

खरं तर मूळव्याध असताना जेव्हा जेव्हा तुम्हाला टॉयलेटला जावं लागतं तेव्हा खूप वेदना होतात. या वेदनांपासून आराम मिळण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी तुम्ही कोल्ड पॅक वापरू शकता. यासाठी बादली भरून थंड पाणी घ्या आणि एका वेळी 20 मिनिटे त्या पाण्यात बसून राहा.

हेही वाचा :  Honey for weight loss : आठवड्याभरात मेणासारखी वितळेल पोट, कंबर व मांड्यांवरची चरबी, मधात मिक्स करून खा ‘हे’ 6 पदार्थ!

(वाचा :- Cold Chills After Eating : जेवल्यानंतर तुम्हालाही थंडी वाजते किंवा अंग थरथरू लागतं? मग असू शकतात ‘ही’ 6 कारणे!)

पाणी आणि फायबरचे प्रमाण वाढवा

बद्धकोष्ठता टाळण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्या. तुमच्या आहारात फायबरयुक्त पदार्थ समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा, जसे की संपूर्ण धान्य, भाज्या आणि ताजी फळे. हे बद्धकोष्ठता दूर करण्यास आणि मलत्याग करून पोट साफ करण्यास मदत करू शकतात.

(वाचा :- Urination After Eating : सावधान, जेवल्यानंतर लगेचच लघवीला होत असेल तर ‘हे’ 6 सायलेंट आजार असू शकतात कारणीभूत..!)

फिजिकल रूपाने अॅक्टिव्ह राहा

तुम्हाला हे समजले पाहिजे की मूळव्याध बद्धकोष्ठतेमुळे होतो आणि बद्धकोष्ठता हा खराब आहार आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसल्यामुळे होतो. त्यामुळे या दोन्ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही नियमित व्यायाम करणे, धावणे आणि इतर शारीरिक हालचाली केल्या पाहिजेत.

(वाचा :- Weight loss without exercise : पोट-मांड्यांवरचं फॅट होईल कमी, फक्त करा ‘ही’ 8 एकदम फालतू कामं, जिम-डाएटचे पैसेही वाचतील!)

अस्वीकरण: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

हेही वाचा :  Covid19 4th wave : चौथ्या लाटेबाबत Omicron BA.2 बाबत विशेषज्ञांचा दावा, आता फुफ्फुसे नाही तर 'हा' अवयव खराब करतोय व्हायरस..!

Source link