Covid19 4th wave : चौथ्या लाटेबाबत Omicron BA.2 बाबत विशेषज्ञांचा दावा, आता फुफ्फुसे नाही तर ‘हा’ अवयव खराब करतोय व्हायरस..!

करोना व्हायरसचा (Coronavirus) धोका अद्याप कमी झालेला नाही. ओमिक्रॉनने Omicron त्याच्या नवीन सबव्हेरियंट Omicron BA.2 च्या रूपाने पुन्हा एकदा कहर घातला आहे. आशिया आणि युरोपमधील बहुतांश देशांमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये झपाट्याने होणारी वाढ पाहता, कोरोनाची चौथी लाट (Covid 4th wave) कधीही येऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कोलकातामधील तज्ज्ञांच्या एका वर्गाने असा इशारा दिला आहे की, कोरोना विषाणूच्या चौथ्या लाटेतील कोरोनाची लक्षणे पूर्णपणे वेगळी असू शकतात. त्यांनी सांगितले की यावेळी लोकांना पोट किंवा आतड्यांशी संबंधित लक्षणे जाणवू शकतात. त्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे व्हायरस ओळखणे कठीण होऊ शकते.

तज्ञांनी चेतावणी दिली आहे की ओमिक्रॉनच्या सबव्हेरिअंट ba.2 ने युरोप आणि पूर्व आशियामध्ये कहर माजवला आहे आणि अनेक देशांमध्ये प्रकरणे वेगाने वाढत आहेत. या व्हेरिएंटची सर्वात मोठी चिंतेची बाब ही आहे की तो फुफ्फुसांऐवजी पोटावर परिणाम करत आहे, ज्यामुळे पोटात दुखणे, मळमळ आणि अतिसार यांसारखी लक्षणे दिसून येत आहेत. चला तर जाणून घेऊया भारतातील तज्ञ ओमिक्रॉन सबव्हेरिएंटबाबत (Omicron subvariant BA.2) काय म्हणत आहेत. (फोटो साभार: istock by getty images)

फुफ्फुसांऐवजी पोटावर हल्ला करतो आहे BA.2

-ba-2

कोलकाता येथील तज्ज्ञांनी सांगितले आहे की BA.2 ची लक्षणे खोकला किंवा श्वास घेण्यात त्रास ही असण्याऐवजी पोटातील लक्षणांशी संबंधित आहेत. त्यांनी सांगितले आहे की विषाणूने आता त्याचे स्वरूप बदलले असल्याचे दिसत असून आता तो फुफ्फुसांवर नाही तर पोटावर परिणाम करत आहे. आरटीपीसीआरद्वारे याची ओळख करणे देखील कठीण होऊ शकते असे एका अभ्यासात म्हटले आहे.

हेही वाचा :  Viral Video: ....अन् धडकेनंतर कार तब्बल 120 फूट उंच हवेत उडाली, अपघात पाहून अंगावर काटा येईल

(वाचा :- रोज सकाळी ‘हे’ खास पाणी पिऊन या डॉक्टराने घटवलं तब्बल 38 किलो वजन, लठ्ठपणामुळे झाला होता असंख्य आजारांचा शिकार..!)

BA.2 ची लक्षणे असू शकतात हलकी

ba-2-

BA.2 च्या इतर लक्षणांबद्दल बोलताना इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट-ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चचे प्रोफेसर दीपेंद्र सरकार यांनी सांगितले की, ओमिक्रॉनचा या सबव्हेरिएंटची लक्षणे सौम्य असण्याची शक्यता आहे. म्हणून, ते सामान्य खोकला आणि सर्दीपेक्षा जास्त हानिकारक नसावे.

(वाचा :- Covid 4th wave: आरोग्यमंत्र्यांनी सांगितले ‘या’ महिन्यात येणार करोनाची चौथी लाट, यावेळी ही 14 लक्षणं घालणार धुमाकूळ..!)

BA.2 ची पोटाशी संबंधित लक्षणे काय आहेत

ba-2-

यूके स्थित एक टॅब्लॉइड अनुसार, स्टील्थ ओमिक्रॉन किंवा BA.2 व्हेरिएंट नाकाऐवजी आतड्यांवर परिणाम करते आहे. ज्यामुळे पचनसंस्थेशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. याचे परिणाम चुकीचे होऊ शकतात कारण व्हायरसचा नाक किंवा तोंडावाटे शोध घेतला जाऊ शकत नाही. हा व्हेरिएंटमुळे मळमळ, जुलाब, उलट्या, पोटात दुखणे, हीटबर्न आणि सूज येणे यासारख्या पाचन समस्या उद्भवू शकतात.

(वाचा :- Potatoes Quality check : सावधान, कधीच खरेदी करू नका या रंगाचे बटाटे, असू शकतात विषारी, एक्सपर्ट्सनी सांगितली महत्त्वाची माहिती..!)

हेही वाचा :  Vaccination for kids : गुड न्यूज, मुलांचे करोना वॅक्सिनेशन झाले सुरू, वॅक्सिन देण्याआधी आणि दिल्यानंतर करा 'ही' 5 कामे, साइड इफेक्ट्सपासून होईल बचाव

BA.2 ची आतड्यांमध्ये दिसून येतात ही लक्षणे

ba-2-

सीएमआरआय हॉस्पिटलचे पल्मोनोलॉजीचे संचालक राजा धर म्हणाले की, आरटी-पीसीआरमध्ये व्हायरल आढळून येण्याची शक्यता नाही, हा व्हायरल थेट पोटात जाऊ शकतो आणि लक्षणे वाढवू शकतो. कोविडचा प्रसार फुफ्फुसाद्वारे होतो, त्यामुळे त्याचा शोध घेणे सोपे होते. पण संक्रमण पोटातून देखील होऊ शकत असल्याने संसर्ग झाल्याचं ओळखणं थोडं मुश्किल आहे. त्यामुळे प्रमुख लक्षणे आता श्वसनमार्गाऐवजी आतड्यांभोवती दिसून येऊ शकतात.

(वाचा :- Lalu Prasad Yadav health : लालू प्रसाद यादव आहेत ‘या’ 8 भयंकर आजारांनी ग्रस्त, अवस्था झालीये गंभीर, करावं लागलं हॉस्पिटलमध्ये भरती..!)

पोट व आतड्यांमधील ही लक्षणे करू नका दुर्लक्षित

डॉक्टर आरएन टागोर म्हणाले की, करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटे दरम्यान जुलाब आणि पोटदुखी ही कोरोनाची अगदी सामान्य लक्षणे होती. करोडो रुग्णांमध्ये गॅस्ट्रो आणि आतड्यांसंबंधित लक्षणे होती. त्यामुळे व्हायरस आतड्यांपर्यंत पोहोचणे सहज शक्य आहे. एकदा असे झाले की श्वसनमार्गाच्या संसर्गाआधी विशेषत: सुरुवातीच्या टप्प्यातच गॅस्ट्रोइंटेस्टाइनल लक्षणे दिसू शकतात. हे सध्या युरोपमध्ये होत आहे म्हणूनच स्ट्रेनचं निरिक्षण करणे आणि त्याचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले की विष्ठेद्वारे विषाणू पडणे आठवडाभर होऊ शकते. ते म्हणाले की थुंकीच्या तुलनेत विष्ठेमधून कोविड आहे की नाही याचा शोध लावणे अधिक सोपे जाऊ शकते कारण विष्टेमध्ये त्याची लक्षणे अधिक दिसू शकतात आणि याचा सक्सेस रेट 65% ते 70% आहे.

(वाचा :- Yoga for Headache : औषधांमधून व्हा मुक्त, 150 प्रकारच्या डोकेदुखींना मुळापासून संपवतात ‘ही’ 12 योगासने आणि टेकनिक्स..!)

हेही वाचा :  Covid 4th wave symptoms : करोनाच्या चौथ्या लाटेने कसली कंबर, पहिला ताप नंतर खोकला आणि मग दिसतात ‘ही’ 4 गंभीर लक्षणे!

हे सुद्धा आहे BA.2 चं सर्वात मोठं लक्षण

-ba-2-

ज्या देशांमध्ये चौथी लाट आली आहे तेथे स्नायूंमध्ये थकवा किंवा वेदना जाणवणे हे आणखी एक सामान्य लक्षण दिसत आहे. कोलकाता येथील तज्ञांनी निदर्शनास आणून दिले की हे तिसर्‍या लाटे दरम्यान देखील हे लक्षण सामान्य होते. तिसर्‍या लाटे दरम्यान, रूग्णांमध्ये खोकला आणि तापासोबतच अंगात कमजोरी येणं ही सर्वात सामान्य तक्रार दिसून आली होती. ही समस्या गॅस्ट्रो आणि आतड्यांमधील लक्षणांसोबत टिकून राहते. म्हणूनच आता आपल्याला फक्त खोकला आणि सर्दी याऐवजी वरील लक्षणांवर देखील लक्ष केंद्रित केले पाहिजे.

(वाचा :- पिझ्झा-बिअरच्या नादात 110 किलोवर पोहचलं होतं वजन, ‘ही’ खास ट्रिक वापरून घटवलं तब्बल 30 किलो वजन..!)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …

अजित पवारांना वाहतुकीच्या नियमाचा विसर, पुण्यात उलट दिशेने चालवली वाहने

Ajit Pawar Violated Traffic Rules : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात वाहतुकीचे नियम मोडल्याचे समोर आलं …