Honey for weight loss : आठवड्याभरात मेणासारखी वितळेल पोट, कंबर व मांड्यांवरची चरबी, मधात मिक्स करून खा ‘हे’ 6 पदार्थ!

वजन कमी करणे सोपे काम नाही. यासाठी जिममध्ये कठोर परिश्रम करावे लागतात आणि सकस आहार घ्यावा लागतो. जर तुमच्याकडे या दोन्ही गोष्टींसाठी वेळ नसेल तर तुम्ही मधाद्वारे संपूर्ण शरीराचे वजन कमी करू शकता आणि तेही कोणत्याही दुष्परिणामांशिवाय हे शक्य आहे. वजन कमी करण्यासोबतच मध खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे सुद्धा आहेत. मध त्याच्या चव, औषधी गुण, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांव्यतिरिक्त फिटनेस सुधारण्यासाठी देखील ओळखले जाते. असे मानले जाते की मध हा वजन कमी करण्याचा नैसर्गिक मार्ग आहे. मधामध्ये फ्रुक्टोज आढळते, जे फॅट बर्न करण्यासाठी उपयुक्त आहे.

ते लिव्हरला ग्लुकोज तयार करण्यासाठी इंधन म्हणून काम करते. हे ग्लुकोज मेंदूतील साखरेची पातळी राखून ठेवते आणि शरीरातील फॅट बर्निंग हार्मोन्स रिलीज करण्यास भाग पाडते. न्युट्रिशनिस्ट आणि डाएटिशियन शिखा अग्रवाल शर्मा यांच्या मते, मधामध्ये अर्थातच साखर असते पण रिफाइंड साखरेच्या तुलनेत मधामध्ये फायदेशीर जीवनसत्त्वे (vitamins) आणि खनिजे (minerals) देखील असतात. याउलट, रिफाइंड शुगरला कॅलरी मानले जाते. याचा अर्थ असा होतो की ती खाण्याचा कोणताही फायदा तर होतच नाही. तर त्याउलट मध हे विविध पोषक तत्वांचे भांडार आहे, जे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक चांगला पर्याय आहे. (फोटो साभार: istock by getty images)

हेही वाचा :  आहे त्या वयापेक्षा 10 ते 15 वर्षांनी दिसाल लहान व तरूण, डाएटिशियनने सांगितलेल्या 'या' टिप्स करा ताबडतोब फॉलो..!

वेटलॉससाठी मध कशी वापरावी?

बहुतेक लोक चहा किंवा कॉफीमध्ये साखर मिसळून पितात. यामुळे हळूहळू तुमच्या आरोग्याला गंभीर नुकसान होऊ शकते. वजन झपाट्याने कमी करायचे असेल तर साखरेऐवजी मधाचा वापर करावा. तुम्ही चहा किंवा इतर गोड पदार्थांमध्ये मध वापरू शकता. झोपण्यापूर्वी एक चमचा मध खाणे वजन कमी करण्याचा एक प्रभावी उपाय आहे. असे केल्याने तुमच्या झोपेच्या सुरुवातीच्या काही तासांमध्येच शरीरातील जास्तीत जास्त चरबी जळण्यास सुरूवात होते.

(वाचा :- Vaccination for kids : गुड न्यूज, मुलांचे करोना वॅक्सिनेशन झाले सुरू, वॅक्सिन देण्याआधी आणि दिल्यानंतर करा ‘ही’ 5 कामे, साइड इफेक्ट्सपासून होईल बचाव)

वजन घटवण्यासाठी मध व दालचिनी

दालचिनी हा असा मसाला आहे, जो जेवणाला स्वादिष्ट चव तर देतोच पण ते पौष्टिकही बनवतो. दालचिनी आणि मध खाणे वजन कमी करण्यासाठी एक चांगला मार्ग आहे. यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या ग्रीन टी च्या कपमध्ये अर्धा चमचा दालचिनी आणि एक चमचा मध मिसळू शकता. या मिश्रणाने तुमची चयापचय क्रिया मजबूत होते आणि तुम्हाला पूर्ण ऊर्जा मिळते.

(वाचा :- Health Mistakes : सावधान, तुमच्याच ‘या’ 7 वाईट सवयींमुळे व्हाल हार्ट अटॅकचे व गंभीर हृदयरोगांचे शिकार, ताबडतोब बदला!)

मध व लिंबू

वजन कमी करण्यासाठी मध व लिंबू हे मिश्रण सर्वोत्तम मानले जाते. तुम्ही रोज सकाळी अर्धा ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मध आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळून पिऊ शकता. हे शरीर डिटॉक्स करण्यास आणि शरीरातील सर्व अवयव सक्रिय ठेवण्यास मदत करेल. दिवसभर पोट कमी फुगलेले आणि अधिक उत्साही वाटेल. तुम्ही ते दिवसभरात कधीही घेऊ शकता पण सकाळी रिकाम्या पोटी घेणं कधीही उत्तम. मध चयापचय क्रिया वाढवण्याचे सुद्धा काम करते.

हेही वाचा :  Political Update: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला राहुल गांधींनी साधं फुलंही वाहिलं नाही? बावनकुळेंची टीका

(वाचा :- Lower Cholesterol Diet : वयाच्या 30 शीतच खायला सुरू करा ‘हे’ 5 पदार्थ, म्हातारपणापर्यंत शरीरात घुसणार नाही हार्ट अटॅकला जबाबदार कोलेस्ट्रॉल..!)

मध व लसूण

वजन कमी करण्यासाठी लसूण आणि मध यांचे मिश्रण आपल्या शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्याचा एक चांगला मार्ग आहे. सकाळी उठल्यावर एक चमचा मधासोबत कच्चा लसूण खाल्ल्यास डिटॉक्सिफिकेशन आणि पचनक्रिया सुधारते. हे मिश्रण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास, तणाव, उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास देखील मदत करते.

(वाचा :- Unusual Symptoms of Diabetes : सावधान, ‘ही’ 5 विचित्र लक्षणे दिसल्यास व्हा ताबडतोब सावध, असू शकते डायबिटीजची सुरूवात, दुर्लक्ष केल्यास होईल पश्चाताप!)

दूध आणि मध

जर तुम्हाला बारीक व्हायचे असेल तर दुधात साखरेऐवजी मध वापरा. लक्षात ठेवा की फक्त उकळलेल्या दुधात मध घाला. दुधात एक ते दोन चमचे मध मिसळून तुम्ही पिऊ शकता. यामुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होण्यास मदत होईल.

(वाचा :- आहे त्या वयापेक्षा 10 ते 15 वर्षांनी दिसाल लहान व तरूण, डाएटिशियनने सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा ताबडतोब फॉलो..!)

ब्राऊन ब्रेड आणि मध

जर तुम्हाला लवकर भूक लागत असेल तर तुम्ही ब्राउन ब्रेड आणि मध खाऊ शकता. यामुळे तुमचे पोटही भरले जाईल आणि कॅलरीजही कमी प्रमाणात शरीरात जातील. तुम्ही हे नाश्ता किंवा रात्रीच्या जेवणात खाऊ शकता.

हेही वाचा :  Dal Bhat Or Dal Chapati : डाळ-भात की भाजी-चपाती? डाएटिशियनकडून जाणून घ्या झटपट वजन घटवण्यासाठी कोणतं कॉम्बिनेशन आहे सर्वात बेस्ट?

(वाचा :- किडनीमध्ये चिकटलेले विषारी पदार्थ व घाण बाहेर काढून किडनी हेल्दी व मबजूत बनवतात ‘या’ 8 भाज्या..!)

ताक आणि मध

काही लोक पोटाची चरबी कमी करण्यासाठी ताक पितात. ताकात मध घालून प्यायल्यास तुमची चयापचय क्रिया सुधारते. एक ग्लास ताकामध्ये तुम्ही 2 चमचे मध टाकू शकता. यामुळे पोटाची चरबी कमी होते.

(वाचा :- Dal Bhat Or Dal Chapati : डाळ-भात की भाजी-चपाती? डाएटिशियनकडून जाणून घ्या झटपट वजन घटवण्यासाठी कोणतं कॉम्बिनेशन आहे सर्वात बेस्ट?)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. महाराष्ट्र टाइम्स कोणताही दावा करत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा …