आहे त्या वयापेक्षा 10 ते 15 वर्षांनी दिसाल लहान व तरूण, डाएटिशियनने सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा ताबडतोब फॉलो..!

हे सुंदर जीवन जगण्यासाठी आपल्याला हृदयाची गरज असते – प्रेम, हास्य आणि आनंदाने भरलेले दीर्घ आणि निरोगी आयुष्य. खरं तर सर्वांनाच वाटतं आपण दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगावं पण सत्य तर हे आहे की तुम्ही आणि आम्ही किती दिवस जगणार आहोत हे कोणालाच माहीत नाही. साहजिकच, आपण हे सत्य नाकारू शकत नाही, परंतु आपल्या जीवनशैलीत काही साधेसोपे बदल करून आपण आयुष्य नक्कीच वाढवू शकतो. न्यूट्रिशनिस्ट डॉ. एमी शाह यांनी तिच्या इंस्टाग्राम हँडलवर अशाच काही टिप्स शेअर केल्या आहेत, ज्या तुम्हाला दीर्घायुष्य देतील. प्रत्येकजण या टिप्स आपल्या दिनक्रमात समाविष्ट करू शकतो पण 20 ते 30 वर्षांच्या लोकांसाठी या टिप्स खूप फायदेशीर ठरतील. चला तर मग येथे जाणून घेऊया की तुम्ही दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी काय करू शकता.

डाएटमध्ये रियल फूड्सचा समावेश करावा

न्युट्रिशनिस्ट आपल्या आहारात अधिक पौष्टिक आणि वास्तविक अन्नपदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला देतात. त्यांनी दररोज आपल्या आहारात शेंगा, संपूर्ण तृणधान्य आणि नट्स अशा तीन प्रकारच्या पदार्थांचा समावेश करण्यास सांगितले. हे सर्व पदार्थ भरपूर प्रमाणात पोषक असतात आणि तुमच्या अंतर्गत अवयवांना योग्य प्रकारे कार्य करण्यास मदत करतात. एवढेच नाही तर ते सर्व जुनाट आजार कमी करू शकतात आणि यांच्या सेवनाने तुमचे आयुष्यही वाढू शकते.

हेही वाचा :  सकाळी रिकाम्या पोटी हे फळ खाल्यास आतड्यांमधील घाण, नसांमध्ये चिकटलेले कोलेस्ट्रॉल, म्हातारपण व कॅन्सरचा धोका होईल दूर!

(वाचा :- किडनीमध्ये चिकटलेले विषारी पदार्थ व घाण बाहेर काढून किडनी हेल्दी व मबजूत बनवतात ‘या’ 8 भाज्या..!)

रात्रभर 13 तासांपेक्षा जास्त उपवास

-13-

13 तास किंवा त्याहून अधिक काळ रात्रभर उपवास करण्याचा प्रयत्न करा असे डॉ. सांगतात. खरं तर रात्रभर उपवास केल्याने आपल्याला पचनापेक्षा उपचार प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळते. हे केवळ अवयवांना योग्यरित्या कार्य करण्यासच मदत करत नाही तर जुनाट आजारांचा धोका कमी करण्यात देखील प्रभावी आहे.

(वाचा :- Dal Bhat Or Dal Chapati : डाळ-भात की भाजी-चपाती? डाएटिशियनकडून जाणून घ्या झटपट वजन घटवण्यासाठी कोणतं कॉम्बिनेशन आहे सर्वात बेस्ट?)

सूर्यप्रकाशाच्या संपर्कात राहा

सूर्यप्रकाशात राहिल्याने आपले आयुष्य वाढू शकते. सूर्यप्रकाश हा केवळ व्हिटॅमिन डी चा उत्कृष्ट स्त्रोत नाही तर तणाव कमी करून मूड सुधारण्यास देखील मदत करतो. या सर्व कारणांसाठी काही काळ दररोज उन्हात घालवणे आवश्यक आहे. व्हिटॅमिन डी ची कमतरता लोकांमध्ये सामान्य आहे. शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फेटचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी आणि हाडांचे आरोग्य राखण्यासाठी हे एक आवश्यक पोषक तत्व आहे. अर्धा तास उन्हात बसल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.

(वाचा :- Summer foods for Cholesterol : सावधान, वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे वाढतो हार्ट स्ट्रोक व हार्ट अटॅकचा धोका, आताच खायला घ्या ‘हे’ 6 पदार्थ!)

हेही वाचा :  प्रेम म्हणजे प्रेम असतं! 64 वर्षाच्या वृद्धाच्या प्रेमात पडली 24 वर्षीय तरूणी, वाचा Love Story

रेड मीट कमीत कमी खा

जर तुम्हाला निरोगी आणि दीर्घायुष्य जगायचे असेल तर लाल मांसाचे सेवन फार कमी करा. डॉ. एमी या शिफारस करतात की लाल आणि प्रक्रिया केलेले म्हणजेच प्रोसेस्ड मांस खाणे आठवड्यातून पाच पेक्षा कमी सर्व्हिंगपर्यंत मर्यादित ठेवा. आम्ही तुम्हाला सांगू की रेड मीटमध्ये कोलेस्ट्रॉल आणि अनेहल्दी फॅट्स असतात. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो. दुसरीकडे, प्रक्रिया केलेले मांस खाल्ल्याने आतडे आणि पोटाच्या कर्करोगाचा धोका वाढण्याची शक्यता असते.

(वाचा :- हृतिक रोशनच्या 67 वर्षांच्या आईला पाहिलंत का? फिटनेस व फिगर बघून व्हाल हैराण, यासाठी फक्त रोज इतकी पावलं चालते..!)

रोज 10,000 स्टेप्स चाला

-10000-

निरोगी खाण्याइतकेच शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणे देखील महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला फिट राहण्यासाठी जिमला जाणे आवडत नसेल, तर तुम्ही दररोज 10,000 पावले चालून स्वतःला तंदुरुस्त आणि अॅक्टिव्ह ठेवू शकता.

(वाचा :- बापरे! एका विचित्र आजाराने पिडीत रूग्ण तब्बल 2 महिने जगत होता फक्त द्रव पदार्थांवर, कारण जीभेवर उगवत होते ‘काळेभोर केस’!)

तणावाला करा बाय-बाय

तणावाशी संबंधित घटना तुमचे आरोग्य बिघडवू शकतात. तणाव कमी करण्यासाठी आणि मन शांत करण्यासाठी एका दिवसात काही अॅक्टिव्हिटीज करण्याची प्लानिंग करा. तुम्हाला हवे असल्यास वाचन, ध्यानधारणा किंवा निसर्गाशी संबंधित कोणतेही काम निवडा आणि ते तुमच्या दिनक्रमात समाविष्ट करा. यामुळे खूप लवकर तणाव दूर होण्यास मदत होईल. जर तुम्हाला खरोखर दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगायचे असेल तर येथे सांगितलेले सर्व उपाय खूप प्रभावी आहेत. यापैकी कोणतेही उपाय तुम्ही नियमितपणे करू शकता.

हेही वाचा :  Potatoes Quality check : सावधान, कधीच खरेदी करू नका या रंगाचे बटाटे, असू शकतात विषारी, एक्सपर्ट्सनी सांगितली महत्त्वाची माहिती..!

(वाचा :- World Kidney Day 2022 : ‘हे’ 5 पदार्थ खाल्ल्यास किडनी आयुष्यभर राहिल हेल्दी आणि पिवळ्या रंगाच्या व दुर्गंध येणा-या लघवीपासून मिळेल मुक्ती!)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Sharad Pawar: नरेंद्र मोदींना पुन्हा संधी देणं धोकादायक…; सांगोल्यातील सभेत शरद पवारांची टीका

Sharad Pawar: शुक्रवारी लोकसभेच्या निवडणूकीचा दुसरा टप्पा पार पडला. तर दुसरीकडे उर्वरित टप्प्यांसाठी प्रत्येक पक्षाकडून …

Maharashtra Weather: राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा; पाहा मुंबईत कसं असेल हवामान?

Maharashtra Weather : सध्या देशभरात नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतोय. याशिवाय राज्यात उन्हाचा चटका …