प्रेम म्हणजे प्रेम असतं! 64 वर्षाच्या वृद्धाच्या प्रेमात पडली 24 वर्षीय तरूणी, वाचा Love Story

Viral Story : प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं अस म्हणतात, मात्र प्रत्येकवेळी सेम असेल असे सांगता येत नाही. कारण अशीच एक सेम नसणारी स्टोरी समोर आली आहे. यामध्ये एका 64 वर्ष वृद्धाच्या प्रेमात एक 24 वर्षीय तरूणी पडल्याची घटना घडलीय. ही घटना सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे. ही स्टोरी वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

डेटिंग वेबसाईटवर भेट 

24 वर्षीय सेमी अतादजा या तरूणीचे 64 वर्षीय क्लॉडिओ यांच्याशी डेटिंग वेबसाईटवर (Dating Site) भेट झाली होती. या भेटीनंतर जवळपास 6 वर्ष ते एकत्र राहिले होते. यानंतर आता त्यांनी लग्न केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर त्याची लव्हस्टोरी चर्चेत आली होती. 

वृद्धाच्या प्रेमात का पडली?

सेमी अतादजा ही फक्त 24 वर्षाची आहे. तर तिचा पार्टनर क्लॉडिओ 64 वर्षाचा आहे. या दोघांच्या वयात साधारण 40 वर्षांचा फरक आहे. या नात्याबाबत ती म्हणाली की, ती एका श्रीमंत (Rich man) माणसाच्या शोधात होती जो तिच्या सर्व गरजा पूर्ण करू शकेल. आणि क्लॉडिओच्या रूपात तो तिला आता मिळाला आहे आणि ती खुप खुश आहे.  

हेही वाचा :  मोठी बातमी: तुमच्याकडे 2000 रुपयांची नोट आहे का? RBI ची ही माहिती अजिबात चुकवू नका

‘ती’ वेट्रेस होती…

सेमी अतादजा एकेकाळी वेट्रेस होती, एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये वेट्रेस (Waitress) म्हणून ती काम करत होती. पण क्लॉडिओला भेटल्यानंतर ती आता लक्झरी लाइफ (luxurious life) जगत आहे. तिचा जोडीदार क्लॉडिओ खूप श्रीमंत आहे. त्यांच्याकडे करोडोंची संपत्ती आहे. तो आता अताडजासोबत राहतो. 

पार्टनर दोन मुलांचा बाप

क्लॉडिओ हा दोन मुलांचा बाप आहे. त्याच्या मुलांनाही मुले आहेत. संपूर्ण कुटुंब त्याच्याशी जोडलेले आहे. या सर्वांनीही मला स्वीकारले आहे. क्लॉडिओचे त्याच्या माजी पत्नीशीही चांगले संबंध असल्याचे अताडजा म्हणाली आहे. 

क्लॉडिओने कधीच पैसे खर्च करण्यावर मर्यादा आणली नाही. तसेच मी कधीही उधळपट्टी केली नाही. अमेरिकेशिवाय चीन, इटली, जर्मनी आदी देशांना भेटी दिल्या आहेत. माझे जीवन एक ‘परीकथा’ आहे. मी खूप भाग्यवान आहे की मला क्लॉडिओसारखा पार्टनर मिळाला आहे, असे अताडजा म्हणाली आहे. 

दरम्यान या हटके लव्हस्टोरीची (Love story) सोशल मीडियावर (Social media) चर्चा रंगली आहे. तसेच या जोडीला सोशल मीडियावर ट्रोलही केले जात आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …