डोकं कापल्यानंतरही तब्बल 9 दिवस जिवंत राहू शकतं Cockroach; पण कसं? जाणून घ्या

Cockroach Live Without Its Head : झुरळ घरात असणं कोणालाच आवडत नाही…जरी झुरळ (Cockroach) दिसलं तरी अनेकांना त्याची किळस येते. मात्र याच झुरळाबद्गलच्या काही आश्चर्यकारक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. झुरळाचं डोकं कापल्यानंतर देखील ते 9 दिवस जिवंत राहतं हे तुम्हाला माहीत आहे का? जर त्याचं डोकं कापलं गेलं असेल तरीही त्यांचं शरीर 9 दिवस जगतं (आठवड्यानंतर झुरळांचा मृत्यू) आणि सोबतच त्याचे पाय फिरत राहतात. 

तुम्हाला प्रश्न पडला असेल की, डोकं कापल्यानंतर कोणताही सजीव जिवंत कसा राहू शकतो? मुळात हे कोणत्याही चमत्कारामुळे किंवा जादूमुळे जगत नाहीत. यामागे कारण आहे, ते म्हणजे, झुरळांच्या शरीरामध्ये अशी खासियत असते. जाणून घेऊया झुरळाबाबत तुम्हाला माहिती नसलेले काही फॅक्ट्स

झुरळाला 18 पाय असतात. ज्याप्रमाणे माणसाच्या डोक्यावर केस वाढतात, त्याचप्रमाणे झुरळाचा पाय तुटला तर ते पुन्हा येतात. जगातील सर्वात मोठं झुरळ दक्षिण अमेरिकेत 6 इंच आकाराचं आढळलंय. सामान्यपणे झुरळं दीड ते दोन इंच इतकी मोठी असतात.

झुरळे सर्व काही खाऊ शकतात. ते साबण, पेंट, पुस्तकं, लेदर, गोंद, ग्रीस. इतकंच नाही तर माणसांचे केस देखील झुरळं खाऊ शकतात. लहान मुलांमध्ये ऍलर्जी आणि दम्यासाठी देखील झुरळं जबाबदार असू शकतात. 

हेही वाचा :  आता पुरुषही रोखू शकतात गर्भधारणा, ICMR ला मोठं यश; महिलांसाठी क्रांतिकारी बदल

झुरळांच्या माध्यमातून 33 विविध प्रकारचे बॅक्टेरिया पसरवतात. झुरळं त्यांच्या नाकातून श्वास घेत नाहीत. त्यांच्या शरीरामध्ये अनेक छोटी छिद्रं असतात. ज्या माध्यमातून झुरळं श्वास घेतात. त्यामुळे डोकं कापल्यानंतरही ते जिवंत राहू शकतात.

झुरळं 9 दिवसांनंतर जगू शकत नाहीत कारण ते त्यांच्या डोक्याच्या माध्यमातून खातात. खाण्याद्वारे ते आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणात प्रथिनं साठवून ठेवतो. यामुळे जेव्हा त्यांचं डोकं कापलं जातं तेव्हा तो 9 दिवस जिवंत राहतो, परंतु त्यानंतर भूक आणि तहानने त्याचा मृत्यू होतो.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सर्वात जास्त गॅस सोडण्याऱ्या किटकांपैकी एक आहे. ते दर 15-15 मिनिटांनी गॅस सोडत राहतो. गरज पडल्यास झुरळ 40 मिनिटं श्वास रोखू शकतात. या कारणास्तव, झुरळं 30 मिनिटं पाण्यात टिकून राहतात. झुरळाचं सरासरी आयुष्य एक वर्ष असतं. झुरळ 5 मीटर प्रति सेकंद या वेगाने धावू शकतात.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …