NEET UG Counseling Result 2021: ‘असा’ पाहा मॉप अप राऊंडचा निकाल

NEET UG Counseling Result 2021: NEET UG समुपदेशन मॉप-अप फेरीचा निकाल बुधवारी जाहीर केला जाऊ शकतो. वैद्यकीय समुपदेशन समिती (MCC) बुधवार, 23 मार्च रोजी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा-अंडर ग्रॅज्युएट (NEET UG) 2021 समुपदेशन मॉप-अप फेरीचा निकाल जाहीर करेल. सहभागी उमेदवार मॉप-अप फेरीचा निकाल तपासण्यासाठी https://mcc.nic.in या एमसीसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. NEET-UG मॉप-अप राउंड काऊन्सेलिंगसाठी पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया २० मार्चपासून सुरू झाली.

मॉप-अप फेरीचा निकाल कसा तपासायचा?

१. सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट https://mcc.nic.in ला भेट द्या

२. मुख्यपृष्ठावरील ‘मॉप-अप राउंड रिझल्ट’ या लिंकवर क्लिक करा

३. लॉगिन करण्यासाठी तुमचा NEET UG रोल नंबर आणि पासवर्ड एंटर करा

४. NEET-UG 2021 मॉप-अप फेरीचा निकाल स्क्रीनवर दिसेल

५. निकाल डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढून ठेवा.

वैद्यकीय परिषदेच्या समितीने उमेदवारांना NEET UG समुपदेशनाबद्दल अपडेट्स मिळवण्यासाठी ‘संदेश अॅप’ डाउनलोड करण्यास सांगितले आहे.

वैद्यकीय समुपदेशन समिती ऑल इंडिया कोटा (AIQ) जागांसाठी दोन ऐवजी चार फेऱ्यांमध्ये समुपदेशन करेल. पहिल्या दोन फेऱ्या- AIQ राउंड 1, AIQ राउंड 2, AIQ मॉप-अप राऊंड आणि AIQ स्ट्रे व्हॅकन्सी राउंड आयोजित केले जातील.

हेही वाचा :  NEET 2022: 'अशी' करा नीट २०२२ परीक्षेची तयारी

GATE २०२२ चे स्कोअरकार्ड जाहीर, थेट लिंकवरुन ‘येथे’ तपासा

UPSC कडून कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेचा निकाल जाहीर
NEET MDS 2022: नीट एमडीएस अर्जप्रक्रियेला सुरुवात; २ मे रोजी परीक्षा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …