नीट यूजी राउंड २ च्या काऊन्सेलिंगची नोंदणी आजपासून म्हणजेच १६ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. शुल्क भरण्याची आणि नोंदणीची सुविधा २१ फेब्रुवारी (दुपारी १२ वाजेपर्यंत) सुरू राहणार आहे. नीट यूजी फेरी २ काऊन्सेलिंगसाठी चॉईस फायलिंग (Choice Filling) १७ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केले जाईल. तसेच फेरी २ नीट यूजी काऊन्सेलिंगचा निकाल २६ फेब्रुवारी रोजी जाहीर केला जाणार आहे.
NEET UG Counselling: मेरिट लिस्ट तपासा
गुणवत्ता यादी तपासण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर जा.
येथे होमपेजवर एक टॅब दिसेल ज्यावर UG Counseling Tab असे लिहिलेले असेल, त्यावर क्लिक करा.
हे केल्यानंतर एक नवीन विंडो खुली होईल. त्यावर NOTICE AND MERIT LIST OF DELHI STATE QUOTA link लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा.
एक नवीन पेज उघडेल. ज्यावर नीट दिल्ली गुणवत्ता यादी दिसेल.
यादी डाउनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा.
नीट गुणवत्ता यादीच्या पीडीएफमध्ये उमेदवारांचा रोल नंबर, आंतरराज्य रँक, ग्रेड इत्यादी माहिती मिळेल. नीट यूजी काऊन्सेलिंगची मेरिट लिस्ट बातमीखाली देण्यात आली आहे.
महत्वाची बाब
एखादा उमेदवार प्राधान्ये लॉक करण्यास विसरल्यास, भरलेले पर्याय आपोआप लॉक होतील. एकदा लॉक केल्यानंतर प्राधान्ये संपादित किंवा सुधारित केली जाऊ शकत नाहीत. म्हणून समिक्षा केल्यानंतर पर्याय लॉक करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. अधिक माहिती अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहे.
नीट यूजी मेरीट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा