‘परी म्हणू की सुंदरा’, साडीत खुलले मानसी नाईकचे सौंदर्य, गुढीपाडव्याला करा असा लुक

मानसी नाईक नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो पोस्ट करत असते. आता तिने ऑफव्हाईट रंग आणि लाल बॉर्डर असणाऱ्या साडीतील लुक शेअर करून पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. परी म्हणू की सुंदरा असा तिचा लुक असून गुढीपाडव्यासाठी तुम्ही वेगळा लुक करू इच्छित असाल तर या स्टाईलवरून तुम्ही प्रेरणा घेऊ शकता.

मानसीच्या अदांवर लाखो फिदा आहेत. विशेषतः तिचे साडी लुक हे चाहत्यांच्या काळजावर वार करणारे असतात. घटस्फोटाच्या चर्चेनंतर पुन्हा एकदा मानसी जास्त प्रमाणात सोशल मीडियावर दिसून येत आहे. ऑफव्हाईट साडीतील हा लुक लक्षवेधी असून जाणून घेऊया स्टाईल (फोटो सौजन्य @manasinaik0302 Instagram)

लाल बॉर्डरची ऑफव्हाईट साडी

लाल बॉर्डरची ऑफव्हाईट साडी

गुढीपाडव्याला नेसण्यासाठीचा साडीचा विचार करत असाल तर मानसी नाईकच्या या ऑफव्हाईट लाल बॉर्डरच्या साडीवरून तुम्ही नक्कीच फॅशन स्टाईल करू शकता. सणासुदीला अशा लाल बॉर्डरची साडी तुम्हाला अधिक आकर्षक दिसेल.

मानसीचा लाल चुडा

मानसीचा लाल चुडा

मानसीने या साडीसह लाल बॉर्डरला मॅच करणारा लाल चुडा घातला आहे. हातात भरलेला हा चुडा साडी आणि तिच्या सौंदर्यात अधिक भर घालत आहे. तिच्या या लाल चुड्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा :  Weather Updates: विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका; मुंबईत कशी असणार हवामानाची स्थिती?

(वाचा – Dalljiet Kaur Wedding Look: लाल दुपट्टा, व्हाईट लेहंगा, निखिलसाठी सजली नवरी दलजित कौर, आनंद लपता लपेना)

मराठमोळा साज

मराठमोळा साज

नाकात मोठी ठसठशीत लाल खड्याची आणि मोत्यांची नथ घालून तिने हा लुक पूर्ण केलाय. मराठमोळा साज दाखविण्यासाठी कपाळी लालभडक चंद्रकोर अधिक सौंदर्यात भर घालतेय. गुढीपाडव्यासाठी हा लुक परफेक्ट आहे. यासह डार्क मेकअप आणि लाल लिपस्टिक लावत हा लुक अधिक उठावदार केला आहे.

(वाचा – ‘हमको आज ही कल है इंतजार…’ मॉडर्न लुगडं-चोळीमध्ये समृद्धीच्या सौंदर्याने चाहत्यांचा कलिजा खल्लास)

आंबाड्यात गजरा

आंबाड्यात गजरा

यासह तिने केसात गजरा माळला आहे. आंबाडा घालून केसात गजरा हा अगदी टिपिकल महाराष्ट्रीयन लुक असला तरीही गुढीपाडव्यासाठी नक्कीच उठावदार आणि लक्षवेधी ठरेल. त्यामुळे अशी साडी निवडणार असाल तर या लुकवरून तुम्ही प्रेरणा घेऊ शकता.

(वाचा – ‘जरा जरा बेहकता हैं…’ दियाकडे पाहून चाहत्यांच्या मनात पुन्हा गाण्याची रूंजी, सौंदर्याची तीच निरागसता )

मोत्याची माळ

मोत्याची माळ

यासह तिने मोत्याची माळ घालत साडीवरील दागिने परिधान केले आहेत. अधिक दागिने न घालता दोन सरी मोत्यांची जाड माळ घालून साडीला अधिक शोभा आणली आहे. त्यासह तिने मोत्यांचे लहानसे टॉप घातले आहेत.

हेही वाचा :  Gudi Padwa 2023: नऊवारी साडी नेसा सोप्या ट्रिक्सने झटपट व्हा तयार!

गुढीपाडव्यासाठी वेगळ्या लुकच्या शोधात असाल तर मानसीच्या या साडी लुकवरून तुम्हीही स्टाईल कॅरी करू शकता.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींच्या मनमानीविरुद्ध..’, ‘सत्तेतले नक्षलवादी’ म्हणत ठाकरे गटाची शिंदे-फडणवीस, मोदी-शाहांवर टीका

Urban Naxal Issue: शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कठोर शब्दांमध्ये टीकास्र सोडलं …

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं

Maharashtra Weather News : मान्सूननं (Monsoon) देशात हजेरी लावल्यानंतर दक्षिणेकडील राज्य आणि महाराष्ट्राचा काही भाग …