‘पठाण’च्या यशादरम्यान शाहरुख खान अडचणीत; गौरी खानवर गुन्हा दाखल

Gauri Khan FIR : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची (Shah Rukh Khan) पत्नी गौरी खानवर (Gauri Khan) गुन्हा दाखल झाला आहे. लखनौच्या (Lucknow) सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात 409 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत राहणाऱ्या किरीट जयवंत शहा यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. 

नेमकं प्रकरण काय? 

गौरी खान (Gauri Khan) तुलसियानी कन्स्ट्रक्शन अॅन्ड डेव्हलपर्स लिमिटेड (Tulsiani Constructions And Developers Pvt. Ltd) या कंपनीची ​​ब्रँड अॅंबेसेडर (Brand Ambassador) आहे. मुंबईत राहणाऱ्या किरीट शहा या व्यक्तीने तुलसियानी कन्स्ट्रक्शन अंतर्गत लखनौमध्ये 86 लाखांचा एक फ्लॅट विकत घेतला होता. पण 86 लाख रुपये घेतल्यानंतर तो फ्लॅट दुसऱ्याच व्यक्तीला दिल्याचा आरोप किरीट यांनी केला आहे. 

गौरी खान तुलसियानी कन्स्ट्रक्शन अॅन्ड डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीची ब्रँड अॅंबेसेडर असून तिच्या जाहिरातीने प्रभावित होऊन फ्लॅट घेतला असल्याचा दावा किरीट यांनी केला आहे. फसवणुकीनंतर किरीट यांनी तुलसियानी कन्स्ट्रक्शन्सचे सीएमडी अनिल कुमार तुलसियानी, संचालक महेश तुलसियानी आणि  ब्रँड अॅंबेसेडर गौरी खानवर गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा :  'महाराष्ट्र शाहीर' सिनेमातील साने गुरुजींची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

संबंधित बातम्या

Happy Birthday Gauri Khan : गौरीसोबत लग्न करण्यासाठी रोमान्सचा बादशहाने तीनदा केलं लग्न; इंटिरियर डिझायनर ते निर्माती असलेली गौरी कोट्यवधींची मालकीण

 

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …