Shah Rukh Khan : किंग खान ‘ग्लोबल आयकॉन’ अवॉर्डनं सन्मानित!

Shah Rukh Khan Award : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी ‘पठाण’ सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा पुढल्या वर्षी जानेवारीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच किंग खानला दुबईत ‘ग्लोबल आयकॉन ऑफ सिनेमा अँड कल्चरल नॅरेटिव्ह अवॉर्ड’ने (Global Icon Award) सन्मानित करण्यात आले आहे. 

शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी दुबईत त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी शाहरुखला ग्लोबल आयकॉनने सन्मानित करण्यात आले आहे. सोशल मीडियावर सध्या शाहरुखचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 

Reels

हेही वाचा :  'या' सेलिब्रिटींनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

तीन दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेता म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. किंग खानचे चाहते फक्त भारतातच नाहीत तर जगभरात आहेत. शाहरुखने त्याच्या सिनेसृष्टीतील प्रवासात एकापेक्षा एक सिनेमांत काम केलं आहे. त्याचे अनेक सिनेमे सुपरहिट झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खान बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी आहे. किंग खान एका दिवसाला 1.4 कोटी कमावतो.

शाहरुख खानचे ब्लॉक बस्टर सिनेमे!

शाहरुख खानने अनेक ब्लॉक बस्टर सिनेमांत काम केलं आहे. ‘डर’ (Dar) या सिनेमातील शाहरुखची नकारात्मक भूमिका आजही चाहत्यांच्या पसंतीस उतरते. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (DDLJ), ‘दिल तो पागल है’ (Dil to Pagal hai), ‘स्वदेश’ (Swades), वीर जारा (Veer Zara), ‘जब तक है जान’ (Jab Tak Hai Jaan), माइ नेम इज खान (My Name is Khan) अशा अनेक सिनेमांच्या माध्यमातून शाहरुखने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. 

शाहरुख खानचे आगामी सिनेमे

शाहरुख खानचा आगामी ‘पठाण’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तो दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. ‘जवान’ सिनेमातदेखील शाहरुख दिसणार आहे. तसेच तापसी पन्नू आणि राजकुमार हिरानीच्या आगामी ‘डंकी’ सिनेमात शाहरुखची झलक पाहायला मिळणार आहे. 

हेही वाचा :  Mohandas Sukhtankar : मोहनदास सुखटणकर यांनी गाजवली मराठी रंगभूमी

संबंधित बातम्या

Shah Rukh Khan Birthday : किंग खानच्या फोटोने पुन्हा उजळला बुर्ज खलिफा; ‘पठाण’ला विशेष वाढदिवसाच्या शुभेच्छा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …