Debina Bonarjee: देबिनाला असा कोणता झाला आजार? दोन्ही लहान मुलींपासून राहावं लागतंय दूर

देबिना बॅनर्जी नेहमीच चर्चेत असते. गुरमीत आणि देबिना सध्या आपल्या दोन्ही मुलींचा सांभाळ करत आहेत. नुकतेच संपूर्ण कुटुंब श्रीलंका फिरून आले. मात्र श्रीलंकेतून परत आल्यावर देबिनाला इन्फ्लुएन्झा बी व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. याच कारणामुळे तिला तिच्या दोन्ही लहान मुलींपासून दूर राहावे लागत आहे.

लियाना आणि दिविशा या दोन्ही मुली लहान असून या दोघींनाही व्हायरसची लागण झालेली नाही. केवळ देबिनाला हा आजार झाला असून सध्या तिच्यावर उपचार चालू आहेत. श्रीलंकेहून परत आल्यावर देबिनाची तब्बेत बिघडली आणि सध्या देबिनाच्या तब्बेतीत सुधारणा होत असून ती काळजी घेत आहे. ताप, सर्दी आणि खोकला ही लक्षणे असून ती आपल्या बाळांपासून लांब राहात आहे. याबाबत तिने आपल्या इन्स्टा पोस्टमधूनही माहिती दिली आहे. दरम्यान फिजिशियन डॉ. अंजली फाटक यांच्याकडून आम्ही इन्फ्लुएन्झा बी व्हायरसची माहिती घेतली आहे. (फोटो सौजन्य – iStock, @debinabon Instagram)

हेही वाचा :  पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर ! गजा मारणे, बाबा बोडके, घायवळ यांच्यासह कुख्यात गुंडांची परेड

​देबिनाला झालेला Influenza B Virus काय आहे?​

-influenza-b-virus-

आपल्या श्वसनतंत्रावर अत्यंत संक्रमित होणारा असा हा इन्फ्लुएन्झा बी व्हायरस आहे. ताप ए, बी आणि सी तीन प्रकारचा असतो. यातील ए आणि बी हा एन्फ्लुएन्झा व्हायरसचे कारण ठरते. सी टाईपमध्ये लक्षणे कमी प्रमाणात दिसून येतात. नाक, डोळे आणि तोंडाद्वारे इन्फ्लुएन्झा बी व्हायरचा प्रवेश शरीरात होतो. तसंच हा संसर्गजन्य आजार असून संपर्कात आलेल्या दुसऱ्या व्यक्तीलाही त्वरीत होतो.

​काय आहे इन्फ्लुएन्झा बी ची लक्षणे ​

​काय आहे इन्फ्लुएन्झा बी ची लक्षणे ​
  • शरीरात अचानक थकवा येतो आणि अस्वस्थता वाढते
  • घशात सतत कफ जमा होतो आणि गिळताना त्रास होतो
  • कोणतेही काम करताना चक्कर येते
  • थंडी वाजून ताप येतो, १०० ते १०३ पर्यंत ताप वाढतो. आजार वाढतो तसा ताप १०६ पर्यंतही जाऊ शकतो
  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • त्वचा निळी पडू लागणे
  • डोकं ठणकणे आणि सतत दुखणे

(वाचा – डायबिटीसच्या रूग्णांनी व्हाईट ब्रेड खाणे अयोग्य? काय होते नुकसान घ्या जाणून )

​इन्फ्लुएन्झा बी वरील उपचार​

​इन्फ्लुएन्झा बी वरील उपचार​
  • जास्तीत जास्त पाणी आणि तरल पदार्थांचे सेवन करणे. गरम सूप्स अथवा कोमट लिंबू पाण्याचे सेवन करणे
  • पाणी केवळ उकळूनच प्यावे. जिऱ्याचे उकळलेले पाणी प्यायल्या उत्तम
  • थंड आणि शिळे अन्न अजिबात खाऊ नये. प्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ अधिक खावे
  • जितका आराम शरीराला देता येईल तितका द्या
  • दिवसातून दोन ते ३ वेळा तरी वाफ घ्यावी. यामुळे सर्दी आणि खोकला लवकर निघून जाण्यास मदत मिळते
हेही वाचा :  वसईत CBI ची धाड; नोकरीच्या बहाण्याने भारतीय नागरिकांना रशिया युक्रेन युद्धात पाठवले

(वाचा -रक्तदान करण्याचे फायदे, आरोग्याच्या दृष्टीने ब्लड डोनेशन ठरते फायदेशीर कसे ते जाणून घ्या)

​दुर्लक्ष करू नका​

​दुर्लक्ष करू नका​
  • ६५ वयाच्या वरच्या व्यक्तींनी अजिबात याकडे दुर्लक्ष करू नये
  • गर्भवती महिलांना या फ्लू चा अधिक धोका संभवतो. त्यामुळे वेळीच लक्ष द्या
  • निमोनिआ, कानदुखी आणि सायनसचा धोका या आजारामुळे अधिक वाढतो
  • १०२ पेक्षा अधिक ताप असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये

(वाचा – या कडू पदार्थापासून तयार केलेला हर्बल चहा, नसांमधून कोलेस्ट्रॉल करेल गायब)

​या गोष्टी महत्त्वाच्या​

​या गोष्टी महत्त्वाच्या​
  • लसीकरण वेळीच करून घ्या
  • स्वच्छतेकडे लक्ष द्या. रोज नियमाने हात धुणे आणि मगच खाणे योग्य आहे. तसंच ज्याठिकाणी पाणी मिळण्याची शक्यता नाही वाईप्स नेहमी सोबत ठेवा
  • चांगला आहार, आवश्यक पोषण, विटामिन्स खावेतनियमित व्यायमाची आवश्यकता आहे

टीप – ही माहिती सामान्य ज्ञान म्हणून देण्यात आली आहे. आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषधोपचार करू नयेत. वेळीच डॉक्टरांकडे जावे.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या …

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘माझ्याबद्दल…’

Raj Thackeray Morning Wake Up Time: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या त्यांनी लोकसभा …