शाहरुखला पाहताच हॉलिवूड अभिनेत्रीनं दिली अशी रिअॅक्शन

Shah Rukh Khan: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणारा अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) चाहता वर्ग मोठा आहे. फक्त भारतातच नाही तर परदेशातही शाहरुखचे चाहते आहेत. शाहरुखच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. शाहरुखनं सौदी अरेबिया येथील रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. या इव्हेंटमध्ये शाहरुखला सन्मानित करण्यात आलं. नुकताच या कार्यक्रमातील शाहरुखचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली असून व्हिडीओमधील एका हॉलिवूड अभिनेत्रीच्या रिअॅक्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

शाहरुखला पाहताच शेरोन स्टोननं दिली अशी रिअॅक्शन

रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या कार्यक्रमात हॉलिवूड अभिनेत्री शेरोन स्टोन ही देखील उपस्थित होती. शाहरुख खान जेव्हा सन्मान स्विकारण्यासाठी उभा राहिला तेव्हा शेरोन त्याला पाहून आनंदी झाली. शाहरुखला पाहिल्यानंतर शेरोननं दिलेल्या रिअॅक्शनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओला सध्या नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. ‘शाहरुख खानची क्रेझ’, असं कॅप्शन व्हायरल व्हिडीओला देण्यात आली आहे. 

नेटकऱ्यांच्या कमेंट्स: 

News Reels

हेही वाचा :  Sohail Khan Birthday : अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक सोहेल खान!

‘तो जिथे जातो तिथे त्याला प्रेम आणि आदर मिळतो. खरोखर हा सुपरस्टार आहे. ‘ अशी कमेंट या व्हायरल व्हिडीओला एका नेटकऱ्यानं केली आहे. तर दुसऱ्या युझरनं, ‘ चांगला व्यक्ती आणि चांगला अभिनेता आहे’ अशी कमेंट एका युझरनं केली. 


शाहरुख खान हा अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्याचा  जवान हा चित्रपट  2 जून   2023 रोजी  प्रदर्शित होणार आहे. तर त्याचा पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी  आणि डंकी हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Shah Rukh Khan: ‘चिकन 65 ची रेसिपी शिकायची आहे’; शाहरुखच्या ट्वीटनं वेधलं नेटकऱ्याचं लक्ष!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …