शाहरुख खान वैष्णोदेवीच्या चरणी नतमस्तक; मंदिराच्या आवारातील व्हिडीओ व्हायरल

Shah Rukh Khan: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधून शाहरुख हा चार वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. हा चित्रपट रिलीज होण्याआधी शाहरुखनं वैष्णोदेवीचे दर्शन घेतले आहे. जम्मू- काश्मिरमधील वैष्णोदेवीच्या मंदिराच्या आवारातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख हा त्याच्या बॉडिगार्ड्ससोबत मंदिरात जाताना दिसत आहे. 

व्हिडीओमध्ये दिसत आहे की शाहरुखला बॉडीगार्ड्नं घेरले आहे. शाहरुख हा काळ्या रंगाच्या हुडीमध्ये दिसला. शाहरुखनं चेहरा देखील कव्हर केला आहे. शाहरुखचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ: 

सौदी अरेबियातील मक्का मशिदीला दिली होती भेट
काही दिवसांपूर्वी शाहरुखनं सौदी अरेबियातील मक्का मशिदीला भेट दिली. तेथे त्यानं ‘उमराह’ हा हा विधी केला. मक्का मशिदीमधील शाहरुखचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

हेही वाचा :  Bhalji Pendharkar Death Anniversary : भालजी पेंढारकर यांची कारकीर्द जाणून घ्या...

पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. या चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पादुकोण देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. पठाणमधील ‘बेशरम रंग’ हे गाणं आज रिलीज झालं आहे. 

शाहरुखचे आगामी चित्रपट

शाहरुख खान हा अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटात शाहरुखनं एक छोटी भूमिका साकारली. तसेच ‘पठाण’ व्यतिरिक्त शाहरुख राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ या आगामी चित्रपटामध्येही प्रमुख भूमिका साकारणार आहे.  तसेच त्याचा ‘जवान’ हा आगामी चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Shah Rukh Khans Pathaan Look: हातात बंदुक अन् भेदक नजर; पठाणमधील शाहरुखचा खास लूक, नवं पोस्टर रिलीज



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …