आज जाहीर होणार ‘ऑस्कर नामांकन 2023’

Oscar Nominations 2023 List : ऑस्कर (Oscar) हा जगभरातील सिनेप्रेमींसाठी मानाचा समजला जाणारा पुरस्कार आहे. सिनेजगतातील सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्काराची सिनेप्रेमी आतुरतेने वाट पाहत असतात. अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅंड सायन्स आज ऑस्करसाठी नामांकन मिळणाऱ्या सिनेमांची यादी जाहीर करणार आहे. ‘ऑस्कर नामांकन 2023’ (Oscar Nominations 2023) भारतासाठी खूपच खास असणार आहे. यात राजामौलींच्या (Rajamouli) आरआरआर (RRR) पासून ते बहुचर्चित ‘छेल्लो शो’ (Chhello Show) पर्यंत अनेक सिनेमांचा समावेश आहे. 

ऑस्कर नामांकनाच्या शर्यतीत भारताच्या चार कलाकृती!

ऑस्कर नामांकनांच्या शर्यतीत भारताच्या चार कलाकृतींचा समावेश आहे. भारताकडून ‘आरआरआर’ (RRR) आणि ‘छेल्लो शो’ (Chhello Show) या सिनेमांना ‘ऑस्कर 2023’ (Oscar 2023) साठी अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवण्यात आले आहे. तसेच ‘ऑल दॅट ब्रीथ्स’ (All That Breathes) आणि ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ (The Elephant Whisperers) या माहितीपटांचा देखील समावेश आहे. 

हेही वाचा :  ‘आरआरआर’ने गाठला 500 कोटींचा टप्पा! हिंदी व्हर्जनचाही बॉक्स ऑफिसवर कल्ला!

ऑस्कर नामांकनाच्या शर्यतीत भारतीतील कलाकृतींबद्दल जाणून घ्या…

आरआरआर (RRR)  

‘आरआरआर’ या सिनेमाची कथा बंडखोर कोराराम भीम आणि अल्लुरी सीताराम राजू यांच्या वास्तविक जीवनावर आधारित आहे. या सिनेमात एनटीआर, राम चरण आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत होते. तसेच अजय देवगन आणि श्रिया सरनची झलकदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळाला आहे. तसेच या सिनेमातील ‘नाटू नाटू’  हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. 

news reels New Reels

छेल्लो शो (Chhello Show) 

‘छेल्लो शो’ या सिनेमात एका नऊ वर्षीय मुलाचा ध्येयवेडा प्रवास दाखवण्यात आला आहे. खेडेगावात राहणारा मुलगा सिनेमा पाहतो आणि तो सिनेमा त्याला कसं घडवतो हे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. कष्ट करण्याची, मेहनत घेण्याची तयारी असेल तर स्वप्न साकार करता येतं यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे,. या गुजराती भाषित सिनेमाने अनेक पुरस्कार सोहळ्यांत बाजी मारली आहे. पान नलिन दिग्दर्शित या सिनेमात भावेश श्रीमाली, भाविन राबरी, ऋचा मीणा, परेश मेहता आणि दीपेन रावल हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 

हेही वाचा :  शाहरुखकडे चाहत्यानं मागितला 'पठाण'च्या कमाईतला हिस्सा

ऑल दॅट ब्रीथ्स (All That Breathes)

‘ऑल दॅट ब्रीथ्स’ हा शौनक सेनचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा माहितीपट आहे. मोहम्मद सऊद आणि नदीम शहनाज या दिल्लीत राहणाऱ्या दोन भावंडांवर बेतलेला हा सिनेमा आहे. जखमी पक्ष्यांना विशेषतः गरुडांना वाचवण्यासाठी आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या मुलांची गोष्ट या माहितीपटात दाखवण्यात आली आहे. 

द एलिफxट व्हिस्परर्स (The Elephant Whisperers)

कार्तिकी गोन्साल्विसचा  ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ हा माहितीपट दोन हत्ती आणि त्यांची सेवा करणाऱ्या लोकांवर आधारित आहे. या माहितीपटाची निर्मिती ‘पिरियड अॅन्ड ऑफ सेंटन्स’ फेम ऑस्कर विजेते गुनीत मोंगा यांनी केली आहे. 

संबंधित बातम्या

Oscar Nominations 2023 List : ऑस्करची नामांकन यादी होणार जाहीर; कुठे आणि कधी पाहता येणार इव्हेंट? जाणून घ्या

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …