Saving Formula : ‘हे’ सूत्र तुम्हाला बनवणार श्रीमंत, काय आहे 50:30:20चं गणित?

Saving Formula : दिवसेंदिवस महागाई (Inflation) वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट (Budget) कोलमडलं आहे. बचत (Saving) करणंही अशा परिस्थितीत खूप कठीण झालं आहे. इथे प्रत्येकाला वाटतं आपल्याकडे भरपूर पैसा असावा, त्यासाठी तो मेहनत करतो, बचत करण्याचा प्रयत्न करतो. पण वाढती महागाई त्याचं कंबरड मोडतं. अशात आज आम्ही तुमच्या आमच्यासाठी श्रीमंत होण्याचा फॉर्म्युला आणला आहे. नोकरी करणाऱ्या प्रत्येकासाठी हा फॉर्म्युला श्रीमंताची गुरुकिल्ली ठरणार आहे. (saving formula 50 30 and 20 percent salary saving tips best budget rule in marathi)

50:30:20चं गणित?

आता तुम्ही म्हणाल गणित नाही आम्हाला समजतं. पण हे अगदी सोपं आहे. तुमच्या उत्पन्नाचे तीन भाग करायचे आहे. म्हणजे पगाराच्या (salary saving tips) रक्कमचे 50:30:20 असे भाग करायचे आहेत. पण जर तुम्ही उद्योजक असाल तर महिन्याच्या उत्पन्नावर तु्म्ही 50:30:20 हा फॉर्म्युला वापरा. आता पण हे 50:30:20 चं गणित समजून घेऊयात 

पगाराचा 50 टक्के भाग

आता आपण समजून घेऊयात की तुमचा महिन्याचा पगार हा 40,000 आहे. आता या पगारातून तुम्ही 50 टक्के रक्कम ही खाणे, राहणे आणि शिक्षणासोबत अत्यावश्यक गोष्टींसाठी काढून ठेवा. आता तुम्ही म्हणाल राहण्याचा म्हणजे हे बघा तुम्ही भाड्याने राहत असाल किंवा गृहकर्ज (EMI) बाजूला काढता. आता 40,000  मधून 50 टक्के रक्कम म्हणजे 20 हजार रुपये आपण बाजूला काढले आणि 20 हजार आपल्याकडे उरले. 

हेही वाचा :  माळशेज घाटाकडे पर्यटकांची पाठ, दरडींचा धोका की आणखी काही? वाचा यामागचं कारण

आता 30 टक्के भाग 

आता या 20 हजारातून 30% तुमच्या आवडीच्या गोष्टींसाठी बाजूला काढा. जसं की, बाहेर जेवायला जाणे, फिरायला जाणे, मुव्ही, गॅजेट्स, कपडे इत्यादींसाठी तो खर्च ठरवा. पगारातील 30 टक्के भाग हा सोप्या भाषेत म्हणजे जीवनशैलीशी संबंधित खर्चांसाठी ठेवा. 40,000 पगाराच्या हिशोबाने 30 टक्के भाग म्हणजे जास्तीत जास्त 12,000 एवढं रक्कम होते. 

20 टक्के भागात ही गोष्ट करा!

आता तुमच्या 40,000 पगारातून फक्त उरलेले 8 हजार रुपये. म्हणजे पगारातील 20 टक्के भाग…आता या भागात 8 हजारांची तुम्हाला गुंतवणूक करायची आहे. तुम्ही दर महिन्याला म्युच्युअल फंड, एसआयपी आणि बाँडमध्ये ही गुंतवणूक करु शकता. 50:30:20 चं फॉर्म्युला तु्म्ही वापल्यास वर्षअखेरीस तुम्ही एक लाखांची बचत करु शकणार आहात.

खरं तर तुमची 20 टक्क्यांचा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. यावर तुमचं बचतीचं गणित अवलंबून आहे. जर तुम्ही या खर्चांवर नियंत्रण ठेवलं आणि मनावर ताब्या ठेवल्यास अधिक बचत करु शकता. त्यात सर्वात महत्त्वाचं क्रेडिट कार्डच्या वापरावर खास करुन नियंत्रण ठेवावे लागणार आहे. अन्यथा या हातात पगार येईल आणि त्या हाताने तो संपेल. 

हेही वाचा :  सासूने सुनेला जमिनीवर आदळत केली मारहाण, किचनमध्येच तुंबळ हाणामारी; मुलाने काढला VIDEO



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ATM मधून फाटलेल्या नोटा निघाल्यात? घाबरू नका, ‘या’ पद्धतीने मिळवा कोऱ्या करकरीत नोटा

Damaged Note Exchange RBI Rule: एटीएममध्ये पैसे काढायला गेल्यानंतर अनेकदा त्यातून फाटलेले नोटा येतात. एटीएममधून …

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …