हॉलिवूडच्या पुरस्कार सोहळ्यात राजामौलींच्या ‘RRR’ने पटकावले तीन पुरस्कार!

HCA Film Awards 2023 RRR Movie : एसएस राजामौलींच्या (SS Rajamouli) ‘आरआरआर’ (RRR) या सिनेमाचा हॉलिवूडमध्येही बोलबाला पाहायला मिळत आहे. ‘ऑस्कर 2023’च्या नामांकन यादीत समावेश झालेल्या या सिनेमाने आता आपल्या नावे आणखी एक विक्रम केला आहे. हॉलिवूडच्या मानाच्या ‘हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन पुरस्कार सोहळ्या’त (Hollywood Critics Association) ‘आरआरआर’ने बाजी मारली आहे. 

सातासमुद्रापार ‘आरआरआर’चा डंका 

‘हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन पुरस्कार सोहळ्या’त राजामौलींच्या ‘आरआरआर’ या सिनेमाने तीन पुरस्कार पटकावले आहेत. सर्वोत्कृष्ट अॅक्शन पट, सर्वोत्कृष्ट स्टंट्स, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय सिनेमा आणि नाटू नाटू गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कार सोहळ्याला राजामौली (SS Rajamouli) आणि राम चरण (Ram Charan) यांनी हजेरी लावली होती. पुरस्कार पटकावल्यानंतर आपला आनंद व्यक्त करतानाचा राजामौलींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

‘हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन पुरस्कार सोहळ्या’त ‘आरआरआर’ या एकमेव भारतीय सिनेमाला पुरस्कार मिळाला आहे. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अॅक्शन पट, सर्वोत्कृष्ट स्टंट्स, सर्वोत्कृष्ट गाणी, सर्वोत्कृष्ट एडिटिंग, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय सिनेमा या कॅटेगरीमध्ये नामांकन मिळाले होते. 

हेही वाचा :  अथिया आणि केएल राहुल फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत अडकणार लग्नबंधनात

एचसीए पुरस्कार सोहळ्यात (HCA Film Awards 2023) ‘एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल अॅट वन्स’ या सिनेमाला सर्वाधिक नामांकन मिळाले होते. तब्बल 17 कॅटेगरीमध्ये या सिनेमाला नामांकन मिळाले होते. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट एडिटिंग आणि सिनेमातील एका अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. 


‘आरआरआर’ या सिनेमात ज्युनिअर एनटीआर, राम चरण (Ram Charan), आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत आहेत. एसएस राजामौलीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच धुमकूळ घातला होता. सिनेमातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला बेस्ट ओरिजनल सॉंग या कॅटेगरीत ऑस्करचं नामांकन मिळालं आहे. हा पुरस्कार सोहळा 12 मार्चला पार पडणार आहे.

संबंधित बातम्या

आरआरआर चित्रपट अमेरिकेतील 200 हून अधिक चित्रपटगृहात पुन्हा होणार रिलीज; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …